बंधारे ढीगभर, तरीही पाणीटंचाई शिगेला 

नागपूर : नरखेड तालुक्यात अनेक ठिकाणी छोटी-मोठी धरणे, कोल्हापुरी बंधारे आहेत. जिल्ह्याचे शेवटची गावे म्हणून अंबाडा, सायवाडा, तारा, उतारा, खलानगोंदी, खारगड थडीपवनी, बरडपवनी, बानोर, उदापूर, पिंपलदरा, अशी अनेक गावे जंगलाकाठी वसली आहेत. हजारो एकर शेती अजूनही कोरडवाहूच आहे. यामागे राजकीय उदासीनता असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

या परिसरात वर्धा नदी आहे. या नदीवर हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. परंतु पाणी साठवण्याची क्षमता तुटपुंज्या स्वरूपाची असल्यामुळे या नदीतील पाणी वाहून जाते. छोटे छोटे बंधारे आहेत, ती साधारणतः जानेवारी महिन्यातच कोरडी होतात. जर का या बंधाऱ्यांची उंची वाढवली तर बरीच शेती ओलिताखाली येऊ शकते. या भागात मागील पंचवीस वर्षांपूर्वी देवदरी प्रकल्पाचे काम झाले. परंतु अजूनही धरणामध्ये पाणीसाठा होत नाही. 

प्रतिक्रिया 

बंधारा उंच केल्यास लाभ 
वर्धा नदीवरील झुंज बंधारा फक्त एक मीटर जरी उंच केला, तर हजारो एकर शेतीला मे महिन्याच्या शेवटपर्यंत पाणी पुरू शकते. अनेकदा यासाठी पाठपुरावा केला. परंतु शासन दुर्लक्ष करीत आहे. येत्या अधिवेशनात यावर जोर देऊन बंधारा उंच करण्यास प्रयत्न करणार आहे. 
-हरीहर चोरे, सरपंच, सायवाडा 

-वधरी प्रकल्प हा १९९५ ते ९६ मध्ये मंजूर झाला होता. या प्रकल्पामुळे या भागातील ५ ते ६ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली असती. पण राजकीय कुरघोडी करीत काही नेत्यांनी या प्रकल्पाची फाइल बंद केली. आता ती धूळखात पडली आहे. परिणामी या भागातील संत्रा बागा सुकलेल्या अवस्थेत आहेत. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत. 
-कुमार तट्टे, युवा शेतकरी, अंबाडा 
– 
शेती झुंज बंध्याऱ्यापलीकडे आहे. दर वर्षी बागायती शेती करतो. मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. बंधारा जर एक मीटर उंच झाला तर मुबलक प्रमाणात पाणी राहून उत्तम शेती करता आली असती. परंतु असे होताना दिसून येत नाही. 
-दिवाकर शेळके, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, नरखेड  

News Item ID: 
820-news_story-1638972912-awsecm-803
Mobile Device Headline: 
बंधारे ढीगभर, तरीही पाणीटंचाई शिगेला 
Appearance Status Tags: 
Section News
Heaps of dams, but still water scarcityHeaps of dams, but still water scarcity
Mobile Body: 

नागपूर : नरखेड तालुक्यात अनेक ठिकाणी छोटी-मोठी धरणे, कोल्हापुरी बंधारे आहेत. जिल्ह्याचे शेवटची गावे म्हणून अंबाडा, सायवाडा, तारा, उतारा, खलानगोंदी, खारगड थडीपवनी, बरडपवनी, बानोर, उदापूर, पिंपलदरा, अशी अनेक गावे जंगलाकाठी वसली आहेत. हजारो एकर शेती अजूनही कोरडवाहूच आहे. यामागे राजकीय उदासीनता असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

या परिसरात वर्धा नदी आहे. या नदीवर हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. परंतु पाणी साठवण्याची क्षमता तुटपुंज्या स्वरूपाची असल्यामुळे या नदीतील पाणी वाहून जाते. छोटे छोटे बंधारे आहेत, ती साधारणतः जानेवारी महिन्यातच कोरडी होतात. जर का या बंधाऱ्यांची उंची वाढवली तर बरीच शेती ओलिताखाली येऊ शकते. या भागात मागील पंचवीस वर्षांपूर्वी देवदरी प्रकल्पाचे काम झाले. परंतु अजूनही धरणामध्ये पाणीसाठा होत नाही. 

प्रतिक्रिया 

बंधारा उंच केल्यास लाभ 
वर्धा नदीवरील झुंज बंधारा फक्त एक मीटर जरी उंच केला, तर हजारो एकर शेतीला मे महिन्याच्या शेवटपर्यंत पाणी पुरू शकते. अनेकदा यासाठी पाठपुरावा केला. परंतु शासन दुर्लक्ष करीत आहे. येत्या अधिवेशनात यावर जोर देऊन बंधारा उंच करण्यास प्रयत्न करणार आहे. 
-हरीहर चोरे, सरपंच, सायवाडा 

-वधरी प्रकल्प हा १९९५ ते ९६ मध्ये मंजूर झाला होता. या प्रकल्पामुळे या भागातील ५ ते ६ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली असती. पण राजकीय कुरघोडी करीत काही नेत्यांनी या प्रकल्पाची फाइल बंद केली. आता ती धूळखात पडली आहे. परिणामी या भागातील संत्रा बागा सुकलेल्या अवस्थेत आहेत. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत. 
-कुमार तट्टे, युवा शेतकरी, अंबाडा 
– 
शेती झुंज बंध्याऱ्यापलीकडे आहे. दर वर्षी बागायती शेती करतो. मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. बंधारा जर एक मीटर उंच झाला तर मुबलक प्रमाणात पाणी राहून उत्तम शेती करता आली असती. परंतु असे होताना दिसून येत नाही. 
-दिवाकर शेळके, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, नरखेड  

English Headline: 
Agriculture News in Marathi Heaps of dams, but still water scarcity
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
धरण शेती farming नागपूर nagpur पूर floods सिंचन पाणी water वर्षा varsha आत्महत्या बागायत पाणीटंचाई
Search Functional Tags: 
धरण, शेती, farming, नागपूर, Nagpur, पूर, Floods, सिंचन, पाणी, Water, वर्षा, Varsha, आत्महत्या, बागायत, पाणीटंचाई
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Heaps of dams, but still water scarcity
Meta Description: 
Heaps of dams, but still water scarcity
नरखेड तालुक्यात अनेक ठिकाणी छोटी-मोठी धरणे, कोल्हापुरी बंधारे आहेत. हजारो एकर शेती अजूनही कोरडवाहूच आहे. यामागे राजकीय उदासीनता असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment