बेदाण्याचे सौदे लांबणीवर पडल्याने शेतकरी अडचणीत 

सांगली ः बेदाणा व्यापाऱ्यांकडून अजूनही शून्य पेमेंट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोशिएशनने शून्य पेमेंट पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. मात्र शून्य पेमेंट वेळेत पूर्ण झाले नसल्याने बेदाण्याचे सौदे लांबणीवर पडल्याने शेतकरी अडचणीत सापडले असल्याचे चित्र आहे. 

बेदाण्याचे सौदे दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटसाठी बंद ठेवण्यात आले. येणे-देणे पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता. मंगळवारी (ता. १६) येणे-देणे पूर्ण करून सौदे सुरू करण्याचे नियोजन होते. बेदाणा व्यापाऱ्यांनी शून्य पेमेंट पूर्ण करण्यासाठी पुढे आले होते. मात्र अनेक व्यापाऱ्यांनी अद्यापही शून्य पेमेंट पूर्ण केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बेदाणा व्यापारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत शून्य पेमेंट पूर्ण झाले

नसल्याने व्यापारी संघटनेने मंगळवारपर्यंत (ता. २३) मुदत वाढ दिली आहे. बुधवारी (ता. २४) बाजार समितीची सर्वसाधारण बैठक आहे. त्या बैठकीत पुन्हा शून्य-पेमेंटबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत किती व्यापाऱ्यांनी शून्य पेमेंट पूर्ण केले आहे, याची माहिती समोर येईल. येणे-देणे पूर्ण झाले असेल तरच बेदाण्याचे सौदे गुरुवारपासून सुरू होतील. 

तासगाव बाजार समितीने झिरो पेमेंट वेळेत होण्यासाठी दक्षता घेतली होती. मात्र सांगली बाजार समितीने तशी कोणतीही दक्षता घेतली नाही. परिणामी, झिरो पेमेंट वेळेत होऊ शकले नाही. दरम्यान, एका बाजूने शून्य पेमेंटसाठी मुदत वाढ दिली असली, तरी व्यापाऱ्यांकडून येणे-देणे पूर्ण करण्यासाठी हालचाली कुठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. मात्र यंदाच्या वर्षीही झिरो पेमेंटची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळाली असून, वाढीव मुदतीत तरी येणे-देणे पूर्ण होईल का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

हंगामाचे आर्थिक गणित अडचणीत 
गेल्या वर्षीदेखील शून्य पेमेंट वेळत झाले नसल्याने बेदाण्याचे सौदे उशिरा सुरू झाले होते. वास्तविक पाहता, सध्या द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचा बेदाणा शिल्लक आहे. ते शेतकरी बेदाणा विक्री करून बागेसाठी लागणारा पैसा उभा करतात. परंतु सध्या बेदाण्याचे सौदे सुरू नसल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पैसा कसा उपलब्ध करायचा असा प्रश्‍न पडला आहे.  

News Item ID: 
820-news_story-1637333719-awsecm-875
Mobile Device Headline: 
बेदाण्याचे सौदे लांबणीवर पडल्याने शेतकरी अडचणीत 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Farmers in trouble due to delay in raisin dealsFarmers in trouble due to delay in raisin deals
Mobile Body: 

सांगली ः बेदाणा व्यापाऱ्यांकडून अजूनही शून्य पेमेंट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोशिएशनने शून्य पेमेंट पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. मात्र शून्य पेमेंट वेळेत पूर्ण झाले नसल्याने बेदाण्याचे सौदे लांबणीवर पडल्याने शेतकरी अडचणीत सापडले असल्याचे चित्र आहे. 

बेदाण्याचे सौदे दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटसाठी बंद ठेवण्यात आले. येणे-देणे पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता. मंगळवारी (ता. १६) येणे-देणे पूर्ण करून सौदे सुरू करण्याचे नियोजन होते. बेदाणा व्यापाऱ्यांनी शून्य पेमेंट पूर्ण करण्यासाठी पुढे आले होते. मात्र अनेक व्यापाऱ्यांनी अद्यापही शून्य पेमेंट पूर्ण केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बेदाणा व्यापारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत शून्य पेमेंट पूर्ण झाले

नसल्याने व्यापारी संघटनेने मंगळवारपर्यंत (ता. २३) मुदत वाढ दिली आहे. बुधवारी (ता. २४) बाजार समितीची सर्वसाधारण बैठक आहे. त्या बैठकीत पुन्हा शून्य-पेमेंटबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत किती व्यापाऱ्यांनी शून्य पेमेंट पूर्ण केले आहे, याची माहिती समोर येईल. येणे-देणे पूर्ण झाले असेल तरच बेदाण्याचे सौदे गुरुवारपासून सुरू होतील. 

तासगाव बाजार समितीने झिरो पेमेंट वेळेत होण्यासाठी दक्षता घेतली होती. मात्र सांगली बाजार समितीने तशी कोणतीही दक्षता घेतली नाही. परिणामी, झिरो पेमेंट वेळेत होऊ शकले नाही. दरम्यान, एका बाजूने शून्य पेमेंटसाठी मुदत वाढ दिली असली, तरी व्यापाऱ्यांकडून येणे-देणे पूर्ण करण्यासाठी हालचाली कुठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. मात्र यंदाच्या वर्षीही झिरो पेमेंटची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळाली असून, वाढीव मुदतीत तरी येणे-देणे पूर्ण होईल का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

हंगामाचे आर्थिक गणित अडचणीत 
गेल्या वर्षीदेखील शून्य पेमेंट वेळत झाले नसल्याने बेदाण्याचे सौदे उशिरा सुरू झाले होते. वास्तविक पाहता, सध्या द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचा बेदाणा शिल्लक आहे. ते शेतकरी बेदाणा विक्री करून बागेसाठी लागणारा पैसा उभा करतात. परंतु सध्या बेदाण्याचे सौदे सुरू नसल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पैसा कसा उपलब्ध करायचा असा प्रश्‍न पडला आहे.  

English Headline: 
Agriculture News in Marathi Farmers in trouble due to delay in raisin deals
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
तासगाव व्यापार सांगली sangli दिवाळी बाजार समिती agriculture market committee गणित mathematics द्राक्ष
Search Functional Tags: 
तासगाव, व्यापार, सांगली, Sangli, दिवाळी, बाजार समिती, agriculture Market Committee, गणित, Mathematics, द्राक्ष
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmers in trouble due to delay in raisin deals
Meta Description: 
Farmers in trouble due to delay in raisin deals
बेदाणा व्यापाऱ्यांकडून अजूनही शून्य पेमेंट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोशिएशनने शून्य पेमेंट पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. मात्र शून्य पेमेंट वेळेत पूर्ण झाले नसल्याने बेदाण्याचे सौदे लांबणीवर पडल्याने शेतकरी अडचणीत सापडले असल्याचे चित्र आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X