बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री उत्पादकांना मदत जाहिर

नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये विविध टप्प्यांतील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येकी ५० टक्‍के निधीतून याकरिता तरतूद केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. 

महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांत कोंबड्यांच्या अचानक मृत्यूचे प्रकार समोर आले होते.  प्रयोगशाळेत चाचणीअंती एव्हिएन इन्फुएन्झामुळे (बर्ड फ्लू) बाधित झाल्याने या कोंबड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. 

केंद्र शासनाने २०२१ मध्ये बर्ड फ्लू नियंत्रणासाठी सुधारित दिशानिर्देश जारी केले आहेत. सुधारित कृती आराखड्यानुसार एक किलोमीटर परिघातील कुक्‍कुट पक्षी, त्यांची अंडी व पक्षी खाद्य नष्ट करावे लागतात. त्यानुसार परभणी, लातूर या दोन जिल्ह्यांत अशाप्रकारची कार्यवाही पूर्णत्वास गेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील या संदर्भाने प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले. 

दरम्यान, पक्ष्यांची विल्हेवाट लावली जात असल्याने पशुपालक तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यांना अल्पसा आधार म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून प्रत्येकी ५० टक्‍के प्रमाणे निधीची तरतूद करीत भरपाई देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील आदेश बुधवारी (ता.२०) काढण्यात आले. त्यामुळे बाधित क्षेत्रातील पशुपालकांना अल्पसा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. 

अशी मिळणार मदत 

 • आठ आठवड्यांपर्यंतचे अंडी देणारे पक्षी ः २० रुपये 
 • आठ आठवड्यांवरील अंडी देणारे पक्षी ः ९० रुपये 
 • सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्‍कुट पक्षी ः ७० रुपये 
 • अंडी ः ३ रुपये 
 • पक्षी खाद्य ः १२ रुपये प्रति किलो 

बदक आणि हंस

 • सहा आठवड्यांपर्यंतचे बदक ः 
  ३५ रुपये 
 • सहा आठवड्यांवरील बदक ः 
  १३५ रुपये 
 • सहा आठवड्यांपर्यंतचे हंस ः ३५ रु.
 • सहा आठवड्यांवरील हंस ः १३५ रु.

गिनी फाऊल आणि टर्की

 • सहा आठवड्यांवरील गिनी फाऊल ः
  १३५ रुपये 
 • सहा आठवड्यांपर्यंतचे गिनी फाऊल ः
  २० रुपये 
 • सहा आठवड्यांपर्यंतचे टर्की ः 
 • ६० रुपये 
 • सहा आठवड्यांवरील टर्की ः 
 • १६० रुपये

प्रतिक्रिया
‘शेतीपूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय ग्रामीण भागात होतो. अफवांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. बर्ड फ्लूमुळे कोणतीही व्यक्‍ती दगावल्याचे सिद्ध केल्यास मी स्वतः त्याला बक्षीस देण्यास तयार आहे. परिणामी, उकळलेले चिकन व अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित आहेत. तरी सुद्धा प्रादुर्भावग्रस्त भागासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.’
– सुनील केदार, मंत्री पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय

News Item ID: 
820-news_story-1611238627-awsecm-405
Mobile Device Headline: 
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री उत्पादकांना मदत जाहिर
Appearance Status Tags: 
Mukhya News
poultry poultry
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi help for poultry producers Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नागपूर व्यवसाय सुनील केदार महाराष्ट्र लातूर तूर शेती चिकन
Search Functional Tags: 
नागपूर, व्यवसाय, सुनील केदार, महाराष्ट्र, लातूर, तूर, शेती, चिकन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
help for poultry producers
Meta Description: 
help for poultry producers
राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे.Source link

Leave a Comment

X