भारतात पामतेल आयात वाढणार; यूएसडीएचा अंदाज

पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात मोठी कपात केल्यानंतर पामतेल आयात वाढली आहे. पामतेल आयात चालू हंगामात ८६ लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. मागील हंगामात ८५ लाख टन पामतेलाची आयात झाली होती, तर फक्त सप्टेंबर महिन्यातच १२.६२ लाख टन पामतेल देशात आले, अशी माहिती यूएसडीएने दिली. 

अमेरिकेच्या कृषी विभागाने ‘ऑइलसीड्स : वर्ल्ड मार्केट अॅन्ड ट्रेड’ आउटलूकमध्ये म्हटले, की भारताची पामतेल आयात २०२०-२१ च्या हंगामात ४ लाख ७० हजार टनांनी वाढून ८५ लाख टनांवर पोहोचली होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात मोठी कपात केल्याने पामतेल आयात वाढणार आहे, असे यूएसडीएने म्हटले आहे. 

जगातील काही पामतेल निर्यातदारांनी भारताला आधीच मोठा पुरवठा केला आहे. भारत सरकारने पहिल्यांदा खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली तेव्हा पामतेल आयात मोठ्या प्रमाणात झाली. त्या वेळी जानेवारी ते जुलै २०२१ या काळात दर महिन्याला सरासरी झालेल्या पामतेल आयातीपेक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दुप्पट आयात झाली होती. नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत पाम तेल आयात तीन लाख टनांनी वाढून ८६ लाख टनांवर पोहोचेल, असे यूएसडीएने म्हटले आहे. 

देशात सप्टेंबर महिन्यात विक्रमी १२.६२ लाख टन पामतेल आयात झाली होती. भारताला पामतेल निर्यात करणार इंडोनेशिया महत्त्वाचा देश आहे. भारताकडून वाढलेल्या मागणीचा सर्वाधिक फायदा इंडोनेशियाला झाला. सप्टेंबर महिन्यात इंडोनेशियाने निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतरही याच महिन्यात कच्च्या पामतेलाची सर्वाधिक निर्यात केली. सप्टेबरमध्ये मलेशिया आणि थायलंडमधूनही भारतात निर्यात वाढली होती, असे यूएसडीएने म्हटले आहे. 

तेलबिया उत्पादन घटणार 
यंदा जागतिक पातळीवर तेलबियांचे उत्पादन घटण्याचा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला आहे. यात सोयाबीन उत्पादनातही घट होणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिका आणि अर्जेंटिनात सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे. इराणमध्ये मोहरी, युरोपियन युनियनमध्ये सूर्यफूल आणि ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्ये सरकीच्या उत्पादनात घट होणार आहे. तर जागितक तेलबिया गाळप १० लाख टनांनी वाढणार आहे. ब्राझीलमधून सोयाबीनची निर्यात वाढली तरीही अमेरिका आणि अर्जेंटिनाची घटलेली निर्यात आणि कॅनडामधून मोहरीच्या निर्यातीला लागलेला ब्रेक यामुळे तेलबियांचा जागतिक व्यापार कमी झाला आहे, असे यूएसडीएने म्हटले आहे. 

जागितक तेलबिया साठा अधिक 
मागील वर्षी ब्राझीलमधील सोयाबीन काढणीमुळे जागतिक तेलबिया उत्पादन १० लाख टनांनी वाढले होते. तसेच जागतिक तेलबिया व्यापारही काहीसा वाढला होता. त्यामुळे जागतिक तेलबिया गाळप १० लाख टनांनी वाढले होते. अर्जेंटिनात गाळप वाढल्याने जागितक गाळपाचा आकडा वाढला होता. अर्जेंटिनात सोयाबीन गाळप वाढून साठा कमी झाला असला, तरी ब्राझील आणि चीनमध्ये साठा अधिक असल्याने जागतिक साठा वाढला आहे. 

तेलबिया पेंडेचे उत्पादन वाढणार 
तेलबियांचे गाळप वाढणार असल्याने पेंडेचे उत्पादन वाढेल, असे यूएसडीएने म्हटले आहे. भारताकडून वाढलेली सोयापेंड निर्यात आणि कॅनडाने मोहरीऐवजी मोहरी पदार्थ निर्याताला पसंती दिल्याने तेलबिया पेंड निर्यात वाढणार आहे. अर्जेंटिना आणि भारतात सोयापेंडचा साठा अधिक असल्याने जागितक तेलबिया पेंडेचा साठाही अधिक राहिल, असे य़ुएसडीएने म्हटले आहे. चीनमध्ये सोयाबीन पेंड प्रक्रिया कमी झाल्याने जागितक तेलबिया पेंडेचे उत्पादन घटणार आहे. जागितक तेलबिया पेंडेची निर्यात वाढणार आहे. चीनमध्ये सोयापेंडचा वापर कमी होण्याची शक्यता असून जागितक वापरही कमी राहिल. तसेच भारत आणि अर्जेंटिना या देशांत सोयाबीन पेंडचा साठा अधिक राहण्याची शक्यता असल्याने जागितक तेलबिया पेंडेचा साठाही वाढले, असे यूएसडीएने म्हटले आहे. 

News Item ID: 
820-news_story-1636657245-awsecm-434
Mobile Device Headline: 
भारतात पामतेल आयात वाढणार; यूएसडीएचा अंदाज
Appearance Status Tags: 
Mukhya News
भारतात पामतेल आयात वाढणार; यूएसडीएचा अंदाजभारतात पामतेल आयात वाढणार; यूएसडीएचा अंदाज
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Palm oil import will rise in India predict USDA
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
पुणे मात mate कृषी विभाग agriculture department विभाग sections भारत इंडोनेशिया मलेशिया सोयाबीन अमेरिका मोहरी mustard व्यापार ब्राझील अर्जेंटिना
Search Functional Tags: 
पुणे, मात, mate, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, सोयाबीन, अमेरिका, मोहरी, Mustard, व्यापार, ब्राझील, अर्जेंटिना
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Palm oil import will rise in India predict USDA
Meta Description: 
Palm oil import will rise in India predict USDA
केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात मोठी कपात केल्यानंतर पामतेल आयात वाढली आहे. पामतेल आयात चालू हंगामात ८६ लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X