भिजलेल्या भाताला पंचनाम्याची प्रतिक्षा   

इगतपुरी ः तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार दिवस उलटूनही अजूनही पंचनाम्यांसाठी संबंधित अधिकारी फिरकलेले नसल्याने शेतकरी संतापले आहेत. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची उत्पन्नाची जेमतेम असलेली आशा या पावसाने धुळीस मिळाली आहे. असे असतानाही प्रशासनाला काहीही देणेघेणे नसल्याने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी माजी उपसभापती पांडुरंग वारुंगुसे, शेतकरी अनिल वाजे, प्रगतिशील शेतकरी जगण घोडे यांनी केले आहे. 

या वर्षी वेळी अवेळी पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला भात लागवडीवेळी पावसाने असेच नुकसान केले होते. काही ठिकाणी दुबार लावणी करून वाडा कोलम या वाणाचे व इतरही एक हजार आठ, ओम थ्री, श्रीराम, इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हाळे, रूपाली, सोनम हे वाण घेण्यात आले होते. पिकेही बऱ्यापैकी असताना दिवाळीत अवकाळी पावसाने पुन्हा आशेवर पाणी फेरले. पिंपळगाव मोर, अधरवड आंबेवाडी, धामणी, बेलगांव तऱ्हाळे, वासाळी, अडसरे, टाकेद अशा अनेक ठिकाणी भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

ऐन दिवाळी सणाची लगबग सुरू असताना हातातोंडाशी आलेला घास पावसाने भुईसपाट केला आहे. अनेक ठिकाणी शेतात कापणी करून ठेवलेला भात भिजला. बडवून खळ्यात ठेवलेला भात भिजला आहे. काढणीस आलेली पीक वाकून जमिनीवर पडले. हे अस्मानी संकट शेतक-याला उध्वस्त करणारे ठरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीकविमा भरलेला आहे. तरी पीकविमा कंपनीकडून नुकसानीची तत्काळ पाहणी व्हावी व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, असा सूर शेतकऱ्यांकडून निघत आहे. झालेल्या नुकसानीचे गावनिहाय माहिती घेऊन त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकरी अशोक बांबळे, दौलत बांबळे, मयूर नांगरे, दिलीप बांबळे, किसान क्रांती संघटनेचे सोमनाथ वहे आदीसह सर्वत्र शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  

News Item ID: 
820-news_story-1636634595-awsecm-534
Mobile Device Headline: 
भिजलेल्या भाताला पंचनाम्याची प्रतिक्षा   
Appearance Status Tags: 
Section News
Waiting for panchnama on soaked riceWaiting for panchnama on soaked rice
Mobile Body: 

इगतपुरी ः तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार दिवस उलटूनही अजूनही पंचनाम्यांसाठी संबंधित अधिकारी फिरकलेले नसल्याने शेतकरी संतापले आहेत. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची उत्पन्नाची जेमतेम असलेली आशा या पावसाने धुळीस मिळाली आहे. असे असतानाही प्रशासनाला काहीही देणेघेणे नसल्याने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी माजी उपसभापती पांडुरंग वारुंगुसे, शेतकरी अनिल वाजे, प्रगतिशील शेतकरी जगण घोडे यांनी केले आहे. 

या वर्षी वेळी अवेळी पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला भात लागवडीवेळी पावसाने असेच नुकसान केले होते. काही ठिकाणी दुबार लावणी करून वाडा कोलम या वाणाचे व इतरही एक हजार आठ, ओम थ्री, श्रीराम, इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हाळे, रूपाली, सोनम हे वाण घेण्यात आले होते. पिकेही बऱ्यापैकी असताना दिवाळीत अवकाळी पावसाने पुन्हा आशेवर पाणी फेरले. पिंपळगाव मोर, अधरवड आंबेवाडी, धामणी, बेलगांव तऱ्हाळे, वासाळी, अडसरे, टाकेद अशा अनेक ठिकाणी भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

ऐन दिवाळी सणाची लगबग सुरू असताना हातातोंडाशी आलेला घास पावसाने भुईसपाट केला आहे. अनेक ठिकाणी शेतात कापणी करून ठेवलेला भात भिजला. बडवून खळ्यात ठेवलेला भात भिजला आहे. काढणीस आलेली पीक वाकून जमिनीवर पडले. हे अस्मानी संकट शेतक-याला उध्वस्त करणारे ठरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीकविमा भरलेला आहे. तरी पीकविमा कंपनीकडून नुकसानीची तत्काळ पाहणी व्हावी व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, असा सूर शेतकऱ्यांकडून निघत आहे. झालेल्या नुकसानीचे गावनिहाय माहिती घेऊन त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकरी अशोक बांबळे, दौलत बांबळे, मयूर नांगरे, दिलीप बांबळे, किसान क्रांती संघटनेचे सोमनाथ वहे आदीसह सर्वत्र शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  

English Headline: 
agriclture news in marathi Waiting for panchnama on soaked rice
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
प्रशासन administrations दिवाळी शेती farming खरीप कंपनी company वन forest
Search Functional Tags: 
प्रशासन, Administrations, दिवाळी, शेती, farming, खरीप, कंपनी, Company, वन, forest
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Waiting for panchnama on soaked rice
Meta Description: 
Waiting for panchnama on soaked rice
सर्वतीर्थ टाकेद, भिजलेल्या भाताला पंचनाम्याची प्रतिक्षा   इगतपुरी ः तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार दिवस उलटूनही अजूनही पंचनाम्यांसाठी संबंधित अधिकारी फिरकलेले नसल्याने शेतकरी संतापले आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X