बारामतीत आठशे रोहित्र बंद

माळेगाव, जि. पुणे ः ‘कृषी पंप वीज धोरण २०२०’नुसार थकबाकी बिलाला ६६ टक्क्यांपर्यंत सूट मिळत असतानाही बारामती तालुक्यातील सुमारे २० हजार शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे. परिणामी शेतीपंपाचे वीजबिलाची थकबाकी ७८ कोटी ७७ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वसुलीसाठी मोठी कारवाई करत, सुमारे ८००पेक्षा अधिक रोहित्रे (ट्रान्स्फार्मर) थेट बंद करण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असला तरी, कंपनीने मात्र ही कारवाई नियमानुसार व नाइलाजास्तव केल्याचे सांगितले.

  बारामती तालुक्यात विशेषतः बागायत पट्ट्यात वीजेची मोठी थकबाकी वाढली आहे. त्या कारणास्तव वीज वितरण कंपनीने थेट वीज पुरवठा खंडीत करण्याच्या मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तालुक्यातील माळेगाव बुद्रूक, माळेगाव खुर्द, पाहुणेवाडी, काटेवाडी, पणदरे, सांगवी, नीरावागज आदी भागातील आठशेपेक्षा जास्त रोहित्र (ट्रान्स्फार्मर) बंद केली आहेत. सहाजिकच या अचानकपणे झालेल्या कारवाईमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मशागतीची कामे सुरू झाली आहेत. शिवारात गहू, हरबरा आदी पिके लागवडीसाठी पाण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गावोगावी निर्माण झाला आहे, असे असतानाही वीज वितरण कंपनीने थकीत बिले भरल्याखेरीज वीज पुरवठा सुरळीत होणार नसल्याचे कळविले आहे. 

या बाबत उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे म्हणाले, ‘‘कृषीपंप वीज धोरण २०२०ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायद्याची आहे. बारामतीमधील साडेदहा हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत १८ कोटी १५ लाख रुपये वीज देयके भरली आहेत. विशेषतः या शेतकऱ्यांची ६६ टक्क्यांपर्यंत वीज बिल माफ झाल्याची नोंद आहे. परंतु अद्याप २० हजार शेतकरी ग्राहकांनी या योजनेकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले नाही. वास्तविक थकबाकीदार शेतकऱ्यांना कंपनीने जनजागृतीद्वारे वरील योजनेचे महत्व पटवून दिले आहे. असे असतानाही शेतीपंपाचे वीजबील थकबाकी ७८ कोटी ७७ लाखांच्या पुढे गेली आहे.

थकबाकीचा वाढता आकडा विचारात घेता कंपनीला नाइलाजास्तव संबंधित शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद करावा लागला आहे.’’  दुसरीकडे, माळेगाव शाखेअंतर्गत तब्बल ५ कोटी ३८ लाख रुपयांपेक्षा आधिक थकबाकी वाढत चालली आहे. या शाखेअंतर्गत अद्याप ७४५ शेतकऱ्यांनी वीजबिले भरली नसल्याने येथील तब्बल १०६ रोहित्र बंद केली आहेत.

नियमित शेतकऱ्यांवर अन्याय नको 
उसाच्या बिलातून वीजबिलासारखी मोठी देणी देणे शेतकऱ्यांना शक्य होते. सध्याला माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून ऊस तोडीला वेग आला आहे. ज्यांच्या तोडी झाल्या आहेत त्यांना अद्याप एफआरपीचे धोरण निश्चित झाले नसल्याने पैसे मिळाले नाहीत. याचा विचार करून खरेतर वीज कंपनीने केलेली कारवाई साधारणतः जानेवारीपर्यंत मागे घ्यावी, असे मत संचालक अनिल तावरे यांनी म्हटले आहे. तसेच अनेकांनी वीज भरणा केलेला आहे, मात्र त्यांना नाहकपणे वीज कंपनीच्या सरसकट कारवाईचा त्रास होत आहे. गावोगावचे रोहित्रे सरसकट बंद केल्यामुळे नियमित ग्राहकांवर आन्याय होत आहे, असल्याची नाराजी शेतकरी मोतीराम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

News Item ID: 
820-news_story-1637592940-awsecm-206
Mobile Device Headline: 
बारामतीत आठशे रोहित्र बंद
Appearance Status Tags: 
Mukhya News
Eight hundred Rohitras closed in BaramatiEight hundred Rohitras closed in Baramati
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi Eight hundred Rohitras closed in Baramati
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कृषी agriculture वीज बारामती पुणे शेती farming कंपनी company बागायत रब्बी हंगाम गहू wheat ऊस एफआरपी fair and remunerative price frp राम शिंदे
Search Functional Tags: 
कृषी, Agriculture, वीज, बारामती, पुणे, शेती, farming, कंपनी, Company, बागायत, रब्बी हंगाम, गहू, wheat, ऊस, एफआरपी, Fair and Remunerative price, FRP, राम शिंदे
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Eight hundred Rohitras closed in Baramati
Meta Description: 
Eight hundred Rohitras closed in Baramati

‘कृषी पंप वीज धोरण २०२०’नुसार थकबाकी बिलाला ६६ टक्क्यांपर्यंत सूट मिळत असतानाही बारामती तालुक्यातील सुमारे २० हजार शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X