पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार हेक्‍टरवर लागवड

नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता आयात करावी लागते. त्यावर मोठे परकीय चलनही खर्च होते. ही बाब गांभीर्याने घेत पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये तेलवर्गीय करडई लागवडीला कृषी विभाग, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाजोती) अभियानातून प्रोत्साहन देण्यात आले आहे. तेलबियावर्गीय पिकांसाठी नवख्या असलेल्या या भागात या दोन्ही यंत्रणांच्या माध्यमातून बळ दिले जात असून यंदा चार जिल्ह्यांत सुमारे चार हजार हेक्‍टरवर करडई लागवड होणार आहे. 

सद्यःस्थितीत खाद्यतेलाच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण नाही. परिणामी, ७० हजार कोटी रुपयांच्या खाद्यतेलाची आयात करावी लागते. विदर्भ करडई, जवस, भुईमूग, तीळ, मोहरी या तेलवर्गीय पिकांसाठी कधी काळी ओळखला जाता होता. परंतु करडई कापणीवेळी मजुरांच्या हातांना काट्यांमुळे होणाऱ्या जखमा, तर इतर तेलवर्गीय पिकांना वन्यप्राण्यांकडून नुकसानीची भीती, दरातील चढ-उतार अशा अनेक कारणांमुळे तेलबिया पिकांखालील क्षेत्र कमी होत गेले.

 करडई लागवडीच्या तांत्रिक बाबी 
एकरी चार किलो बियाणे, लागवडीपूर्वी एक रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे, दुसऱ्या दिवशी वाळवून, बुरशीनाशक तसेच ॲझोटोबॅक्‍टर यांची बीजप्रक्रिया करून लागवड करावी, पाच सेंटिमीटरपेक्षा अधिक खोल बियाणे पडू नये, पुरेशी ओल असावी, मावा व अन्य किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट, ॲसाफेटची फवारणी करावी, दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित ओलित करावे, अति पाणी देण्याचे टाळावे.

महाजोतीच्या माध्यमातून अंमलबजावणी होणाऱ्या या प्रकल्पात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन केंद्राचे तांत्रिक सहकार्य आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. त्याच्याच परिणामी वर्धा जिल्ह्यात ४२५, चंद्रपूर १८००, गडचिरोली १०००, तर नागपूर जिल्ह्यात २५४ हेक्‍टरवर करडई लागवडीकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांना बियाणे व निविष्ठांचा पुरवठा प्रकल्पातून होईल. शेतकऱ्यांना तेलबियावर्गीय पिकांकडे वळविण्याचे या अभियानातून प्रस्तावीत असून, त्याला बऱ्याच अंशी यश आले आहे. 
– रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर

News Item ID: 
820-news_story-1635082887-awsecm-929
Mobile Device Headline: 
पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार हेक्‍टरवर लागवड
Appearance Status Tags: 
Mukhya News
In East Vidarbha, safflower will be planted on 4,000 hectaresIn East Vidarbha, safflower will be planted on 4,000 hectares
Mobile Body: 

नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता आयात करावी लागते. त्यावर मोठे परकीय चलनही खर्च होते. ही बाब गांभीर्याने घेत पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये तेलवर्गीय करडई लागवडीला कृषी विभाग, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाजोती) अभियानातून प्रोत्साहन देण्यात आले आहे. तेलबियावर्गीय पिकांसाठी नवख्या असलेल्या या भागात या दोन्ही यंत्रणांच्या माध्यमातून बळ दिले जात असून यंदा चार जिल्ह्यांत सुमारे चार हजार हेक्‍टरवर करडई लागवड होणार आहे. 

सद्यःस्थितीत खाद्यतेलाच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण नाही. परिणामी, ७० हजार कोटी रुपयांच्या खाद्यतेलाची आयात करावी लागते. विदर्भ करडई, जवस, भुईमूग, तीळ, मोहरी या तेलवर्गीय पिकांसाठी कधी काळी ओळखला जाता होता. परंतु करडई कापणीवेळी मजुरांच्या हातांना काट्यांमुळे होणाऱ्या जखमा, तर इतर तेलवर्गीय पिकांना वन्यप्राण्यांकडून नुकसानीची भीती, दरातील चढ-उतार अशा अनेक कारणांमुळे तेलबिया पिकांखालील क्षेत्र कमी होत गेले.

 करडई लागवडीच्या तांत्रिक बाबी 
एकरी चार किलो बियाणे, लागवडीपूर्वी एक रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे, दुसऱ्या दिवशी वाळवून, बुरशीनाशक तसेच ॲझोटोबॅक्‍टर यांची बीजप्रक्रिया करून लागवड करावी, पाच सेंटिमीटरपेक्षा अधिक खोल बियाणे पडू नये, पुरेशी ओल असावी, मावा व अन्य किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट, ॲसाफेटची फवारणी करावी, दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित ओलित करावे, अति पाणी देण्याचे टाळावे.

महाजोतीच्या माध्यमातून अंमलबजावणी होणाऱ्या या प्रकल्पात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन केंद्राचे तांत्रिक सहकार्य आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. त्याच्याच परिणामी वर्धा जिल्ह्यात ४२५, चंद्रपूर १८००, गडचिरोली १०००, तर नागपूर जिल्ह्यात २५४ हेक्‍टरवर करडई लागवडीकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांना बियाणे व निविष्ठांचा पुरवठा प्रकल्पातून होईल. शेतकऱ्यांना तेलबियावर्गीय पिकांकडे वळविण्याचे या अभियानातून प्रस्तावीत असून, त्याला बऱ्याच अंशी यश आले आहे. 
– रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर

English Headline: 
Agriculture news in Marathi In East Vidarbha, safflower will be planted on 4,000 hectares
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नागपूर nagpur विदर्भ vidarbha कृषी विभाग agriculture department विभाग sections प्रशिक्षण training भुईमूग groundnut कृषी विद्यापीठ agriculture university चंद्रपूर
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, विदर्भ, Vidarbha, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, प्रशिक्षण, Training, भुईमूग, Groundnut, कृषी विद्यापीठ, Agriculture University, चंद्रपूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In East Vidarbha, safflower will be planted on 4,000 hectares
Meta Description: 
In East Vidarbha, safflower will be planted on 4,000 hectares
देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता आयात करावी लागते. त्यावर मोठे परकीय चलनही खर्च होते. ही बाब गांभीर्याने घेत पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये तेलवर्गीय करडई लागवडीला कृषी विभाग, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाजोती) अभियानातून प्रोत्साहन देण्यात आले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X