Take a fresh look at your lifestyle.

मजूर बाजारात हजारोंना दररोज मिळतो रोजगार येथे… 

0

गिरणारे, ता. नाशिक : नाशिक तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील गिरणारे येथे खंडेराव डोंगराच्या पश्‍चिमेस सकाळी ६ ते सकाळी ८ दरम्यान मजूर बाजार भरतो. या बाजारात २५ हजारांहून अधिक मजुरांना शेतीतून तब्बल ६ महिने अखंडित रोजगार उपलब्ध होतो. येथून मजूर नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, त्रंबकेश्‍वर तालुक्यातील शेतीकामासाठी जात असतात. एकूणच टोमॅटो लागवड ते टोमॅटो काढणीपर्यंत तसेच द्राक्ष बागाच्या हंगामी कामांसाठी शेतकऱ्यांना शेतमजूर उपलब्ध होतात. 

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या काळात २ वर्षे शेतमजुरांना रोजगार नव्हता. पेठ तालुक्यासह त्रंबकेश्‍वर तालुक्यातील हरसूल, ठाणापाडा, खरशेत ते थेट गुजरात सीमेवरील गावचे मजूर कामासाठी गिरणारेच्या मजूर बाजारात येतात. दिवसेंदिवस हा मजूर बाजार वाढत असून सध्या गिरणारेच्या मजूर बाजारात २५ हजाराहून अधिक आदिवासी भागातील नागरिक रोजगारासाठी गिरणारेच्या मजूर बाजारात पहाटे पहाटे येतात. मजुरांची रोजंदारी ठरल्यावर शेतकरी स्वतःच्या चारचाकी वाहनांतून शेतापर्यंत मजुरांना घेऊन जातात. सध्या टोमॅटो खुडणीसाठी मोठ्या प्रमाणात शेतमजुरांना मागणी आहे. 

दिवाळीच्या सणात मजूर नसल्याने रोजंदारी दुप्पट करूनही मजूर भेटत नव्हते. आता टोमॅटो खुडणीसाठी महिलांना ३०० रुपये ते ३५० रुपये, तर पुरुषास ३५० ते ४५० रुपये रोजंदारी मिळत आहे. बांधकाम बिगाऱ्यास ५०० ते ७०० रुपये तर गवंडी यास ७०० ते ९०० रुपये रोजंदारी मिळते. यामुळे वाढती शेतमजुरीमुळे शेतीचा उत्पादन खर्च व उत्पन्नाचा मेळ बसत नाही, असे शेतकरी सांगतात. 
  
स्थानिक गावात मजूर मिळेना 
एकीकडे गिरणारेस खात्रीने रोजगार मिळतो म्हणून येथे त्रंबकेश्‍वर, पेठ तालुक्यातून मजूर येतात. मात्र स्थानिक पातळीवर भात, नागली, वरई, उडीद सोंगणीसाठी मजूर मिळत नाही. फलोत्पादन घेणारे शेतकरी अधिक मजुरी देत असल्याने आम्हीच स्थानिक शेतकरी मजुरांची उपलब्धता करण्यात अडचणीत असल्याचे गणेशगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील पोलिस पाटील शेतकरी देवचंद महाले यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया…
येण्या-जाण्याचा प्रवास खर्च १०० रुपये असतो. त्यात मजुरी मिळते ४०० रुपये हातात केवळ ३०० रुपये पडतात. मोठी दगदग, पहाटे ५ वाजता घरातून निघावे लागत, या महागाईत घर खर्चासाठी आम्हाला मजुरीशिवाय पर्याय नाही. रस्त्याच्या कडेला उभे राहतो, तिथे निवारा ना पिण्यासाठी पाणी. मात्र रोजगार हक्काचा मिळतो इतकेच समाधान. 
– सुभाष सहाळे, शेतमजूर 

शेती व मजुरी हे समीकरण होऊन बसलं आहे. मजुरी शिवाय शेती होत नाही. घरातील माणसे किती राबणार? टोमॅटो लागवड ते काढणीपर्यंत मजूर लागतो. जितका उत्पादन खर्च त्याचा अर्धा खर्च मजुरीस लागतो. २ वर्षे शेतीमालाला भाव नव्हता, देणी फिटत नव्हती, यंदा  बरा भाव आहे. त्यामुळं डोक्यावरील ओझं खांद्यावर आलं आहे. 
-विलास दगू थेटे,
टोमॅटो उत्पादक शेतकरी 

News Item ID: 
820-news_story-1636484138-awsecm-400
Mobile Device Headline: 
मजूर बाजारात हजारोंना दररोज मिळतो रोजगार येथे… 
Appearance Status Tags: 
Mukhya News
मजूर बाजारात हजारोंना दररोज मिळतो रोजगार येथे... मजूर बाजारात हजारोंना दररोज मिळतो रोजगार येथे... 
Mobile Body: 

गिरणारे, ता. नाशिक : नाशिक तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील गिरणारे येथे खंडेराव डोंगराच्या पश्‍चिमेस सकाळी ६ ते सकाळी ८ दरम्यान मजूर बाजार भरतो. या बाजारात २५ हजारांहून अधिक मजुरांना शेतीतून तब्बल ६ महिने अखंडित रोजगार उपलब्ध होतो. येथून मजूर नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, त्रंबकेश्‍वर तालुक्यातील शेतीकामासाठी जात असतात. एकूणच टोमॅटो लागवड ते टोमॅटो काढणीपर्यंत तसेच द्राक्ष बागाच्या हंगामी कामांसाठी शेतकऱ्यांना शेतमजूर उपलब्ध होतात. 

