बाजार समित्यांचा उद्या ‘देशव्यापी बंद’

नागपूर : केंद्र सरकारने डाळवर्गीय शेतीमालाला साठवणूक मर्यादा (स्टॉक लिमिट) घालून दिली आहे. याचा विरोध म्हणून देशभरातील बाजार समित्या आणि डाळ मिल शुक्रवारी (ता. १६) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय व्यापार मंडळाने या संदर्भातील घोषणा केली आहे. या लाक्षणिक बंदनंतर स्टॉक लिमिटबाबत पुढील भूमिका घेतली जाणार असल्याचे भारतीय व्यापार मंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

केंद्र सरकारने डाळीचे दर कमी व्हावे याकरिता घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकरीता स्टॉक लिमिट निश्‍चित केले आहे. याचा देशभरातील व्यापाऱ्यांना फटका बसत असल्याने त्यांनी आपल्यास्तरावर याचा विरोध केला. मात्र त्यानंतरही केंद्र सरकार हा निर्णय मागे घेण्यास तयार नसल्याने व्यापारी हतबल झाले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारला इशारा म्हणून शुक्रवारी (ता. १६) देशभरात बाजार समिती व डाळ मिल उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत.

व्यापाऱ्यांचे देशव्यापी संघटन असलेल्या भारतीय व्यापार मंडळाने याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र, केरळ, आंध प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यातील बाजार समित्यांनी या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यामुळे हा बंद यशस्वी होईल, असे सांगितले जात आहे. भारतीय व्यापार मंडळाच्या ऑनलाइन बैठकीत या संदर्भाने निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एकदिवसीय लाक्षणिक बंदची हाक देण्यात आली. केंद्र सरकारने त्यानंतरही आपल्या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास या विरोधात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया
केंद्र सरकारने व्यापाऱ्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेताच एकतर्फी साठवणूक मर्यादेचा निर्णय लादला आहे. त्यानंतर लगेचच देशभरातील व्यापारी बंद पाळणार होते, परंतु व्यापक शेतकरीहित लक्षात घेता तो मागे घेण्यात आला. मात्र केंद्र सरकार या निर्णयाबाबत पुनर्विचार करीत नसल्याने शुक्रवारी देशभरातील बाजार समित्या बंद ठेवण्यात येणार आहेत. देशभरातील तब्बल वीस हजारांवर बाजार समित्या या दिवशी बंद राहतील. 
– बाबूलाल गुप्ता, अध्यक्ष, भारतीय व्यापार मंडळ

News Item ID: 
820-news_story-1626277119-awsecm-199
Mobile Device Headline: 
बाजार समित्यांचा उद्या ‘देशव्यापी बंद’
Appearance Status Tags: 
Mukhya News
बाजार समित्यांचा उद्या ‘देशव्यापी बंद’ Market committees to be closed nationwide tomorrowबाजार समित्यांचा उद्या ‘देशव्यापी बंद’ Market committees to be closed nationwide tomorrow
Mobile Body: 

नागपूर : केंद्र सरकारने डाळवर्गीय शेतीमालाला साठवणूक मर्यादा (स्टॉक लिमिट) घालून दिली आहे. याचा विरोध म्हणून देशभरातील बाजार समित्या आणि डाळ मिल शुक्रवारी (ता. १६) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय व्यापार मंडळाने या संदर्भातील घोषणा केली आहे. या लाक्षणिक बंदनंतर स्टॉक लिमिटबाबत पुढील भूमिका घेतली जाणार असल्याचे भारतीय व्यापार मंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

केंद्र सरकारने डाळीचे दर कमी व्हावे याकरिता घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकरीता स्टॉक लिमिट निश्‍चित केले आहे. याचा देशभरातील व्यापाऱ्यांना फटका बसत असल्याने त्यांनी आपल्यास्तरावर याचा विरोध केला. मात्र त्यानंतरही केंद्र सरकार हा निर्णय मागे घेण्यास तयार नसल्याने व्यापारी हतबल झाले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारला इशारा म्हणून शुक्रवारी (ता. १६) देशभरात बाजार समिती व डाळ मिल उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत.

व्यापाऱ्यांचे देशव्यापी संघटन असलेल्या भारतीय व्यापार मंडळाने याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र, केरळ, आंध प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यातील बाजार समित्यांनी या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यामुळे हा बंद यशस्वी होईल, असे सांगितले जात आहे. भारतीय व्यापार मंडळाच्या ऑनलाइन बैठकीत या संदर्भाने निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एकदिवसीय लाक्षणिक बंदची हाक देण्यात आली. केंद्र सरकारने त्यानंतरही आपल्या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास या विरोधात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया
केंद्र सरकारने व्यापाऱ्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेताच एकतर्फी साठवणूक मर्यादेचा निर्णय लादला आहे. त्यानंतर लगेचच देशभरातील व्यापारी बंद पाळणार होते, परंतु व्यापक शेतकरीहित लक्षात घेता तो मागे घेण्यात आला. मात्र केंद्र सरकार या निर्णयाबाबत पुनर्विचार करीत नसल्याने शुक्रवारी देशभरातील बाजार समित्या बंद ठेवण्यात येणार आहेत. देशभरातील तब्बल वीस हजारांवर बाजार समित्या या दिवशी बंद राहतील. 
– बाबूलाल गुप्ता, अध्यक्ष, भारतीय व्यापार मंडळ

English Headline: 
Agriculture news in marathi Market committees to be closed nationwide tomorrowSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

1 thought on “बाजार समित्यांचा उद्या ‘देशव्यापी बंद’”

Leave a Comment