मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पावसाचा अंदाज


पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची शक्यता असून, आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे राहणार असून, किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता विभागाने वर्तविला आहे. 

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून गुजरातच्या कच्छपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी, राज्यात पावसाला पोषक हवामान झाले असून, सकाळपासूनच ढगाळ हवामान झाले आहे. अनेक भागांत दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असून, अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता. 

दरम्यान, राज्यात गारठा वाढला असतानाच ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. कोकण वगळता अनेक ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांपेक्षा कमी झाले आहे. तर किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या पुढे आहे. बुधवारी (ता. १) गोंदिया येथे नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय 
बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकून भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे येताना तीव्र होणार आहे. बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. ३) चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. ही वादळी प्रणाली आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधार 
अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी (ता.१) सकाळपासूनच कोकण, मध्य महाराष्ट्रात सर्वदूर हलक्या ते मध्यम सरींची संततधार सुरू आहे. तर मराठवाड्यातही ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. 
 

News Item ID: 
820-news_story-1638369696-awsecm-599
Mobile Device Headline: 
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पावसाचा अंदाज
Appearance Status Tags: 
Mukhya News
Rainfall forecast in Central Maharashtra, Marathwada, KonkanRainfall forecast in Central Maharashtra, Marathwada, Konkan
Mobile Body: 

पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची शक्यता असून, आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे राहणार असून, किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता विभागाने वर्तविला आहे. 

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून गुजरातच्या कच्छपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी, राज्यात पावसाला पोषक हवामान झाले असून, सकाळपासूनच ढगाळ हवामान झाले आहे. अनेक भागांत दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असून, अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता. 

दरम्यान, राज्यात गारठा वाढला असतानाच ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. कोकण वगळता अनेक ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांपेक्षा कमी झाले आहे. तर किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या पुढे आहे. बुधवारी (ता. १) गोंदिया येथे नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय 
बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकून भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे येताना तीव्र होणार आहे. बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. ३) चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. ही वादळी प्रणाली आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधार 
अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी (ता.१) सकाळपासूनच कोकण, मध्य महाराष्ट्रात सर्वदूर हलक्या ते मध्यम सरींची संततधार सुरू आहे. तर मराठवाड्यातही ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. 
 

English Headline: 
Agriculture news in Marathi Rainfall forecast in Central Maharashtra, Marathwada, Konkan
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे ऊस पाऊस कोकण konkan महाराष्ट्र maharashtra विदर्भ vidarbha हवामान विभाग sections अरबी समुद्र समुद्र कमाल तापमान भारत किनारपट्टी आंध्र प्रदेश ओडिशा
Search Functional Tags: 
पुणे, ऊस, पाऊस, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, विदर्भ, Vidarbha, हवामान, विभाग, Sections, अरबी समुद्र, समुद्र, कमाल तापमान, भारत, किनारपट्टी, आंध्र प्रदेश, ओडिशा
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rainfall forecast in Central Maharashtra, Marathwada, Konkan
Meta Description: 
Rainfall forecast in Central Maharashtra, Marathwada, Konkan
आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे राहणार असून, किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता विभागाने वर्तविला आहे. 



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment