ब्राझीलमध्ये सोयाबीनची ८६ टक्के पेरणी पूर्ण 

पुणे ः यंदा पेरणीला पोषक वातावरण असल्याने ब्राझीलमध्ये सोमवारपर्यंत (ता. २२) सरासरी क्षेत्राच्या ८६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्याचे पेरणी मागील वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी अधिक आहे. मात्र दक्षिण भागात पाऊस कमी असल्याने मका पिकाला फटका बसत आहे. त्यातच पुढील काळात कोरडे हवामान राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी सोयाबीन पेरणी उरकण्याला प्राधान्य देत आहेत, असे येथील एका संस्थेने म्हटले आहे. 

जागतिक पातळीवर २०२०-२१च्या हंगामात ब्राझील सोयाबीन उत्पादनात पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर अमेरिका, अर्जेंटिना, चीन आणि नंतर भारताचा नंबर लागतो. ब्राझीलच्या कोनाब या सरकारी संस्थेने यंदा १४२० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील हंगाम २०२०-२१मध्ये येथे १३७३ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते.

यंदा उत्पादनात ८.४ टक्के म्हणजेच ४७ लाख टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर यंदा सोयाबीन लागवडीत साडेतीन टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदा येथे ४०२ लाख हेक्टरवर सोयाबीन पीक फुलण्याची शक्यता असून, उत्पादकता ३५२६ किलो प्रति हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. 

यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने येथे सोयाबीन पेरणीने वेग घेतला आहे. आतापर्यंत येथे ८६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ब्राझीलमधील रिओ ग्रॅंडे डोसूल या राज्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्या पेरणी जोरात सुरू आहे. तसेच रिओ ग्रॅंडे डोसूल राज्यात नुकत्याच झालेल्या पावसाने सोयाबीनसह मका पिकालाही दिलासा मिळाला. या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात लागवड झालेल्या सोयाबीन आणि मका पिकांचे नुकसान होत असल्याचे वृत्त आहे. 

कीड-रोगांचा प्रादुर्भाव 
ब्राझीलमधील पराना राज्य आणि लागून असलेल्या पराग्वे देशात सोयाबीन पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त येथील स्थानिक माध्यमांनी दिले आहे. हा प्रादुर्भाव प्राथमिक पातळीवर असल्याने यावर नियंत्रण शक्य असल्याचे येथील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सूचना देऊन नियंत्रणाचे उपाय सुचविले आहेत.

News Item ID: 
820-news_story-1637678068-awsecm-980
Mobile Device Headline: 
ब्राझीलमध्ये सोयाबीनची ८६ टक्के पेरणी पूर्ण 
Appearance Status Tags: 
Mukhya News
86% soybean sowing completed in Brazil86% soybean sowing completed in Brazil
Mobile Body: 

पुणे ः यंदा पेरणीला पोषक वातावरण असल्याने ब्राझीलमध्ये सोमवारपर्यंत (ता. २२) सरासरी क्षेत्राच्या ८६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्याचे पेरणी मागील वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी अधिक आहे. मात्र दक्षिण भागात पाऊस कमी असल्याने मका पिकाला फटका बसत आहे. त्यातच पुढील काळात कोरडे हवामान राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी सोयाबीन पेरणी उरकण्याला प्राधान्य देत आहेत, असे येथील एका संस्थेने म्हटले आहे. 

जागतिक पातळीवर २०२०-२१च्या हंगामात ब्राझील सोयाबीन उत्पादनात पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर अमेरिका, अर्जेंटिना, चीन आणि नंतर भारताचा नंबर लागतो. ब्राझीलच्या कोनाब या सरकारी संस्थेने यंदा १४२० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील हंगाम २०२०-२१मध्ये येथे १३७३ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते.

यंदा उत्पादनात ८.४ टक्के म्हणजेच ४७ लाख टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर यंदा सोयाबीन लागवडीत साडेतीन टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदा येथे ४०२ लाख हेक्टरवर सोयाबीन पीक फुलण्याची शक्यता असून, उत्पादकता ३५२६ किलो प्रति हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. 

यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने येथे सोयाबीन पेरणीने वेग घेतला आहे. आतापर्यंत येथे ८६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ब्राझीलमधील रिओ ग्रॅंडे डोसूल या राज्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्या पेरणी जोरात सुरू आहे. तसेच रिओ ग्रॅंडे डोसूल राज्यात नुकत्याच झालेल्या पावसाने सोयाबीनसह मका पिकालाही दिलासा मिळाला. या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात लागवड झालेल्या सोयाबीन आणि मका पिकांचे नुकसान होत असल्याचे वृत्त आहे. 

कीड-रोगांचा प्रादुर्भाव 
ब्राझीलमधील पराना राज्य आणि लागून असलेल्या पराग्वे देशात सोयाबीन पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त येथील स्थानिक माध्यमांनी दिले आहे. हा प्रादुर्भाव प्राथमिक पातळीवर असल्याने यावर नियंत्रण शक्य असल्याचे येथील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सूचना देऊन नियंत्रणाचे उपाय सुचविले आहेत.

English Headline: 
Agriculture News in Marathi 86% soybean sowing completed in Brazil
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे ऊस पाऊस हवामान सोयाबीन मात mate ब्राझील चीन भारत सरकार government कृषी विभाग agriculture department विभाग sections
Search Functional Tags: 
पुणे, ऊस, पाऊस, हवामान, सोयाबीन, मात, mate, ब्राझील, चीन, भारत, सरकार, Government, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
86% soybean sowing completed in Brazil
Meta Description: 
86% soybean sowing completed in Brazil
यंदा पेरणीला पोषक वातावरण असल्याने ब्राझीलमध्ये सोमवारपर्यंत (ता. २२) सरासरी क्षेत्राच्या ८६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्याचे पेरणी मागील वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी अधिक आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X