Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात नवे कृषी भवन 

0

पुणे : महाविकास आघाडी सरकारने कृषी विभागाला दिवाळीची एक गोड भेट दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणाऱ्या कृषी आयुक्तालयाला पुण्यात भव्य असे स्वतंत्र कृषी भवन बांधून दिले जाणार आहे. त्यासाठी २०४ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

पुण्यातील शिवाजीनगरच्या साखर संकुलाच्या शेजारील भागात कृषी खात्याची स्वमालकीची जागा आहे. मात्र सध्या तेथील इमारती जुनाट झालेल्या आहेत. तुंबलेल्या गटारी, फुटलेल्या बाटल्या, कचरा आणि सिमेंटच्या पत्र्याच्या बराकीत नकोशा झालेल्या वातावरणात कर्मचारी काम करीत आहेत. सध्या असलेली कृषी भवनाची इमारतही मोडकळीस आलेली आहे. 

कृषी खात्याचे सर्व अधिकारी येणार एकत्र 
‘‘कृषी आयुक्तालयाला स्वतःची प्रशस्त इमारत नसल्याने सध्या आयुक्तांचा कक्ष सेंट्रल बिल्डिंगमध्ये, विस्तार संचालकांचा कक्ष साखर संकुलमध्ये, फलोत्पादन संचालक जुन्या बराकीमध्ये तर आत्माचे संचालक जुन्या कृषी भवनात बसून काम करतात. नव्या कृषी भवनामुळे सर्व वरिष्ठ अधिकारी एकाच छताखाली येतील. या शिवाय कृषी आयुक्तांना स्वतःचे नवे निवासस्थान देखील मिळणार आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नाशिकलाही नवे कृषी भवन 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला मान्यता मिळण्यासाठी व्यक्तिशः लक्ष घातले होते. कृषी भवनाला मान्यता मिळाल्याने कृषी कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, पुण्याप्रमाणेच नाशिकला देखील शिंगाडा तलाव येथे १५ कोटी रुपये खर्चाचे नवे कृषी भवन उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे. नाशिकमधील कृषी भवनात कृषी सहसंचालक, तालका कृषी अधिकारी, अन्न प्रक्रिया संचालनालयाचे विभाग, मृदा चाचणी व खते परीक्षण प्रयोगशाळा, सभागृह व संगणक कक्षाचा समावेश राहील. 

…अशी होणार नव्या कृषी भवनाची उभारणी 
सध्या २३ हजार ७५५ मीटर जागा उपलब्ध 
यातील कृषी भवन व आयुक्त निवासस्थानासाठी स्वतंत्र इमारती 
२०१८मध्ये या प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित होता 
मुख्य सचिवांनी आता २०४ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली 
प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर  

News Item ID: 
820-news_story-1637074854-awsecm-372
Mobile Device Headline: 
पुण्यात नवे कृषी भवन 
Appearance Status Tags: 
Mukhya News
New Krishi Bhavan in PuneNew Krishi Bhavan in Pune
Mobile Body: 

पुणे : महाविकास आघाडी सरकारने कृषी विभागाला दिवाळीची एक गोड भेट दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणाऱ्या कृषी आयुक्तालयाला पुण्यात भव्य असे स्वतंत्र कृषी भवन बांधून दिले जाणार आहे. त्यासाठी २०४ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

पुण्यातील शिवाजीनगरच्या साखर संकुलाच्या शेजारील भागात कृषी खात्याची स्वमालकीची जागा आहे. मात्र सध्या तेथील इमारती जुनाट झालेल्या आहेत. तुंबलेल्या गटारी, फुटलेल्या बाटल्या, कचरा आणि सिमेंटच्या पत्र्याच्या बराकीत नकोशा झालेल्या वातावरणात कर्मचारी काम करीत आहेत. सध्या असलेली कृषी भवनाची इमारतही मोडकळीस आलेली आहे. 

कृषी खात्याचे सर्व अधिकारी येणार एकत्र 
‘‘कृषी आयुक्तालयाला स्वतःची प्रशस्त इमारत नसल्याने सध्या आयुक्तांचा कक्ष सेंट्रल बिल्डिंगमध्ये, विस्तार संचालकांचा कक्ष साखर संकुलमध्ये, फलोत्पादन संचालक जुन्या बराकीमध्ये तर आत्माचे संचालक जुन्या कृषी भवनात बसून काम करतात. नव्या कृषी भवनामुळे सर्व वरिष्ठ अधिकारी एकाच छताखाली येतील. या शिवाय कृषी आयुक्तांना स्वतःचे नवे निवासस्थान देखील मिळणार आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नाशिकलाही नवे कृषी भवन 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला मान्यता मिळण्यासाठी व्यक्तिशः लक्ष घातले होते. कृषी भवनाला मान्यता मिळाल्याने कृषी कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, पुण्याप्रमाणेच नाशिकला देखील शिंगाडा तलाव येथे १५ कोटी रुपये खर्चाचे नवे कृषी भवन उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे. नाशिकमधील कृषी भवनात कृषी सहसंचालक, तालका कृषी अधिकारी, अन्न प्रक्रिया संचालनालयाचे विभाग, मृदा चाचणी व खते परीक्षण प्रयोगशाळा, सभागृह व संगणक कक्षाचा समावेश राहील. 

…अशी होणार नव्या कृषी भवनाची उभारणी 
सध्या २३ हजार ७५५ मीटर जागा उपलब्ध 
यातील कृषी भवन व आयुक्त निवासस्थानासाठी स्वतंत्र इमारती 
२०१८मध्ये या प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित होता 
मुख्य सचिवांनी आता २०४ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली 
प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर  

English Headline: 
Agriculture News in Marathi New Krishi Bhavan in Pune
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
विकास कृषी विभाग agriculture department विभाग sections दिवाळी कृषी आयुक्त agriculture commissioner पुणे साखर कला अजित पवार ajit pawar संगणक नासा सार्वजनिक बांधकाम विभाग
Search Functional Tags: 
विकास, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, दिवाळी, कृषी आयुक्त, Agriculture Commissioner, पुणे, साखर, कला, अजित पवार, Ajit Pawar, संगणक, नासा, सार्वजनिक बांधकाम विभाग
Twitter Publish: 
Meta Keyword: 
New Krishi Bhavan in Pune
Meta Description: 
New Krishi Bhavan in Pune
महाविकास आघाडी सरकारने कृषी विभागाला दिवाळीची एक गोड भेट दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणाऱ्या कृषी आयुक्तालयाला पुण्यात भव्य असे स्वतंत्र कृषी भवन बांधून दिले जाणार आहे. त्यासाठी २०४ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X