Take a fresh look at your lifestyle.

बारामतीच्या इनोव्हेशन सेंटरमधून युवा शास्त्रज्ञ घडतील : उद्धव ठाकरे

0

बारामती : ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेले इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून युवा शास्त्रज्ञ तयार होतील व संशोधनाच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

बारामतीतील ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. अप्पासाहेब पवार इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटरचे उद्‍घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवार) (ता.२) झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, उद्योगपती बाबा कल्याणी, विजय शिर्के, दीपक छाब्रिया, अतुल किर्लोस्कर, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, आमदार रोहित पवार, राजू बारवाले, जगन्नाथ शिंदे, आर. वेंकटरमणन, डॉ. संतोष भोसले, मायकेल इरकल, सीईओ नीलेश नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात पन्नास वर्षांचा आढावा घेत काही अडचणी नमूद केल्या. मुख्यमंत्र्यांनी या केंद्राची पाहणी करण्यासाठी नंतर दोन्ही मुलांना सोबत येणार असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पवार कुटुंबीयांनी विकासाचा ध्यास घेतला असून, बारामतीचे परिवर्तन घडविले आहे. युवकांना स्वावलंबी होण्यासाठी ही संस्था मार्गदर्शक ठरेल.’’  

शरद पवार यांनी आगामी काळात बारामतीत इंटेलिजंट सेंटर उभारण्याचा मनोदय बोलून दाखविला. श्री. पवार म्हणाले, ‘‘डॉ. अप्पासाहेब पवार यांनी आपले आयुष्य नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेचले, त्यांचे नाव या इनोव्हेशन सेंटरला आम्ही एकमताने दिले. खेड्यातील मुलांना प्रोत्साहन मिळेल, स्टार्टअपमध्ये त्यांनाही संधी मिळेल व ग्रामीण भागाचे या माध्यमातून परिवर्तन होईल, या उद्देशाने हे सेंटर उभारले आहे. संशोधनाला व कृषिपूरक संशोधनाला प्रोत्साहन देणे हा या मागील हेतू होता.’’ अजित पवार यांच्यासह अतुल किर्लोस्कर व बाबा कल्याणी यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार फेलोशिपबाबत माहिती दिली.

News Item ID: 
820-news_story-1635911207-awsecm-158
Mobile Device Headline: 
बारामतीच्या इनोव्हेशन सेंटरमधून युवा शास्त्रज्ञ घडतील : उद्धव ठाकरे
Appearance Status Tags: 
Mukhya News
बारामतीच्या इनोव्हेशन सेंटरमधून युवा शास्त्रज्ञ घडतील : उद्धव ठाकरेबारामतीच्या इनोव्हेशन सेंटरमधून युवा शास्त्रज्ञ घडतील : उद्धव ठाकरे
Mobile Body: 

बारामती : ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेले इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून युवा शास्त्रज्ञ तयार होतील व संशोधनाच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

बारामतीतील ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. अप्पासाहेब पवार इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटरचे उद्‍घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवार) (ता.२) झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, उद्योगपती बाबा कल्याणी, विजय शिर्के, दीपक छाब्रिया, अतुल किर्लोस्कर, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, आमदार रोहित पवार, राजू बारवाले, जगन्नाथ शिंदे, आर. वेंकटरमणन, डॉ. संतोष भोसले, मायकेल इरकल, सीईओ नीलेश नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात पन्नास वर्षांचा आढावा घेत काही अडचणी नमूद केल्या. मुख्यमंत्र्यांनी या केंद्राची पाहणी करण्यासाठी नंतर दोन्ही मुलांना सोबत येणार असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पवार कुटुंबीयांनी विकासाचा ध्यास घेतला असून, बारामतीचे परिवर्तन घडविले आहे. युवकांना स्वावलंबी होण्यासाठी ही संस्था मार्गदर्शक ठरेल.’’  

शरद पवार यांनी आगामी काळात बारामतीत इंटेलिजंट सेंटर उभारण्याचा मनोदय बोलून दाखविला. श्री. पवार म्हणाले, ‘‘डॉ. अप्पासाहेब पवार यांनी आपले आयुष्य नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेचले, त्यांचे नाव या इनोव्हेशन सेंटरला आम्ही एकमताने दिले. खेड्यातील मुलांना प्रोत्साहन मिळेल, स्टार्टअपमध्ये त्यांनाही संधी मिळेल व ग्रामीण भागाचे या माध्यमातून परिवर्तन होईल, या उद्देशाने हे सेंटर उभारले आहे. संशोधनाला व कृषिपूरक संशोधनाला प्रोत्साहन देणे हा या मागील हेतू होता.’’ अजित पवार यांच्यासह अतुल किर्लोस्कर व बाबा कल्याणी यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार फेलोशिपबाबत माहिती दिली.

English Headline: 
agriculture news in marathi Young scientists will emerge from Baramati Innovation Center Uddhav Thackeray
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare बारामती शरद पवार sharad pawar अजित पवार ajit pawar खासदार सुप्रिया सुळे supriya sule रश्मी ठाकरे rashmi thackeray विजय victory आमदार रोहित पवार
Search Functional Tags: 
मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, बारामती, शरद पवार, Sharad Pawar, अजित पवार, Ajit Pawar, खासदार, सुप्रिया सुळे, Supriya Sule, रश्मी ठाकरे, Rashmi Thackeray, विजय, victory, आमदार, रोहित पवार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Young scientists will emerge from Baramati Innovation Center: Uddhav Thackeray
Meta Description: 
Young scientists will emerge from Baramati Innovation Center: Uddhav Thackeray
ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेले इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून युवा शास्त्रज्ञ तयार होतील व संशोधनाच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X