[ad_1]
बारामती : ग्रामीण भागातील बुद्धिमत्तेचा डंका आता सातासमुद्रापार वाजू लागला आहे. गुणवत्ता असेल, तर आंतरराष्ट्रीयस्तरावरील विद्यापीठातूनही त्याला मान्यता मिळते ही बाब बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सिद्ध केली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या Artificial Intelligence: Cloud and Edge Implementations या अभ्यासक्रमामध्ये ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे व युवा शास्त्रज्ञ सारंग नेरकर यांचे मानवतावादी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान, स्मार्ट शेतीमध्ये त्याचा वापर या विषयावर व्याख्यान झाले.
ट्रस्टचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्टची वाटचाल वेगाने सुरू आहे. ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून ट्रस्ट व ऑक्सफर्डमधील नवीन सेतू बांधला गेला असून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बाबींचे आदानप्रदान शक्य होणार आहे. ग्रामीण भागातील गुणवत्ता ऑक्सफर्डच्या
तज्ज्ञांनाही चकित करणारी होती, अशी प्रतिक्रिया आली असून या मुळे आता अनेक नवीन दालने भविष्यात खुली होतील, अशी शक्यता आहे.
श्री. नलावडे यांनी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि त्याचे विविध विभाग, तरुण नवोदितांना आणि उद्योजकांना मदत करण्यासाठीचे उपक्रमे, ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात नवीन बाबींवर झालेल्या संशोधनाची माहिती ऑक्सफर्डच्या विद्यार्थ्यांना दिली गेली.
सारंग नेरकर यांनी मानवतावादी कृत्रिम बुद्धिमत्तेवर केलेल्या संशोधनाची माहिती दिली. वेल्डरसाठी दृष्टी वाढवण्यास मोठ्या प्रमाणात त्यांच्या संशोधनाची मदत झाली आहे. नेरकर यांनी शेतकऱ्यांसाठीच्या त्यांच्या नावीन्यपूर्ण अशा पिकांचे कोणतेही दृश्यमान नुकसान होण्यापूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपोआप कीड, रोग आणि पिकांमधील कमतरता शोधणाऱ्या संशोधनाची तपशीलवार माहिती दिली.
यात टोमॅटोमधील पिकणे क्रिया, बटाट्यातील उशिरा होणारा अनिष्ट निदान, द्राक्षांमध्ये ब्रिक्स शोधणे यांचे थेट ऑनलाइन प्रात्यक्षिकही दिले. ऑक्सफर्डचे विद्यार्थ्यांनीही या संशोधनाची प्रशंसा केली. यासोबतच त्यांनी अनोख्या कोलाबोरेटिव्ह युतीवर आधारित तैनाती मॉडेलची माहिती दिली. जिथे ते त्यांच्या नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे आंतरराष्ट्रीय सहयोग, शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संस्था एकत्र करत आहेत.
बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून जे सातत्यपूर्ण संशोधन व विकास सुरु आहे त्याची ऑक्सफर्डच्या विद्यार्थ्यांनी प्रशंसा केली, प्रात्यक्षिकांसह केलेले सादरीकरण विद्यार्थ्यांना आवडले. भविष्यात याच पद्धतीने आदानप्रदान सुरु राहील
– पीटर हॉलंड, डीन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी.
बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने गेल्या काही वर्षात सुरु असलेले कृषी संशोधनाचे प्रयत्न प्रत्यक्ष पाहणे हे ऑक्सफर्डच्या विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण व वेगळे होते. भविष्यात ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत विविध विषयांवर आदान प्रदान केले जाईल.
– डॉ. अजित जावकर, संचालक,
आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग, ऑक्सफर्ड विद्यापीठ.

[ad_2]
Source link