भारतातून आता निव्वळ  डाळिंब दाण्यांचीही निर्यात 

सोलापूर ः डाळिंब उत्पादनात अग्रेसर असलेल्या भारतातून दर वर्षी सुमारे ३० हून अधिक देशात डाळिंबाची निर्यात होते. पण आता डाळिंबाबरोबरच निव्वळ डाळिंबाच्या दाण्यांनाही काही देशातून मागणी वाढत आहे. डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांसाठी ही संधी आहे. प्राथमिक माहितीनुसार यंदा आतापर्यंत सुमारे दोन हजार टन डाळिंब दाण्यांची निर्यात झाली आहे. 

देशात जवळपास २ लाख ६१ हजार हेक्टर इतके डाळिंबाचे क्षेत्र आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह दहा राज्यांत डाळिंबाचे उत्पादन होते. त्यात सर्वाधिक दीड लाख हेक्टर इतके क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. इराण, स्पेन, चीन, टर्की हे देश भारताबरोबर डाळिंब उत्पादनात स्पर्धा करतात. पण एकूणच डाळिबाची चव, रंग, आकारमान या सर्व पातळ्यांवर भारताचे डाळिंबाचे भगवे वाण सरस आहे. प्रामुख्याने अरब अमिरातीसह बांगलादेश, कतार, नेदरलॅण्ड, सौदी अरेबिया, ओमान, बहरीन, श्रीलंका या देशांसह सुमारे ३० हून अधिक देशांत भारतीय डाळिंबाला पसंती मिळते. जगभरातील एकूण डाळिंब निर्यातीत २२ टक्के वाटा भारताचा आहे.

यंदा डाळिंबाबरोबरच निव्वळ डाळिंबाच्या दाण्यांचीही दोन हजार टनापर्यंत निर्यात झाली आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही निर्यातदारांकडून ही निर्यात झाली आहे. त्या शिवाय सुमारे ६७ हजार ९८० टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. त्यातून ५१६ कोटी ६७ लाखांचे परकीय चलन मिळाले आहे, यावरून निर्यातीतील भारताचा वाटा स्पष्ट होतो. 
 
दाणे निर्यातीला महत्त्व का? 
अलीकडच्या काही वर्षांत डाळिंबावरील तेल्या आणि इतर बुरशीजन्य रोगांमुळे फळांवर डाग पडतात आणि ती फळे फ्रेश मार्केटिंग वा निर्यातीला चालत नाहीत. शिवाय निर्यातीसाठी जाणाऱ्या डाळिंबाच्या रेसिड्यू फ्री (उर्वरित कीडनाशक अंश) तपासणीत सरसकट डाळिंबाची तपासणी होते. वास्तविक, डाळिंबाच्या सालीमध्ये उर्वरकाचे अंश सापडतात, परंतु दाण्यांमध्ये ते नसतात, अर्थात, डाळिंब दाणे रेसिड्यू फ्री असतात. आता थेट डाळिंबाच्या दाण्यांची निर्यात होणार असल्याने डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांना चांगली संधी आहे. 

दाण्यांना दरही दुप्पट 
डाळिंबाला निर्यातीमध्ये किमान प्रति किलो १५० ते २०० रुपयांपर्यंत गुणवत्ता पाहून दर मिळतो. यंदाही जवळपास पावणेदोनशे रुपयांच्या पुढे दर मिळाले. पण निर्यातदारांना डाळिंबाचे दाणे सोलून ते पॅकिंग करून पुढे विक्रीसाठी नेण्यात थोडे श्रम आणि अतिरिक्त वेळ जात असला, तरी तयार दाणे मिळत असल्याने परदेशी बाजारपेठांत मात्र त्याला प्रति किलो सुमारे ४०० रुपयांपर्यंत दरही दुप्पट मिळाला आहे. 

 प्रतिक्रिया
डाळिंबाच्या दाण्यांना निर्यातीत चांगली संधी आहे. यंदा आम्ही डाळिंब दाण्यांची निर्यात केली. परदेशी बाजारपेठेत त्याला मोठा उठाव मिळतो आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिकदृष्ट्या त्याचा अतिरिक्त फायदा मिळेल. 
-जीव्हीके नायडू, निर्यातदार, हैदराबाद 

प्रतिक्रिया 
ताज्या डाळिंबाच्या दाण्यांची निर्यात हा एक उत्तम पर्याय आहे, ही निर्यात वाढली पाहिजे. निर्यातदार आणि शेतकरी या दोघांसाठीही ही मोठी संधी आहे. 
डॅा. नीलेश गायकवाड, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

News Item ID: 
820-news_story-1637156112-awsecm-542
Mobile Device Headline: 
भारतातून आता निव्वळ  डाळिंब दाण्यांचीही निर्यात 
Appearance Status Tags: 
Mukhya News
 Net from India now Export of pomegranate seeds also Net from India now Export of pomegranate seeds also
Mobile Body: 

सोलापूर ः डाळिंब उत्पादनात अग्रेसर असलेल्या भारतातून दर वर्षी सुमारे ३० हून अधिक देशात डाळिंबाची निर्यात होते. पण आता डाळिंबाबरोबरच निव्वळ डाळिंबाच्या दाण्यांनाही काही देशातून मागणी वाढत आहे. डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांसाठी ही संधी आहे. प्राथमिक माहितीनुसार यंदा आतापर्यंत सुमारे दोन हजार टन डाळिंब दाण्यांची निर्यात झाली आहे. 

देशात जवळपास २ लाख ६१ हजार हेक्टर इतके डाळिंबाचे क्षेत्र आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह दहा राज्यांत डाळिंबाचे उत्पादन होते. त्यात सर्वाधिक दीड लाख हेक्टर इतके क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. इराण, स्पेन, चीन, टर्की हे देश भारताबरोबर डाळिंब उत्पादनात स्पर्धा करतात. पण एकूणच डाळिबाची चव, रंग, आकारमान या सर्व पातळ्यांवर भारताचे डाळिंबाचे भगवे वाण सरस आहे. प्रामुख्याने अरब अमिरातीसह बांगलादेश, कतार, नेदरलॅण्ड, सौदी अरेबिया, ओमान, बहरीन, श्रीलंका या देशांसह सुमारे ३० हून अधिक देशांत भारतीय डाळिंबाला पसंती मिळते. जगभरातील एकूण डाळिंब निर्यातीत २२ टक्के वाटा भारताचा आहे.

यंदा डाळिंबाबरोबरच निव्वळ डाळिंबाच्या दाण्यांचीही दोन हजार टनापर्यंत निर्यात झाली आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही निर्यातदारांकडून ही निर्यात झाली आहे. त्या शिवाय सुमारे ६७ हजार ९८० टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. त्यातून ५१६ कोटी ६७ लाखांचे परकीय चलन मिळाले आहे, यावरून निर्यातीतील भारताचा वाटा स्पष्ट होतो. 
 
दाणे निर्यातीला महत्त्व का? 
अलीकडच्या काही वर्षांत डाळिंबावरील तेल्या आणि इतर बुरशीजन्य रोगांमुळे फळांवर डाग पडतात आणि ती फळे फ्रेश मार्केटिंग वा निर्यातीला चालत नाहीत. शिवाय निर्यातीसाठी जाणाऱ्या डाळिंबाच्या रेसिड्यू फ्री (उर्वरित कीडनाशक अंश) तपासणीत सरसकट डाळिंबाची तपासणी होते. वास्तविक, डाळिंबाच्या सालीमध्ये उर्वरकाचे अंश सापडतात, परंतु दाण्यांमध्ये ते नसतात, अर्थात, डाळिंब दाणे रेसिड्यू फ्री असतात. आता थेट डाळिंबाच्या दाण्यांची निर्यात होणार असल्याने डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांना चांगली संधी आहे. 

दाण्यांना दरही दुप्पट 
डाळिंबाला निर्यातीमध्ये किमान प्रति किलो १५० ते २०० रुपयांपर्यंत गुणवत्ता पाहून दर मिळतो. यंदाही जवळपास पावणेदोनशे रुपयांच्या पुढे दर मिळाले. पण निर्यातदारांना डाळिंबाचे दाणे सोलून ते पॅकिंग करून पुढे विक्रीसाठी नेण्यात थोडे श्रम आणि अतिरिक्त वेळ जात असला, तरी तयार दाणे मिळत असल्याने परदेशी बाजारपेठांत मात्र त्याला प्रति किलो सुमारे ४०० रुपयांपर्यंत दरही दुप्पट मिळाला आहे. 

 प्रतिक्रिया
डाळिंबाच्या दाण्यांना निर्यातीत चांगली संधी आहे. यंदा आम्ही डाळिंब दाण्यांची निर्यात केली. परदेशी बाजारपेठेत त्याला मोठा उठाव मिळतो आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिकदृष्ट्या त्याचा अतिरिक्त फायदा मिळेल. 
-जीव्हीके नायडू, निर्यातदार, हैदराबाद 

प्रतिक्रिया 
ताज्या डाळिंबाच्या दाण्यांची निर्यात हा एक उत्तम पर्याय आहे, ही निर्यात वाढली पाहिजे. निर्यातदार आणि शेतकरी या दोघांसाठीही ही मोठी संधी आहे. 
डॅा. नीलेश गायकवाड, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

English Headline: 
Agriculture News in Marathi Net from India now Export of pomegranate seeds also
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
डाळ डाळिंब भारत सोलापूर पूर floods महाराष्ट्र maharashtra कर्नाटक मध्य प्रदेश madhya pradesh राजस्थान स्पर्धा day बांगलादेश ओमान श्रीलंका आंध्र प्रदेश वर्षा varsha हैदराबाद
Search Functional Tags: 
डाळ, डाळिंब, भारत, सोलापूर, पूर, Floods, महाराष्ट्र, Maharashtra, कर्नाटक, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, राजस्थान, स्पर्धा, Day, बांगलादेश, ओमान, श्रीलंका, आंध्र प्रदेश, वर्षा, Varsha, हैदराबाद
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Net from India now Export of pomegranate seeds also
Meta Description: 
Net from India now
Export of pomegranate seeds also
डाळिंब उत्पादनात अग्रेसर असलेल्या भारतातून दर वर्षी सुमारे ३० हून अधिक देशात डाळिंबाची निर्यात होते. पण आता डाळिंबाबरोबरच निव्वळ डाळिंबाच्या दाण्यांनाही काही देशातून मागणी वाढत आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X