बर्ड फ्लू मुळेच मुरुंब्यातील ८०० कोंबड्या मृत्युमुखी 

परभणी ः  परभणी जिल्ह्यातील मुरुंबा (ता.परभणी) येथील एका कुक्कुटपालन फार्मवरील ८०० पक्षी बर्ड फ्लू मुळे मृत झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. भोपाळ येथील प्रयोगशाळेत पक्ष्यांच्या शवविच्छेदन नमुन्यांच्या तपासणीनंतर हे निष्पन्न झाले. या बाबत संबंधित प्रयोगशाळेकडून रविवारी (ता.१०) रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास अहवाल प्राप्त झाला.

या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरुंबा गावाच्या एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्ममधील कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाईल. मुरुंबा गावासह दहा किलोमीटर परिघाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
मुरुंबा गावाच्या एक किलोमीटर परिसरात ५ कुक्कुटपालन फार्म आहेत. त्याठिकाणी एकूण सहा हजार पक्षी आहेत. त्यापैकी एका कुक्कुटपालन फार्ममधील ८०० पक्षी शुक्रवारी (ता.८) मृत आढळून आले.

पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करुन नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले होते. रविवारी (ता.१०) रात्री प्रयोगशाळेकडून जिल्हा प्रशासनास ते कुक्कुट पक्षी बर्ड फ्लू मुळे मृत झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सोमवारी (ता.११) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोणे, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुरुंबा गावच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व पक्षी सुरक्षितरित्या नष्ट करण्यात येतील. गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहा किलोमीटर परिसरातील अन्य कुक्कुटपालन फार्मवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

कुपटा येथेही पक्षी मृत
कुपटा (ता.सेलू) येथील एका शेतकऱ्यांच्या मृत कोंबड्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. बर्ड फ्लू आजार स्थलांतरित पक्षामुळे होतो. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  मुगळीकर यांनी केले आहे.
 
News Item ID: 
820-news_story-1610381281-awsecm-452
Mobile Device Headline: 
बर्ड फ्लू मुळेच मुरुंब्यातील ८०० कोंबड्या मृत्युमुखी 
Appearance Status Tags: 
Mukhya News
बर्ड फ्लू मुळेच मुरुंब्यातील ८०० कोंबड्या मृत्युमुखी बर्ड फ्लू मुळेच मुरुंब्यातील ८०० कोंबड्या मृत्युमुखी 
Mobile Body: 

परभणी ः  परभणी जिल्ह्यातील मुरुंबा (ता.परभणी) येथील एका कुक्कुटपालन फार्मवरील ८०० पक्षी बर्ड फ्लू मुळे मृत झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. भोपाळ येथील प्रयोगशाळेत पक्ष्यांच्या शवविच्छेदन नमुन्यांच्या तपासणीनंतर हे निष्पन्न झाले. या बाबत संबंधित प्रयोगशाळेकडून रविवारी (ता.१०) रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास अहवाल प्राप्त झाला.

या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरुंबा गावाच्या एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्ममधील कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाईल. मुरुंबा गावासह दहा किलोमीटर परिघाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
मुरुंबा गावाच्या एक किलोमीटर परिसरात ५ कुक्कुटपालन फार्म आहेत. त्याठिकाणी एकूण सहा हजार पक्षी आहेत. त्यापैकी एका कुक्कुटपालन फार्ममधील ८०० पक्षी शुक्रवारी (ता.८) मृत आढळून आले.

पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करुन नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले होते. रविवारी (ता.१०) रात्री प्रयोगशाळेकडून जिल्हा प्रशासनास ते कुक्कुट पक्षी बर्ड फ्लू मुळे मृत झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सोमवारी (ता.११) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोणे, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुरुंबा गावच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व पक्षी सुरक्षितरित्या नष्ट करण्यात येतील. गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहा किलोमीटर परिसरातील अन्य कुक्कुटपालन फार्मवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

कुपटा येथेही पक्षी मृत
कुपटा (ता.सेलू) येथील एका शेतकऱ्यांच्या मृत कोंबड्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. बर्ड फ्लू आजार स्थलांतरित पक्षामुळे होतो. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  मुगळीकर यांनी केले आहे.
 
English Headline: 
agriculture news in Marathi 800 poultry birds died due to bird flue Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
परभणी parbhabi भोपाळ प्रशासन administrations विभाग sections जिल्हाधिकारी कार्यालय पशुवैद्यकीय आरोग्य health पोलिस पुणे स्थलांतर
Search Functional Tags: 
परभणी, Parbhabi, भोपाळ, प्रशासन, Administrations, विभाग, Sections, जिल्हाधिकारी कार्यालय, पशुवैद्यकीय, आरोग्य, Health, पोलिस, पुणे, स्थलांतर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
800 poultry birds died due to bird flue
Meta Description: 
800 poultry birds died due to bird flue
परभणी जिल्ह्यातील मुरुंबा (ता.परभणी) येथील एका कुक्कुटपालन फार्मवरील ८०० पक्षी बर्ड फ्लू मुळे मृत झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.Source link

Leave a Comment

X