Take a fresh look at your lifestyle.

मच्छीमारांच्या सहकार्यानेच  समुद्री प्रदूषण थांबवता येईल 

0

दापोली, जि. रत्नागिरी ः समुद्रात होणार प्रदूषण मच्छीमारांच्या सहकार्यानेच थांबवता येईल. मच्छीमारांवर आता हळूहळू मासळी दुष्काळाचे संकट येऊ घातले आहे. मासेमारी करताना तुटलेली जाळी व प्लास्टिक कचरा समुद्रात टाकला जाऊ नये, मासेमारी जाळ्यांना चिन्हांकित करण्याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. तरच हे संकट लवकरच दूर होईल, असे नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम यांनी सांगितले. 

नेटफिश- एमपीईडिए (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार) या संस्थेतर्फे हर्णे बंदर येथे स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला हर्णे बंदर परिसरातील मच्छीमार संस्थांचे बहुसंख्य पदाधिकारी व नौकामालक आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते. या वेळी नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम यांनी समुद्री प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

कदम म्हणाले, ‘‘भारताच्या किनारपट्टीवर सुमारे २,६९,००० मासेमारी बोटी कार्यरत आहेत. या बोटींना मासेमारी करत असताना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळ्यात येत असतो. हा कचरा जर किनाऱ्यावर आणला गेला तर समुद्री पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.’’ 

असे करा समुद्री पर्यावरणाचे रक्षण 
कदम यांनी सागरी प्रदूषण टाळण्याचे तीन प्रकारे व्यवस्थापन कसे करता येईल हे देखील सांगितले. प्रथम मासेमारी करताना तुटलेली जाळी व प्लास्टिक कचरा समुद्रात टाकला जाऊ नये, मासेमारी जाळ्यांना चिन्हांकित करण्याविषयी जनजागृती करावी लागेल. दुसरे म्हणजे बायोडिग्रेडेबल मासेमारी जाळ्यांचा वापर केलातर समुद्री सस्तन प्राण्यांची अनावश्यक मासेमारी कमी करता येईल आणि तिसरे म्हणजे समुद्रात टाकली गेलेली तुटकी जाळी व प्लास्टिक कचरा किनारी घेऊन येणे व तो रिसायकलिंगसाठी देणे अशाप्रकारे व्यवस्थापन करता येऊ शकते त्याकरिता मच्छीमारांचे बहुमोल सहकार्य असणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे कदम यांनी सांगितले. 

स्वच्छता पंधरवडा दोन टप्प्यात 
स्वच्छता पंधरवडा हा कार्यक्रम दोन टप्प्यांत साजरा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मासेमारी भागधारकांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाविषयी जनजागृती करणे व मासेमारी करत असताना जाळ्यात येणारा प्लास्टिक कचरा स्वच्छ करून समुद्रकिनारी आणण्यासाठी प्रवृत्त करणे. दुसऱ्या टप्प्यात मासेमारी बोटांनी आणलेला कचरा किनाऱ्यावर आणून तो रिसायकलिंगसाठी देणे. या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमासाठी मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुसऱ्या टप्प्यात मासेमारी जाळ्यातील कचरा गोळा करण्यात येणार असून, त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येईल. 
 
News Item ID: 
820-news_story-1636984992-awsecm-604
Mobile Device Headline: 
मच्छीमारांच्या सहकार्यानेच  समुद्री प्रदूषण थांबवता येईल 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Only with the help of fishermen Marine pollution can be stoppedOnly with the help of fishermen Marine pollution can be stopped
Mobile Body: 

दापोली, जि. रत्नागिरी ः समुद्रात होणार प्रदूषण मच्छीमारांच्या सहकार्यानेच थांबवता येईल. मच्छीमारांवर आता हळूहळू मासळी दुष्काळाचे संकट येऊ घातले आहे. मासेमारी करताना तुटलेली जाळी व प्लास्टिक कचरा समुद्रात टाकला जाऊ नये, मासेमारी जाळ्यांना चिन्हांकित करण्याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. तरच हे संकट लवकरच दूर होईल, असे नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम यांनी सांगितले. 

नेटफिश- एमपीईडिए (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार) या संस्थेतर्फे हर्णे बंदर येथे स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला हर्णे बंदर परिसरातील मच्छीमार संस्थांचे बहुसंख्य पदाधिकारी व नौकामालक आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते. या वेळी नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम यांनी समुद्री प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

कदम म्हणाले, ‘‘भारताच्या किनारपट्टीवर सुमारे २,६९,००० मासेमारी बोटी कार्यरत आहेत. या बोटींना मासेमारी करत असताना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळ्यात येत असतो. हा कचरा जर किनाऱ्यावर आणला गेला तर समुद्री पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.’’ 

असे करा समुद्री पर्यावरणाचे रक्षण 
कदम यांनी सागरी प्रदूषण टाळण्याचे तीन प्रकारे व्यवस्थापन कसे करता येईल हे देखील सांगितले. प्रथम मासेमारी करताना तुटलेली जाळी व प्लास्टिक कचरा समुद्रात टाकला जाऊ नये, मासेमारी जाळ्यांना चिन्हांकित करण्याविषयी जनजागृती करावी लागेल. दुसरे म्हणजे बायोडिग्रेडेबल मासेमारी जाळ्यांचा वापर केलातर समुद्री सस्तन प्राण्यांची अनावश्यक मासेमारी कमी करता येईल आणि तिसरे म्हणजे समुद्रात टाकली गेलेली तुटकी जाळी व प्लास्टिक कचरा किनारी घेऊन येणे व तो रिसायकलिंगसाठी देणे अशाप्रकारे व्यवस्थापन करता येऊ शकते त्याकरिता मच्छीमारांचे बहुमोल सहकार्य असणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे कदम यांनी सांगितले. 

स्वच्छता पंधरवडा दोन टप्प्यात 
स्वच्छता पंधरवडा हा कार्यक्रम दोन टप्प्यांत साजरा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मासेमारी भागधारकांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाविषयी जनजागृती करणे व मासेमारी करत असताना जाळ्यात येणारा प्लास्टिक कचरा स्वच्छ करून समुद्रकिनारी आणण्यासाठी प्रवृत्त करणे. दुसऱ्या टप्प्यात मासेमारी बोटांनी आणलेला कचरा किनाऱ्यावर आणून तो रिसायकलिंगसाठी देणे. या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमासाठी मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुसऱ्या टप्प्यात मासेमारी जाळ्यातील कचरा गोळा करण्यात येणार असून, त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येईल. 
 
English Headline: 
Agriculture News in Marathi Only with the help of fishermen Marine pollution can be stopped
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
समुद्र प्रदूषण प्लास्टिक विषय topics मंत्रालय भारत सरकार government किनारपट्टी पर्यावरण environment सायकलSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X