पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवात

पुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू लागला आहे. पुणे जिल्ह्यात रब्बीच्या शेतीकामांना वेग आला असून, काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तर ज्वारीच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. रब्बीचे एकूण २ लाख ३५ हजार ८६८ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत ७ हजार ३३४ हेक्टरवर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

 गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे खरिपातील रखडलेल्या पिकांच्या काढणीला वेग आला आहे. त्यातच जिल्ह्यातील पूर्व भागातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, उत्तर भागातील खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात टोमॅटो, बटाटा, सोयाबीन, बाजरी, तर पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांत नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. आता रब्बी हंगामातील पिकांची पेरण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकरी कर्ज काढून रब्बीची तयारी करू लागला आहे.

थंडीसोबत वाढली शेतकऱ्यांची लगबग 
थंडीस सुरूवात झाल्याने रब्बी हंगामातील पेरणी करण्याच्या तयारीत आहे. चालू वर्षी झालेल्या पावसामुळे रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये गहू व हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. मात्र, भारी जमिनीत परतीच्या पावसामुळे अजूनही काही भागात शेतात पाणी असल्याने जमिनीची ओल कमी झालेली नाही. ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे, अशा भागात रब्बीच्या कामांना सुरूवात झाली असून, वेग आला असल्याची स्थिती आहे.

काही शेतकऱ्यांनी उशिराने ज्वारी पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी लवकर पेरणी केलेल्या ज्वारीची उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, गहू व हरभरा पिकांच्या पेरण्यांना पोषक वातावरण असल्याने चालू महिन्यात या पेरण्यांना सुरुवात होऊन एक ते दीड महिन्यांत पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

पुणे जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र (हेक्टर)         

पीक  सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र
रब्बी ज्वारी  १,४५,३२७ ६०७१
गहू   ३७,४०५
मका १६,१६२  १२४४
इतर रब्बी तृणधान्य ४४५  ०
हरभरा ३३,७४८ १७
इतर रब्बी कडधान्य २४४९
करडई  ३१ 
तीळ  ३४
जवस  ५    ०
इतर रब्बी गळीतधान्य १७०
एकूण  २,३५,८६८  ७३३४

News Item ID: 
820-news_story-1635168104-awsecm-329
Mobile Device Headline: 
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवात
Appearance Status Tags: 
Section News
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवात Rabbi sowing begins in Puneपुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवात Rabbi sowing begins in Pune
Mobile Body: 

पुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू लागला आहे. पुणे जिल्ह्यात रब्बीच्या शेतीकामांना वेग आला असून, काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तर ज्वारीच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. रब्बीचे एकूण २ लाख ३५ हजार ८६८ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत ७ हजार ३३४ हेक्टरवर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

 गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे खरिपातील रखडलेल्या पिकांच्या काढणीला वेग आला आहे. त्यातच जिल्ह्यातील पूर्व भागातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, उत्तर भागातील खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात टोमॅटो, बटाटा, सोयाबीन, बाजरी, तर पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांत नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. आता रब्बी हंगामातील पिकांची पेरण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकरी कर्ज काढून रब्बीची तयारी करू लागला आहे.

थंडीसोबत वाढली शेतकऱ्यांची लगबग 
थंडीस सुरूवात झाल्याने रब्बी हंगामातील पेरणी करण्याच्या तयारीत आहे. चालू वर्षी झालेल्या पावसामुळे रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये गहू व हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. मात्र, भारी जमिनीत परतीच्या पावसामुळे अजूनही काही भागात शेतात पाणी असल्याने जमिनीची ओल कमी झालेली नाही. ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे, अशा भागात रब्बीच्या कामांना सुरूवात झाली असून, वेग आला असल्याची स्थिती आहे.

काही शेतकऱ्यांनी उशिराने ज्वारी पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी लवकर पेरणी केलेल्या ज्वारीची उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, गहू व हरभरा पिकांच्या पेरण्यांना पोषक वातावरण असल्याने चालू महिन्यात या पेरण्यांना सुरुवात होऊन एक ते दीड महिन्यांत पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

पुणे जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र (हेक्टर)         

पीक  सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र
रब्बी ज्वारी  १,४५,३२७ ६०७१
गहू   ३७,४०५
मका १६,१६२  १२४४
इतर रब्बी तृणधान्य ४४५  ०
हरभरा ३३,७४८ १७
इतर रब्बी कडधान्य २४४९
करडई  ३१ 
तीळ  ३४
जवस  ५    ०
इतर रब्बी गळीतधान्य १७०
एकूण  २,३५,८६८  ७३३४

English Headline: 
Agriculture News in Marathi Rabbi sowing begins in Pune
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
ऊस पाऊस पुणे शेती farming ज्वारी jowar गहू wheat कृषी विभाग agriculture department विभाग sections हवामान पूर floods इंदापूर खेड शिरूर आंबेगाव सोयाबीन मावळ maval रब्बी हंगाम कर्ज थंडी तृणधान्य cereals कडधान्य
Search Functional Tags: 
ऊस, पाऊस, पुणे, शेती, farming, ज्वारी, Jowar, गहू, wheat, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, हवामान, पूर, Floods, इंदापूर, खेड, शिरूर, आंबेगाव, सोयाबीन, मावळ, Maval, रब्बी हंगाम, कर्ज, थंडी, तृणधान्य, cereals, कडधान्य
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rabbi sowing begins in Pune
Meta Description: 
Rabbi sowing begins in Pune
परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू लागला आहे. पुणे जिल्ह्यात रब्बीच्या शेतीकामांना वेग आला असून, काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X