भडगाव, जि. जळगाव : ज्वारीसाठी भडगाव तालुक्याला ८ हजार ६४२ क्विंटलचे उद्दिष्ट 

भडगाव, जि. जळगाव : भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत शेतकरी सहकारी संघामार्फत कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा सबमार्केट भडगाव येथे शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्‌घाटन जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक व भडगाव पीपल बँकेचे अध्यक्ष दत्तात्रय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी आमदार किशोर पाटील यांचा सत्कार शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रतापराव पाटील यांनी केला. जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक यांचा सत्कार संघाचे संचालक भीमराव पाटील यांनी केला. या वेळी तहसीलदार मुकेश हिवाळे, जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील, नगराज पाटील, संघाचे व्हाइस चेअरमन सुभाष पाटील, भडगाव समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, भैयासाहेब पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ. विशाल पाटील आदींनी परिश्रम घेतले. 

भडगाव शेतकरी सहकारी संघात ज्वारीसाठी १५४, मक्यासाठी १६५ व बाजरीसाठी ५ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. तालुक्याला ज्वारी ८ हजार ६४२ क्विंटल, मका १२ हजार ४८२ क्विंटल, बाजरी ७२५ क्विंटलचे उद्दिष्ट दिलेले आहे. मक्यासाठी मर्यादा हेक्टरी १९.३९ क्विंटल, ज्वारीसाठी मर्यादा हेक्टरी १६.५ क्विंटल, बाजरी मर्यादा हेक्टरी ४.५२ प्रतिक्विंटल आहे. मक्याला १ हजार ८७० रुपये, ज्वारी २ हजार ७३८ रुपये व बाजरी २ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. शासकीय भरडधान्य खरेदी करण्याचे प्रशासनाचे नियोजन केले असून बुधवार (ता. २९) पासून सुरू करण्यात आले आहे. याबाबत आमदार किशोर पाटील यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व तहसीलदार मुकेश हिवाळे यांच्यात चर्चा झाली. 

News Item ID: 
820-news_story-1640777721-awsecm-750
Mobile Device Headline: 
भडगाव, जि. जळगाव : ज्वारीसाठी भडगाव तालुक्याला ८ हजार ६४२ क्विंटलचे उद्दिष्ट 
Appearance Status Tags: 
Section News
Target of 8 thousand 642 quintals for Bhadgaon taluka for sorghumTarget of 8 thousand 642 quintals for Bhadgaon taluka for sorghum
Mobile Body: 

भडगाव, जि. जळगाव : भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत शेतकरी सहकारी संघामार्फत कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा सबमार्केट भडगाव येथे शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्‌घाटन जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक व भडगाव पीपल बँकेचे अध्यक्ष दत्तात्रय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी आमदार किशोर पाटील यांचा सत्कार शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रतापराव पाटील यांनी केला. जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक यांचा सत्कार संघाचे संचालक भीमराव पाटील यांनी केला. या वेळी तहसीलदार मुकेश हिवाळे, जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील, नगराज पाटील, संघाचे व्हाइस चेअरमन सुभाष पाटील, भडगाव समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, भैयासाहेब पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ. विशाल पाटील आदींनी परिश्रम घेतले. 

भडगाव शेतकरी सहकारी संघात ज्वारीसाठी १५४, मक्यासाठी १६५ व बाजरीसाठी ५ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. तालुक्याला ज्वारी ८ हजार ६४२ क्विंटल, मका १२ हजार ४८२ क्विंटल, बाजरी ७२५ क्विंटलचे उद्दिष्ट दिलेले आहे. मक्यासाठी मर्यादा हेक्टरी १९.३९ क्विंटल, ज्वारीसाठी मर्यादा हेक्टरी १६.५ क्विंटल, बाजरी मर्यादा हेक्टरी ४.५२ प्रतिक्विंटल आहे. मक्याला १ हजार ८७० रुपये, ज्वारी २ हजार ७३८ रुपये व बाजरी २ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. शासकीय भरडधान्य खरेदी करण्याचे प्रशासनाचे नियोजन केले असून बुधवार (ता. २९) पासून सुरू करण्यात आले आहे. याबाबत आमदार किशोर पाटील यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व तहसीलदार मुकेश हिवाळे यांच्यात चर्चा झाली. 

English Headline: 
agriclture news in marathi,Target of 8 thousand 642 quintals for Bhadgaon taluka for sorghum
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon उत्पन्न जिल्हा बँक आमदार तहसीलदार नगर युवराज पाटील विशाल पाटील vishal patil ज्वारी jowar हमीभाव minimum support price प्रशासन administrations
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, उत्पन्न, जिल्हा बँक, आमदार, तहसीलदार, नगर, युवराज पाटील, विशाल पाटील, Vishal Patil, ज्वारी, Jowar, हमीभाव, Minimum Support Price, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Target of 8 thousand 642 quintals for Bhadgaon taluka for sorghum
Meta Description: 
Target of 8 thousand 642 quintals for Bhadgaon taluka for sorghum
भडगाव, जि. जळगाव : भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत शेतकरी सहकारी संघामार्फत कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा सबमार्केट भडगाव येथे शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्‌घाटन जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment