पेट्रोल महागल्याने दुचाकी सोडून शेतकऱ्याने घेतला घोडा…

आर्णी, जि. यवतमाळ : पेट्रोल दरवाढीला वैतागलेल्या एका शेतकऱ्याने शेतात जाण्यासाठी थेट घोडाच खरेदी केला. आता रोज तब्बल तीस किलोमीटरची रपेट या घोड्यावर हा शेतकरी मारत असून दररोज शंभर रुपयांची बचत या माध्यमातून झाल्याचे त्यांनी सांगितले. दत्‍ता राठोड असे या शेतकऱ्याचे नाव असून तेंडोळी येथील रहिवासी आहेत.

अल्पभूधारक असलेल्या दत्ता राठोड यांच्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीवरच दत्ता राठोड यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेतकरी म्हटल्यावर घरून शेतात आणि शेतातून घरी येणे जाणे करण्यासाठी दुचाकी घेऊनच जावे लागत होते. शेतातील तूर, कपाशी, पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी दत्ता राठोड आपल्या शेतात दुचाकीने प्रवास करायचे.

दररोज त्यांना दुचाकीवरून शेतात जातांना साधारणपणे शंभर रुपयाचे पेट्रोल लागायचे. त्यात सतत पेट्रोलची दरवाढ होत असून आज रोजी पेट्रोलचे दर ११६ रुपये २५ पैसे झाले आहेत. पेट्रोल दरवाढीला पाहून शेतकरी दत्ता राठोड त्रस्त झाले होते. मग त्यांनी एक दिवस पेट्रोल दरवाढीला कंटाळत शेतात ये-जा करण्यासाठी नव्या पर्यायांचा शोध सुरू केला. पूर्वी सारी कामे घोड्याच्या माध्यमातून होत होती हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनीदेखील शेतात ये-जा करण्याकरिता दुचाकीला पर्याय म्हणून घोडा घेण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यापूर्वी साडेतीन हजार रुपयांत तालुक्यातील लोनबेहळ येथील आपल्या मित्राकडून घोडा विकत घेतला आणि आज रोजी शेतकरी दत्ता राठोड त्या घोड्याने शेतात ये जा करतात. अशा प्रकारे दररोज साधारण ३० किलोमीटर प्रवास घोड्यावर ते करतात.

प्रतिक्रिया…
गावापासून शेत लांब असल्याने दुचाकीवर रपेट मारल्याशिवाय पर्याय नव्हता. वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी रात्री बेरात्री देखील जावे लागते. तीन फेऱ्या झाल्या की रोज सरासरी शंभर रुपयांचे पेट्रोल खर्ची होत होते. हा खर्च देखील शेती उत्पादन खर्चात जोडत होतो. त्यातच केंद्र सरकारने दररोज पेट्रोलमध्ये दरवाढीचे धोरण अवलंबिले आहे. सामान्यांसाठी ते अडचणीचे ठरत आहे. त्यावर तोडगा म्हणून अखेरीस मी घोडा खरेदीचा निर्णय घेतला. आता घोड्यावर बसून शेतावर जातो आणि घरी येतो. सध्या घोड्यासाठी हिरवा चारा जंगलातच मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्च होत नाही.
दत्‍ता राठोड, शेतकरी, तेंडोळी

News Item ID: 
820-news_story-1635919128-awsecm-641
Mobile Device Headline: 
पेट्रोल महागल्याने दुचाकी सोडून शेतकऱ्याने घेतला घोडा…
Appearance Status Tags: 
Mukhya News
पेट्रोल महागल्याने दुचाकी सोडून शेतकऱ्याने घेतला घोडा...पेट्रोल महागल्याने दुचाकी सोडून शेतकऱ्याने घेतला घोडा...
Mobile Body: 

आर्णी, जि. यवतमाळ : पेट्रोल दरवाढीला वैतागलेल्या एका शेतकऱ्याने शेतात जाण्यासाठी थेट घोडाच खरेदी केला. आता रोज तब्बल तीस किलोमीटरची रपेट या घोड्यावर हा शेतकरी मारत असून दररोज शंभर रुपयांची बचत या माध्यमातून झाल्याचे त्यांनी सांगितले. दत्‍ता राठोड असे या शेतकऱ्याचे नाव असून तेंडोळी येथील रहिवासी आहेत.

