मंगळवेढ्यात डाळिंबाला उच्चांकी प्रतिकिलो ५११ रुपये दर

मंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंब सौद्यात डाळिंबाच्या भगव्या वाणाला तालुक्यातील भाळवणी येथील अण्णासाहेब मोरे या शेतकऱ्याला बुधवारी (ता. ३) झालेल्या लिलावात प्रतिकिलो ५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.

मंगळवेढा तालुक्यामध्ये अनिश्चित व अवेळी मिळणारा ऊसदर यामुळे कमी खर्चात कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांचा डाळिंब पिकाकडे अलीकडच्या काळामध्ये कल वाढला आहे. डाळिंबाला सांगोला, पंढरपूर सोलापूर हे मार्केट आहेत. परंतु बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांपासून डाळिंबाची सौदे मंगळवेढ्यातही सुरू झाले आहेत. सध्या वीस अडत्याच्या माध्यमातून डाळिंबाचे लिलाव सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या काळात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस डाळिंब खरेदी केली जात होती. परंतु स्थानिक व शेजारील तालुक्यातील व्यापाऱ्यांबरोबर बिहार, राजस्थान, झारखंड या भागातील व्यापारीही या भागातील डाळिंबाच्या खरेदीसाठी येऊ लागले. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यावर झाला. आता मात्र रोज लिलाव सुरू करण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांत ६ लाख ७१ हजार कॅरेट डाळिंबाची आवक झाली. यामधून जवळपास २९ कोटी ५२ लाखांची उलाढाल झाली आहे.

पाणी कमी असल्याने एकरात ३०० झाडाची लागण केली असून, यंदाचे चौथे वर्ष असून पहिल्या वर्षी सोलापूरला विक्री केली. कोणताही इतर खर्च नसल्यामुळे डाळिंबाच्या विक्रीसाठी मंगळवेढ्यातील बाजारपेठेचा पर्याय झाल्यामुळे आतापर्यंत दरात मला उच्चांकी दर मिळाला.
-अण्णासाहेब मोरे, शेतकरी, भाळवणी

भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्यामुळे मंगळवेढ्याच्या बाजारपेठेत शेतीमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची विश्‍वासार्हता वाढीस लागली आहे. भविष्यात शेतकऱ्यांना आणखीन सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-सोमनाथ अवताडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगळवेढा
 
News Item ID: 
820-news_story-1636029703-awsecm-556
Mobile Device Headline: 
मंगळवेढ्यात डाळिंबाला उच्चांकी प्रतिकिलो ५११ रुपये दर
Appearance Status Tags: 
Section News
मंगळवेढ्यात डाळिंबाला उच्चांकी प्रतिकिलो ५११ रुपये दर मंगळवेढ्यात डाळिंबाला उच्चांकी प्रतिकिलो ५११ रुपये दर
Mobile Body: 

मंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंब सौद्यात डाळिंबाच्या भगव्या वाणाला तालुक्यातील भाळवणी येथील अण्णासाहेब मोरे या शेतकऱ्याला बुधवारी (ता. ३) झालेल्या लिलावात प्रतिकिलो ५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.

मंगळवेढा तालुक्यामध्ये अनिश्चित व अवेळी मिळणारा ऊसदर यामुळे कमी खर्चात कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांचा डाळिंब पिकाकडे अलीकडच्या काळामध्ये कल वाढला आहे. डाळिंबाला सांगोला, पंढरपूर सोलापूर हे मार्केट आहेत. परंतु बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांपासून डाळिंबाची सौदे मंगळवेढ्यातही सुरू झाले आहेत. सध्या वीस अडत्याच्या माध्यमातून डाळिंबाचे लिलाव सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या काळात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस डाळिंब खरेदी केली जात होती. परंतु स्थानिक व शेजारील तालुक्यातील व्यापाऱ्यांबरोबर बिहार, राजस्थान, झारखंड या भागातील व्यापारीही या भागातील डाळिंबाच्या खरेदीसाठी येऊ लागले. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यावर झाला. आता मात्र रोज लिलाव सुरू करण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांत ६ लाख ७१ हजार कॅरेट डाळिंबाची आवक झाली. यामधून जवळपास २९ कोटी ५२ लाखांची उलाढाल झाली आहे.

पाणी कमी असल्याने एकरात ३०० झाडाची लागण केली असून, यंदाचे चौथे वर्ष असून पहिल्या वर्षी सोलापूरला विक्री केली. कोणताही इतर खर्च नसल्यामुळे डाळिंबाच्या विक्रीसाठी मंगळवेढ्यातील बाजारपेठेचा पर्याय झाल्यामुळे आतापर्यंत दरात मला उच्चांकी दर मिळाला.
-अण्णासाहेब मोरे, शेतकरी, भाळवणी

भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्यामुळे मंगळवेढ्याच्या बाजारपेठेत शेतीमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची विश्‍वासार्हता वाढीस लागली आहे. भविष्यात शेतकऱ्यांना आणखीन सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-सोमनाथ अवताडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगळवेढा
 
English Headline: 
Pomegranate peaks at Rs 511 per kg on Tuesday
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee डाळ डाळिंब पंढरपूर बिहार राजस्थान व्यापार शेती farming
Search Functional Tags: 
सोलापूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, डाळ, डाळिंब, पंढरपूर, बिहार, राजस्थान, व्यापार, शेती, farming
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pomegranate peaks at Rs 511 per kg on Tuesday
Meta Description: 
Pomegranate peaks at Rs 511 per kg on Tuesday
मंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंब सौद्यात डाळिंबाच्या भगव्या वाणाला तालुक्यातील भाळवणी येथील अण्णासाहेब मोरे या शेतकऱ्याला बुधवारी (ता. ३) झालेल्या लिलावात प्रतिकिलो ५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X