भारतीय सोयापेंडवर तीन टक्के अॅण्टी डंपिंग ड्यूटी लावा 

पुणे : भारतातून आयात होणाऱ्या ऑरगॅनिक सोयापेंडवर १५४ टक्के अॅण्टी डंपिंग ड्यूटी लागू करण्याची मागणी अमेरिकेतील सोयापेंड निर्मिती उद्योगाने कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने ३.११ टक्के ड्यूटी लावण्याचा निर्णय दिला. त्यामुळे भारतातून ऑरगॅनिक सोयापेंड निर्यातदारांनी समाधान व्यक्त केले असून, ऑरगॅनिक सोयापेंड निर्यात वाढीचीही शक्यता व्यक्त केली आहे.

भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या ऑरगॅनिक सोयापेंडला रोखण्यासाठी येथील सोयापेंड निर्मिती उद्योगाने अॅण्टी डंपिंग ड्यूटी लागू करण्याची मागणी केली होती. एखाद्या देशातून कमी दरात वस्तूची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात असल्यास संबंधित देश त्या वस्तूवर जे शुल्क लावते त्याला अॅण्टी डंपिंग ड्यूटी म्हणतात. अमेरिकेतील सोयापेंड उद्योगाने भारतीय सोयापेंडवर तब्बल १५४ टक्के अॅण्टी डंपिंग ड्यूटी लावण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. भारतीय निर्यातदारांनीही आपल्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी कोर्टात धाव घेतली होती. अमेरिकी कोर्टाने नुकताच आपला निर्णय दिला असून केवळ ३.११ टक्के अॅण्टी डंपिंग ड्यूटी लागू करण्याचा निर्णय दिला.

अमेरिकी कोर्टाने कमी प्रमाणात अॅण्टी डंपिंग ड्यूटी लागू करण्याचा निर्णय दिल्यानंतर भारतीय निर्यातदारांच्या बाजूने दिल्याचा दावा केला जात आहे. कोर्टाच्या या निर्णयाने ऑरगॅनिक सोयापेंड निर्यातदारांना दिलासा मिळाला असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. देशातील ऑरगॅनिक सोयापेंड निर्यात करणाऱ्या १७ ते १८ कंपन्यांना याचा लाभ मिळणार असून, ऑरगॅनिक सोयापेंड निर्यातीचे थांबलेले सौदे पुन्हा सुरू होणार आहेत. अमेरिकेत ऑरगॅनिक सोयापेंडला मोठी मागणी असते. स्थानिक उद्योगाकडून निर्माण होणारी पेंड कमी पडत असल्याने येथील व्यापारी भारताकडून आयात करतात. मागील वर्षी भारतातून अमेरिकेला दोन लाख टन ऑरगॅनिक सोयापेंडची निर्यात झाली होती. आता कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा सोयापेंड निर्यात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Item ID: 
820-news_story-1635690382-awsecm-315
Mobile Device Headline: 
भारतीय सोयापेंडवर तीन टक्के अॅण्टी डंपिंग ड्यूटी लावा 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Impose three per cent anti-dumping duty on Indian soybeansImpose three per cent anti-dumping duty on Indian soybeans
Mobile Body: 

पुणे : भारतातून आयात होणाऱ्या ऑरगॅनिक सोयापेंडवर १५४ टक्के अॅण्टी डंपिंग ड्यूटी लागू करण्याची मागणी अमेरिकेतील सोयापेंड निर्मिती उद्योगाने कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने ३.११ टक्के ड्यूटी लावण्याचा निर्णय दिला. त्यामुळे भारतातून ऑरगॅनिक सोयापेंड निर्यातदारांनी समाधान व्यक्त केले असून, ऑरगॅनिक सोयापेंड निर्यात वाढीचीही शक्यता व्यक्त केली आहे.

भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या ऑरगॅनिक सोयापेंडला रोखण्यासाठी येथील सोयापेंड निर्मिती उद्योगाने अॅण्टी डंपिंग ड्यूटी लागू करण्याची मागणी केली होती. एखाद्या देशातून कमी दरात वस्तूची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात असल्यास संबंधित देश त्या वस्तूवर जे शुल्क लावते त्याला अॅण्टी डंपिंग ड्यूटी म्हणतात. अमेरिकेतील सोयापेंड उद्योगाने भारतीय सोयापेंडवर तब्बल १५४ टक्के अॅण्टी डंपिंग ड्यूटी लावण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. भारतीय निर्यातदारांनीही आपल्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी कोर्टात धाव घेतली होती. अमेरिकी कोर्टाने नुकताच आपला निर्णय दिला असून केवळ ३.११ टक्के अॅण्टी डंपिंग ड्यूटी लागू करण्याचा निर्णय दिला.

अमेरिकी कोर्टाने कमी प्रमाणात अॅण्टी डंपिंग ड्यूटी लागू करण्याचा निर्णय दिल्यानंतर भारतीय निर्यातदारांच्या बाजूने दिल्याचा दावा केला जात आहे. कोर्टाच्या या निर्णयाने ऑरगॅनिक सोयापेंड निर्यातदारांना दिलासा मिळाला असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. देशातील ऑरगॅनिक सोयापेंड निर्यात करणाऱ्या १७ ते १८ कंपन्यांना याचा लाभ मिळणार असून, ऑरगॅनिक सोयापेंड निर्यातीचे थांबलेले सौदे पुन्हा सुरू होणार आहेत. अमेरिकेत ऑरगॅनिक सोयापेंडला मोठी मागणी असते. स्थानिक उद्योगाकडून निर्माण होणारी पेंड कमी पडत असल्याने येथील व्यापारी भारताकडून आयात करतात. मागील वर्षी भारतातून अमेरिकेला दोन लाख टन ऑरगॅनिक सोयापेंडची निर्यात झाली होती. आता कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा सोयापेंड निर्यात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Impose three per cent anti-dumping duty on Indian soybeans
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे भारत व्यापार
Search Functional Tags: 
पुणे, भारत, व्यापार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Impose three per cent anti-dumping duty on Indian soybeans
Meta Description: 
Impose three per cent anti-dumping duty on Indian soybeans
भारतातून आयात होणाऱ्या ऑरगॅनिक सोयापेंडवर १५४ टक्के अॅण्टी डंपिंग ड्यूटी लागू करण्याची मागणी अमेरिकेतील सोयापेंड निर्मिती उद्योगाने कोर्टाकडे केली होती.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X