[ad_1]
नगर ः भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी गुरुवारी (ता. १७) शांततेत पेटविण्यात आली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तत्पूर्वी सकाळी कैकाडी समाजाची मानाची काठी कानिफनाथांच्या मंदिराच्या कळसाला टेकवून मढी यात्रेला सुरुवात करण्यात आली.
गोपाळ समाजाचे मानकरी नामदेव माळी, माणिक लोणारे, हरिभाऊ हंबीरराव, रघुनाथ काळापहाड, माउली गिऱ्हे हे वाजतगाजत मुख्य गडावर आले. तेथे देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, विश्वस्त रवी आरोळे, बबनराव मरकड, नवनाथ मरकड, श्यामराव मरकड, डॉ. विलास मरकड, भाऊसाहेब मरकड यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना मानाच्या गोवऱ्या दिल्या. गडाच्या पायथ्याला दर वर्षी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते, त्या ठिकाणी या गोवऱ्या आणून विधिवत पूजा करत व कानिफनाथांचा जयघोष करत होळी पेटविण्यात आली.
दर वर्षी सहा मानकऱ्यांच्या हस्ते गोपाळ समाजाची होळी पेटविण्यात येते. मात्र या वर्षी एक विश्वस्त उपस्थित राहू शकले नाहीत. कैकाडी समाजाचे मानकरी नारायण जाधव यांच्या हस्ते मानाची काढी मंदिराच्या कळसाला लावण्यात आली.
दुसऱ्या गटाची वेगळी होळी
दरम्यान, गोपाळ समाजातील दुसऱ्या गटाने रमेश भोंगळ यांच्या आधिपत्याखाली गोपाळ समाजाच्या पारावर होळी पेटविली. सामाजिक समतोल ठेवण्यासाठी होळी पेटविण्याचा मान सर्वांना हवा, असे मत भोंगळ यांनी व्यक्त केले.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.