बैलगाडा शर्यत  सुनावणी होणार बुधवारी?

मंचर, जि. पुणे ः बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरू होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (ता. १५) होणारी सुनावणी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी (ता. १७) सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासमवेत पशुसंवर्धन खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी, विधीज्ञ व बैलगाडा मालक आहेत. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी युक्तिवाद होण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांबरोबर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी संवाद साधला. 

शनिवारी (ता.१३) सायंकाळी ज्येष्ठ विधीज्ञ शेखर नाफडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री सुनील केदार, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी चर्चा केली. या वेळी पशुसंवर्धन खात्याचे उपायुक्त डॉ. शैलेश केंडे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत भड, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे प्रतिनिधी संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर सहभागी झाले होते. 

रविवारी (ता. १४) नवी दिल्लीत मंत्री केदार यांनी ॲड. शेखर नाफडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मुकुल रोहोतगी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. या वेळी झालेल्या चर्चेत मुंबईहून वळसे पाटील सहभागी झाले होते. या संदर्भाने सरकारी वकील ॲड. सचिन पाटील म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दिलेला आहे. सुनावणीची तयारी चालू आहे. त्याकरिता पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार दिल्लीत आले आहेत.’’ 

निकाल लावून घेऊ ः मंत्री केदार 
चार वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या विषयाला चालना दिली आहे. सोमवारी (ता. १५) या विषयी सुनावणी होणार होती, पण तांत्रिक अडचणीमुळे सुनावणी पुढे ढकलली आहे, पण दोन दिवसांत सुनावणी होईल. दीड महिन्यांमध्ये निकाल लावून घेऊ, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला आहे. 
 
प्रतिक्रिया

बैलगाडा मालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. गेली अनेक वर्ष निर्णयाकडे बैलगाडाप्रेमी डोळे लावून बसले आहेत. 
-बाळासाहेब आरुडे, बैलगाडा मालक, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव)

News Item ID: 
820-news_story-1636985397-awsecm-357
Mobile Device Headline: 
बैलगाडा शर्यत  सुनावणी होणार बुधवारी?
Appearance Status Tags: 
Mukhya News
Bullock cart race Hearing on Wednesday?Bullock cart race Hearing on Wednesday?
Mobile Body: 

मंचर, जि. पुणे ः बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरू होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (ता. १५) होणारी सुनावणी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी (ता. १७) सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासमवेत पशुसंवर्धन खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी, विधीज्ञ व बैलगाडा मालक आहेत. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी युक्तिवाद होण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांबरोबर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी संवाद साधला. 

शनिवारी (ता.१३) सायंकाळी ज्येष्ठ विधीज्ञ शेखर नाफडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री सुनील केदार, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी चर्चा केली. या वेळी पशुसंवर्धन खात्याचे उपायुक्त डॉ. शैलेश केंडे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत भड, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे प्रतिनिधी संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर सहभागी झाले होते. 

रविवारी (ता. १४) नवी दिल्लीत मंत्री केदार यांनी ॲड. शेखर नाफडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मुकुल रोहोतगी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. या वेळी झालेल्या चर्चेत मुंबईहून वळसे पाटील सहभागी झाले होते. या संदर्भाने सरकारी वकील ॲड. सचिन पाटील म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दिलेला आहे. सुनावणीची तयारी चालू आहे. त्याकरिता पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार दिल्लीत आले आहेत.’’ 

निकाल लावून घेऊ ः मंत्री केदार 
चार वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या विषयाला चालना दिली आहे. सोमवारी (ता. १५) या विषयी सुनावणी होणार होती, पण तांत्रिक अडचणीमुळे सुनावणी पुढे ढकलली आहे, पण दोन दिवसांत सुनावणी होईल. दीड महिन्यांमध्ये निकाल लावून घेऊ, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला आहे. 
 
प्रतिक्रिया

बैलगाडा मालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. गेली अनेक वर्ष निर्णयाकडे बैलगाडाप्रेमी डोळे लावून बसले आहेत. 
-बाळासाहेब आरुडे, बैलगाडा मालक, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव)

English Headline: 
Agriculture News in Marathi Bullock cart race Hearing on Wednesday?
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
बैलगाडा शर्यत bullock cart race सर्वोच्च न्यायालय मंचर manchar पुणे सुनील केदार दिल्ली दिलीप वळसे पाटील व्हिडिओ सतेज पाटील satej patil खासदार अमोल कोल्हे भारत सरकार government वकील वर्षा varsha विषय topics विकास बाळ baby infant
Search Functional Tags: 
बैलगाडा शर्यत, Bullock Cart Race, सर्वोच्च न्यायालय, मंचर, Manchar, पुणे, सुनील केदार, दिल्ली, दिलीप वळसे पाटील, व्हिडिओ, सतेज पाटील, Satej Patil, खासदार, अमोल कोल्हे, भारत, सरकार, Government, वकील, वर्षा, Varsha, विषय, Topics, विकास, बाळ, baby, infant
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Bullock cart race Hearing on Wednesday?
Meta Description: 
Bullock cart race Hearing on Wednesday?
बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरू होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (ता. १५) होणारी सुनावणी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी (ता. १७) सुनावणी होण्याची शक्यता आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X