मतदार नोंदणीसाठी राज्यभरात ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिर

नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. नवीन मतदारांची नोंदणी, गावातील लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या महिलांना यादीतून वगळणे तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांची नोंदणी करणे, त्यासोबतच दिव्यांगाची नोंदणी करणे व त्यांना चिन्हांकित करण्याचे काम या शिबिरात करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यांच्या मतदार यादीचे विश्‍लेषण करण्यात येते. सर्वसामान्यपणे, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ६० ते ७० टक्के असते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग क्षेत्रात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे मतदानाविषयी जनजागृती करण्यात येऊन नवमतदारांना मतदान नोंदणी प्रक्रियेची माहिती जसे छायाचित्र, नाव, आवश्यक कागदपत्रे आदींची माहिती देऊन जनजागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. 

एक नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत उद्योग क्षेत्रात शिबिराचे आयोजन करून नमुना ६, ८ व १४ भरून घ्यावे. या कामात जिल्हा उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे ते म्हणाले. 

औद्योगिक क्षेत्रात मतदार जागृतीसाठी पोस्टर, होर्डिंगद्वारे विस्तृत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासोबतच अधिकार आहे, या बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागपूर विभागात मतदार जागृती करून मतदारांची टक्केवारी वाढविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

News Item ID: 
820-news_story-1634998206-awsecm-788
Mobile Device Headline: 
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिर
Appearance Status Tags: 
Mukhya News
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिर Statewide for voter registration Special camps in Gram Panchayatsमतदार नोंदणीसाठी राज्यभरात ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिर Statewide for voter registration Special camps in Gram Panchayats
Mobile Body: 

नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. नवीन मतदारांची नोंदणी, गावातील लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या महिलांना यादीतून वगळणे तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांची नोंदणी करणे, त्यासोबतच दिव्यांगाची नोंदणी करणे व त्यांना चिन्हांकित करण्याचे काम या शिबिरात करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यांच्या मतदार यादीचे विश्‍लेषण करण्यात येते. सर्वसामान्यपणे, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ६० ते ७० टक्के असते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग क्षेत्रात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे मतदानाविषयी जनजागृती करण्यात येऊन नवमतदारांना मतदान नोंदणी प्रक्रियेची माहिती जसे छायाचित्र, नाव, आवश्यक कागदपत्रे आदींची माहिती देऊन जनजागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. 

एक नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत उद्योग क्षेत्रात शिबिराचे आयोजन करून नमुना ६, ८ व १४ भरून घ्यावे. या कामात जिल्हा उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे ते म्हणाले. 

औद्योगिक क्षेत्रात मतदार जागृतीसाठी पोस्टर, होर्डिंगद्वारे विस्तृत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासोबतच अधिकार आहे, या बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागपूर विभागात मतदार जागृती करून मतदारांची टक्केवारी वाढविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

English Headline: 
Agriculture News in Marathi Statewide for voter registration Special camps in Gram Panchayats
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
यती yeti मतदार यादी नागपूर nagpur लग्न महिला women दिव्यांग निवडणूक श्रीकांत देशपांडे shrikant deshpande जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार निवडणूक आयोग जिल्हा परिषद लोकसभा विषय topics मात mate विभाग sections महाराष्ट्र maharashtra प्रशासन administrations
Search Functional Tags: 
यती, Yeti, मतदार यादी, नागपूर, Nagpur, लग्न, महिला, women, दिव्यांग, निवडणूक, श्रीकांत देशपांडे, Shrikant Deshpande, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, निवडणूक आयोग, जिल्हा परिषद, लोकसभा, विषय, Topics, मात, mate, विभाग, Sections, महाराष्ट्र, Maharashtra, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Statewide for voter registration Special camps in Gram Panchayats
Meta Description: 
Statewide for voter registration
Special camps in Gram Panchayats
राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X