बीडमध्ये होणार कोष खरेदी

बीड : सतत विस्तारणाऱ्या व संकटात शेतकऱ्यांना शाश्वत आधार देणाऱ्या रेशीम उद्योगांतर्गत मराठवाड्यातील बीड येथे रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू होणार आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीने रेशीम विभागाच्या समन्वयातून व रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीतून कोष खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही बाजारपेठ सुरू करण्याच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मराठवाड्यात रेशीम उद्योगाचे जाळे अधिक घट्ट बनत चालले आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्ही संकटात रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाला आपलसं केलं आहे. मराठवाड्यातील रेशीम उद्योगात बीड जिल्ह्याची आघाडी आहे. जिल्ह्यात जवळपास ३५९३ शेतकरी असून ३७८६ एकरांवर तुती लागवड आहे. २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात ६५० टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले, तर चालू वर्षी जवळपास ७०० टन रेशीम कोष उत्पादन अपेक्षित आहे. जिल्ह्यात एका ऑटोमॅटिक रेलिंग युनिटची मागणी असून, २ मिनी रेलिंग युनिट सुरू आहेत. जाणकारांच्या मते जिल्ह्यात किमान ५ ॲटोमॅटिक रेलिंग युनिट चालू शकतील, अशी जिल्ह्याची कोष उत्पादन क्षमता आहे. माहितीनुसार संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात जेवढे कोष उत्पादन होते तेवढे एकट्या बीड जिल्ह्यात होते. तर उत्तम दर्जाचे कोष जिल्ह्यात उत्पादित होत असल्याने रामनगरमच्या कोष बाजारात मागणी असते. 

बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी सुरू करण्यासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या ६ नोव्हेंबरला खरेदी सुरू करणे नियोजित आहे. ऑनलाइन पद्धतीने ही सर्व खरेदी प्रक्रिया होणार असून त्यासाठी स्वतंत्र बॅंक खातेही उघडण्यात आले आहे. रामनगरम, जालना, अंबाजोगाई आदी ठिकाणाहून कोष खरेदीसाठी व्यापारी येतील, अशी व्यवस्था करतो आहोत.
– अशोक वाघिरे, सचिव, कृउबास बीड

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचा रेशीम कोष खरेदी बाजारपेठेसाठीचा पुढाकार रेशीम कोष प्रक्रियेची संधी निर्माण करणारा ठरणार आहे. बीड जिल्ह्याची रेशीम कोष उत्पादनातील आघाडी ती संधी उपलब्ध करून देते आहे. त्या दिशेने कोष खरेदीच पहिलं पाऊल आहे.
– दिलीप हाके, उपसंचालक रेशीम, प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद

News Item ID: 
820-news_story-1635339421-awsecm-216
Mobile Device Headline: 
बीडमध्ये होणार कोष खरेदी
Appearance Status Tags: 
Mukhya News
Funds to be purchased in BeedFunds to be purchased in Beed
Mobile Body: 

बीड : सतत विस्तारणाऱ्या व संकटात शेतकऱ्यांना शाश्वत आधार देणाऱ्या रेशीम उद्योगांतर्गत मराठवाड्यातील बीड येथे रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू होणार आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीने रेशीम विभागाच्या समन्वयातून व रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीतून कोष खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही बाजारपेठ सुरू करण्याच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मराठवाड्यात रेशीम उद्योगाचे जाळे अधिक घट्ट बनत चालले आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्ही संकटात रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाला आपलसं केलं आहे. मराठवाड्यातील रेशीम उद्योगात बीड जिल्ह्याची आघाडी आहे. जिल्ह्यात जवळपास ३५९३ शेतकरी असून ३७८६ एकरांवर तुती लागवड आहे. २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात ६५० टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले, तर चालू वर्षी जवळपास ७०० टन रेशीम कोष उत्पादन अपेक्षित आहे. जिल्ह्यात एका ऑटोमॅटिक रेलिंग युनिटची मागणी असून, २ मिनी रेलिंग युनिट सुरू आहेत. जाणकारांच्या मते जिल्ह्यात किमान ५ ॲटोमॅटिक रेलिंग युनिट चालू शकतील, अशी जिल्ह्याची कोष उत्पादन क्षमता आहे. माहितीनुसार संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात जेवढे कोष उत्पादन होते तेवढे एकट्या बीड जिल्ह्यात होते. तर उत्तम दर्जाचे कोष जिल्ह्यात उत्पादित होत असल्याने रामनगरमच्या कोष बाजारात मागणी असते. 

बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी सुरू करण्यासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या ६ नोव्हेंबरला खरेदी सुरू करणे नियोजित आहे. ऑनलाइन पद्धतीने ही सर्व खरेदी प्रक्रिया होणार असून त्यासाठी स्वतंत्र बॅंक खातेही उघडण्यात आले आहे. रामनगरम, जालना, अंबाजोगाई आदी ठिकाणाहून कोष खरेदीसाठी व्यापारी येतील, अशी व्यवस्था करतो आहोत.
– अशोक वाघिरे, सचिव, कृउबास बीड

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचा रेशीम कोष खरेदी बाजारपेठेसाठीचा पुढाकार रेशीम कोष प्रक्रियेची संधी निर्माण करणारा ठरणार आहे. बीड जिल्ह्याची रेशीम कोष उत्पादनातील आघाडी ती संधी उपलब्ध करून देते आहे. त्या दिशेने कोष खरेदीच पहिलं पाऊल आहे.
– दिलीप हाके, उपसंचालक रेशीम, प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद

English Headline: 
Agriculture news in Marathi Funds to be purchased in Beed
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
बीड beed उत्पन्न बाजार समिती agriculture market committee विभाग sections पुढाकार initiatives दुष्काळ महाराष्ट्र maharashtra व्यापार वाघ औरंगाबाद aurangabad
Search Functional Tags: 
बीड, Beed, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, विभाग, Sections, पुढाकार, Initiatives, दुष्काळ, महाराष्ट्र, Maharashtra, व्यापार, वाघ, औरंगाबाद, Aurangabad
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Funds to be purchased in Beed
Meta Description: 
Funds to be purchased in Beed
सतत विस्तारणाऱ्या व संकटात शेतकऱ्यांना शाश्वत आधार देणाऱ्या रेशीम उद्योगांतर्गत मराठवाड्यातील बीड येथे रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू होणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X