मंदीतही शंभर टन गव्हाची थेट ग्राहकांना विक्री

कोरोना लॉकडाऊन काळ हा काहींसाठी अडचणीचा ठरत असला, तरी अचलपूर येथील कृषी समृद्धी उत्पादक कंपनीने त्यांचे संधीमध्ये रूपांतर केले. शेतीमालाची स्वच्छता आणि प्रतवारी युनिट असलेल्या या कंपनीने यंदा शेतकऱ्यांच्याकडून दोनशे टन गव्हाची खरेदी केली. सध्याच्या काळात त्यातील १०० टन गव्हाची २३ ते ३० रुपये प्रति किलो दराने थेट ग्राहकांना विक्री सुरू केली आहे.

अचलपूर येथील कृषी समृद्धी उत्पादक कंपनीला कृषी विभागाकडून अन्नसुरक्षा अभियानामध्ये बियाणे प्रक्रिया केंद्र त्यासोबतच धान्य स्वच्छता आणि प्रतवारी युनिट मिळाले आहे. कंपनीतर्फे आखाती देशात संत्रा, भेंडी, मिरची निर्यातदेखील केली जाते.

समन्वित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन संचालक आणि नागपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच कृषी समृद्धी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अमरावती, पुणे मुंबई शहरात संत्रा आणि धान्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. या संपर्कातून वर्षभर अशा ग्राहकांकडून शेतीमालाच्या पुरवठ्याबाबत कंपनीकडे विचारणा होत होती. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लॉकडाऊन सुरू झाला. त्याचा धान्य खरेदी आणि विक्रीवर  परिणाम झाला. ही संधी मानत कंपनीचे संचालक रवीकिरण पाटील यांनी शहरी ग्राहकांना थेट गव्हाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. 

कंपनीने मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या दोनशे टन गव्हापैकी आजपर्यंत १०० टन गव्हाची विक्री झाली आली. स्वच्छता आणि प्रतवारी केलेला लोकवन, सरबती, नर्मदा जातीचा गहू ग्राहकांना २३ ते ३० रुपये किलो या दराने विकला जातो. सध्या अमरावती शहरात स्थायिक शेतकऱ्यांच्या घरातून ग्राहकांना गव्हाचा पुरवठा केला जातो. या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये जास्तीचा नफा आणि शेतमाल विक्रीचा दृष्टिकोन मिळाला.

रवीकिरण पाटील,९७६४७७८१०१.

News Item ID: 
820-news_story-1589289047-670
Mobile Device Headline: 
मंदीतही शंभर टन गव्हाची थेट ग्राहकांना विक्री
Appearance Status Tags: 
Mukhya News
success story of Krishi Samrudhi Utpadak company,Achalpursuccess story of Krishi Samrudhi Utpadak company,Achalpur
Mobile Body: 

कोरोना लॉकडाऊन काळ हा काहींसाठी अडचणीचा ठरत असला, तरी अचलपूर येथील कृषी समृद्धी उत्पादक कंपनीने त्यांचे संधीमध्ये रूपांतर केले. शेतीमालाची स्वच्छता आणि प्रतवारी युनिट असलेल्या या कंपनीने यंदा शेतकऱ्यांच्याकडून दोनशे टन गव्हाची खरेदी केली. सध्याच्या काळात त्यातील १०० टन गव्हाची २३ ते ३० रुपये प्रति किलो दराने थेट ग्राहकांना विक्री सुरू केली आहे.

अचलपूर येथील कृषी समृद्धी उत्पादक कंपनीला कृषी विभागाकडून अन्नसुरक्षा अभियानामध्ये बियाणे प्रक्रिया केंद्र त्यासोबतच धान्य स्वच्छता आणि प्रतवारी युनिट मिळाले आहे. कंपनीतर्फे आखाती देशात संत्रा, भेंडी, मिरची निर्यातदेखील केली जाते.

समन्वित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन संचालक आणि नागपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच कृषी समृद्धी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अमरावती, पुणे मुंबई शहरात संत्रा आणि धान्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. या संपर्कातून वर्षभर अशा ग्राहकांकडून शेतीमालाच्या पुरवठ्याबाबत कंपनीकडे विचारणा होत होती. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लॉकडाऊन सुरू झाला. त्याचा धान्य खरेदी आणि विक्रीवर  परिणाम झाला. ही संधी मानत कंपनीचे संचालक रवीकिरण पाटील यांनी शहरी ग्राहकांना थेट गव्हाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. 

कंपनीने मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या दोनशे टन गव्हापैकी आजपर्यंत १०० टन गव्हाची विक्री झाली आली. स्वच्छता आणि प्रतवारी केलेला लोकवन, सरबती, नर्मदा जातीचा गहू ग्राहकांना २३ ते ३० रुपये किलो या दराने विकला जातो. सध्या अमरावती शहरात स्थायिक शेतकऱ्यांच्या घरातून ग्राहकांना गव्हाचा पुरवठा केला जातो. या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये जास्तीचा नफा आणि शेतमाल विक्रीचा दृष्टिकोन मिळाला.

रवीकिरण पाटील,९७६४७७८१०१.

English Headline: 
Agricultural Agriculture News Marathi success story of Krishi Samrudhi Utpadak company,Achalpur,Dist.Amarvati
Author Type: 
External Author
विनोद इंगोले
गहू wheat कंपनी company
Search Functional Tags: 
गहू, wheat, कंपनी, Company
Twitter Publish: 
Meta Keyword: 
success story of Krishi Samrudhi Utpadak company,Achalpur,Dist.Amarvati
Meta Description: 
राज्यातील शेतकऱ्यांसह मध्यप्रदेशातून उत्तम प्रतीच्या गव्हाची खरेदी करून त्याचा ग्राहकांना थेट पुरवठा करण्यावर आम्ही भर दिला. या माध्यमातून शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळाले. त्यासोबतच ग्राहकांना देखील चांगल्या प्रतीचा गहू मिळतो आहे. अडचणीला संधी मानल्यानेच आम्हांला नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण करता आला.Source link

Leave a Comment

X