अल्पभूधारक असलेल्या दत्ता राठोड यांच्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीवरच दत्ता राठोड यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेतकरी म्हटल्यावर घरून शेतात आणि शेतातून घरी येणे जाणे करण्यासाठी दुचाकी घेऊनच जावे लागत होते. शेतातील तूर, कपाशी, पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी दत्ता राठोड आपल्या शेतात दुचाकीने प्रवास करायचे.

दररोज त्यांना दुचाकीवरून शेतात जातांना साधारणपणे शंभर रुपयाचे पेट्रोल लागायचे. त्यात सतत पेट्रोलची दरवाढ होत असून आज रोजी पेट्रोलचे दर ११६ रुपये २५ पैसे झाले आहेत. पेट्रोल दरवाढीला पाहून शेतकरी दत्ता राठोड त्रस्त झाले होते. मग त्यांनी एक दिवस पेट्रोल दरवाढीला कंटाळत शेतात ये-जा करण्यासाठी नव्या पर्यायांचा शोध सुरू केला. पूर्वी सारी कामे घोड्याच्या माध्यमातून होत होती हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनीदेखील शेतात ये-जा करण्याकरिता दुचाकीला पर्याय म्हणून घोडा घेण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यापूर्वी साडेतीन हजार रुपयांत तालुक्यातील लोनबेहळ येथील आपल्या मित्राकडून घोडा विकत घेतला आणि आज रोजी शेतकरी दत्ता राठोड त्या घोड्याने शेतात ये जा करतात. अशा प्रकारे दररोज साधारण ३० किलोमीटर प्रवास घोड्यावर ते करतात.

प्रतिक्रिया…
गावापासून शेत लांब असल्याने दुचाकीवर रपेट मारल्याशिवाय पर्याय नव्हता. वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी रात्री बेरात्री देखील जावे लागते. तीन फेऱ्या झाल्या की रोज सरासरी शंभर रुपयांचे पेट्रोल खर्ची होत होते. हा खर्च देखील शेती उत्पादन खर्चात जोडत होतो. त्यातच केंद्र सरकारने दररोज पेट्रोलमध्ये दरवाढीचे धोरण अवलंबिले आहे. सामान्यांसाठी ते अडचणीचे ठरत आहे. त्यावर तोडगा म्हणून अखेरीस मी घोडा खरेदीचा निर्णय घेतला. आता घोड्यावर बसून शेतावर जातो आणि घरी येतो. सध्या घोड्यासाठी हिरवा चारा जंगलातच मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्च होत नाही.
दत्‍ता राठोड, शेतकरी, तेंडोळी

English Headline: 
agriculture news in marathi Due to high petrol price the farmer left the bike and took the horse
Author Type: 
External Author
विनोद इंगोले/बबलू जाधव
यवतमाळ yavatmal पेट्रोल शेती farming तूर
Search Functional Tags: 
यवतमाळ, Yavatmal, पेट्रोल, शेती, farming, तूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Due to high petrol price the farmer left the bike and took the horse
Meta Description: 
Due to high petrol price the farmer left the bike and took the horse
पेट्रोल दरवाढीला वैतागलेल्या एका शेतकऱ्याने शेतात जाण्यासाठी थेट घोडाच खरेदी केला. आता रोज तब्बल तीस किलोमीटरची रपेट या घोड्यावर हा शेतकरी मारत असून दररोज शंभर रुपयांची बचत या माध्यमातून झाल्याचे त्यांनी सांगितले.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X