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या काळात २ वर्षे शेतमजुरांना रोजगार नव्हता. पेठ तालुक्यासह त्रंबकेश्‍वर तालुक्यातील हरसूल, ठाणापाडा, खरशेत ते थेट गुजरात सीमेवरील गावचे मजूर कामासाठी गिरणारेच्या मजूर बाजारात येतात. दिवसेंदिवस हा मजूर बाजार वाढत असून सध्या गिरणारेच्या मजूर बाजारात २५ हजाराहून अधिक आदिवासी भागातील नागरिक रोजगारासाठी गिरणारेच्या मजूर बाजारात पहाटे पहाटे येतात. मजुरांची रोजंदारी ठरल्यावर शेतकरी स्वतःच्या चारचाकी वाहनांतून शेतापर्यंत मजुरांना घेऊन जातात. सध्या टोमॅटो खुडणीसाठी मोठ्या प्रमाणात शेतमजुरांना मागणी आहे. 

दिवाळीच्या सणात मजूर नसल्याने रोजंदारी दुप्पट करूनही मजूर भेटत नव्हते. आता टोमॅटो खुडणीसाठी महिलांना ३०० रुपये ते ३५० रुपये, तर पुरुषास ३५० ते ४५० रुपये रोजंदारी मिळत आहे. बांधकाम बिगाऱ्यास ५०० ते ७०० रुपये तर गवंडी यास ७०० ते ९०० रुपये रोजंदारी मिळते. यामुळे वाढती शेतमजुरीमुळे शेतीचा उत्पादन खर्च व उत्पन्नाचा मेळ बसत नाही, असे शेतकरी सांगतात. 
  
स्थानिक गावात मजूर मिळेना 
एकीकडे गिरणारेस खात्रीने रोजगार मिळतो म्हणून येथे त्रंबकेश्‍वर, पेठ तालुक्यातून मजूर येतात. मात्र स्थानिक पातळीवर भात, नागली, वरई, उडीद सोंगणीसाठी मजूर मिळत नाही. फलोत्पादन घेणारे शेतकरी अधिक मजुरी देत असल्याने आम्हीच स्थानिक शेतकरी मजुरांची उपलब्धता करण्यात अडचणीत असल्याचे गणेशगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील पोलिस पाटील शेतकरी देवचंद महाले यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया…
येण्या-जाण्याचा प्रवास खर्च १०० रुपये असतो. त्यात मजुरी मिळते ४०० रुपये हातात केवळ ३०० रुपये पडतात. मोठी दगदग, पहाटे ५ वाजता घरातून निघावे लागत, या महागाईत घर खर्चासाठी आम्हाला मजुरीशिवाय पर्याय नाही. रस्त्याच्या कडेला उभे राहतो, तिथे निवारा ना पिण्यासाठी पाणी. मात्र रोजगार हक्काचा मिळतो इतकेच समाधान. 
– सुभाष सहाळे, शेतमजूर 

शेती व मजुरी हे समीकरण होऊन बसलं आहे. मजुरी शिवाय शेती होत नाही. घरातील माणसे किती राबणार? टोमॅटो लागवड ते काढणीपर्यंत मजूर लागतो. जितका उत्पादन खर्च त्याचा अर्धा खर्च मजुरीस लागतो. २ वर्षे शेतीमालाला भाव नव्हता, देणी फिटत नव्हती, यंदा  बरा भाव आहे. त्यामुळं डोक्यावरील ओझं खांद्यावर आलं आहे. 
-विलास दगू थेटे,
टोमॅटो उत्पादक शेतकरी 

English Headline: 
agriculture news in marathi Thousands of people get employment in the labor market every day here …
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नाशिक nashik सकाळ शेती farming रोजगार employment निफाड niphad द्राक्ष वर्षा varsha कोरोना corona गुजरात दिवाळी महिला women उडीद त्र्यंबकेश्‍वर पोलिस
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, सकाळ, शेती, farming, रोजगार, Employment, निफाड, Niphad, द्राक्ष, वर्षा, Varsha, कोरोना, Corona, गुजरात, दिवाळी, महिला, women, उडीद, त्र्यंबकेश्‍वर, पोलिस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Thousands of people get employment in the labor market every day here …
Meta Description: 
Thousands of people get employment in the labor market every day here …
गिरणारे येथे खंडेराव डोंगराच्या पश्‍चिमेस सकाळी ६ ते सकाळी ८ दरम्यान मजूर बाजार भरतो. या बाजारात २५ हजारांहून अधिक मजुरांना शेतीतून तब्बल ६ महिने अखंडित रोजगार उपलब्ध होतो.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X