मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः डॉ. रवींद्र कोल्हे

कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला लागलेला चिखल स्वच्छ करता येतो; मात्र मनाला झालेल्या वेदना दूर करता येत नाहीत. लोकांच्या याच वेदना दूर करण्यासाठीच गेली ३७ वर्षे आपला संघर्ष सुरू आहे. यामध्ये आपण यशस्वी झालो हे मोठे समाधान आहे, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र कोल्हे यांनी केले.

येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त क्रांतिअग्रणी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्या पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे होते. या वेळी आमदार अरुण अण्णा लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, प्रा. जे. एफ. पाटील, ॲड. सुभाष पाटील उपस्थित होते. 

डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘मेळघाटात अनेक गोष्टी या लोकाभिमुख केल्या जातात, त्यामुळे शेतकरी आत्महत्या अजिबात नाहीत. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणी सोडवणे यालाच धर्म म्हणतात आणि याच धर्माचे पालन मी आजवर करत आहे. ’’

स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रताप लाड यांनी केले. परिचय जयवंत आवटे यांनी केले. निवेदन व मानपत्र वाचन श्रीकांत माने यांनी केले. तर कुंडलिक एडके यांनी आभार मानले. या वेळी ॲड. प्रकाश लाड, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, सचिन कदम, शरद लाड, प्रमिलताई लाड, अलकाताई लाड, मीनाक्षीताई लाड, सुनंदाताई लाड, धनश्रीताई लाड, साधना लाड, अंजली कदम, मनस्विता पाटील, अपेक्षा लाड, व्ही. वाय. पाटील, सुरेश खारगे आदी उपस्थित होते.

या वेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ‘‘माणसांनी माणसासारखे वागले पाहिजे, भौतिक गोष्टींचा हव्यास तात्पुरता असतो, पण चिरंतन हे व्यक्तिमत्त्व असते ते सुधारले पाहिजे. वैद्यकीय सेवा पुरवताना ही साधी राहणी जपली जाते. हे डॉ. कोल्हेनीं समाजाला दाखवून दिले.’’ 

अरुण लाड यांनी पुरस्काराबाबतची भूमिका सांगितली, ते म्हणाले, ‘‘क्रांतिअग्रणी जी. डी. बापू यांनी स्वातंत्र्यासाठी प्रचंड त्याग केला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही बापू सर्वसामान्यांच्या सुखासाठी लढत राहिले. बापू जे जीवन जगले तेच डाॕ. रवींद्र कोल्हे जीवन जगत आहेत. डाॕ. कोल्हे हे नि:स्पृह भावनेने आदिवासी भागात लोकांची सेवा करत आहेत. समाजाची सेवा हेच जीवन समजून ते आयुष्यभर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची समाजाला प्रेरणा मिळावी याच भूमिकेतून डाॕ. कोल्हे यांना हा पुरस्कार दिला आहे.’’
 
News Item ID: 
820-news_story-1638714678-awsecm-938
Mobile Device Headline: 
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः डॉ. रवींद्र कोल्हे
Appearance Status Tags: 
Mukhya News
Struggle to get rid of mental pain: Dr. Ravindra KolheStruggle to get rid of mental pain: Dr. Ravindra Kolhe
Mobile Body: 

कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला लागलेला चिखल स्वच्छ करता येतो; मात्र मनाला झालेल्या वेदना दूर करता येत नाहीत. लोकांच्या याच वेदना दूर करण्यासाठीच गेली ३७ वर्षे आपला संघर्ष सुरू आहे. यामध्ये आपण यशस्वी झालो हे मोठे समाधान आहे, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र कोल्हे यांनी केले.

येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त क्रांतिअग्रणी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्या पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे होते. या वेळी आमदार अरुण अण्णा लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, प्रा. जे. एफ. पाटील, ॲड. सुभाष पाटील उपस्थित होते. 

डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘मेळघाटात अनेक गोष्टी या लोकाभिमुख केल्या जातात, त्यामुळे शेतकरी आत्महत्या अजिबात नाहीत. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणी सोडवणे यालाच धर्म म्हणतात आणि याच धर्माचे पालन मी आजवर करत आहे. ’’

स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रताप लाड यांनी केले. परिचय जयवंत आवटे यांनी केले. निवेदन व मानपत्र वाचन श्रीकांत माने यांनी केले. तर कुंडलिक एडके यांनी आभार मानले. या वेळी ॲड. प्रकाश लाड, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, सचिन कदम, शरद लाड, प्रमिलताई लाड, अलकाताई लाड, मीनाक्षीताई लाड, सुनंदाताई लाड, धनश्रीताई लाड, साधना लाड, अंजली कदम, मनस्विता पाटील, अपेक्षा लाड, व्ही. वाय. पाटील, सुरेश खारगे आदी उपस्थित होते.

या वेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ‘‘माणसांनी माणसासारखे वागले पाहिजे, भौतिक गोष्टींचा हव्यास तात्पुरता असतो, पण चिरंतन हे व्यक्तिमत्त्व असते ते सुधारले पाहिजे. वैद्यकीय सेवा पुरवताना ही साधी राहणी जपली जाते. हे डॉ. कोल्हेनीं समाजाला दाखवून दिले.’’ 

अरुण लाड यांनी पुरस्काराबाबतची भूमिका सांगितली, ते म्हणाले, ‘‘क्रांतिअग्रणी जी. डी. बापू यांनी स्वातंत्र्यासाठी प्रचंड त्याग केला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही बापू सर्वसामान्यांच्या सुखासाठी लढत राहिले. बापू जे जीवन जगले तेच डाॕ. रवींद्र कोल्हे जीवन जगत आहेत. डाॕ. कोल्हे हे नि:स्पृह भावनेने आदिवासी भागात लोकांची सेवा करत आहेत. समाजाची सेवा हेच जीवन समजून ते आयुष्यभर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची समाजाला प्रेरणा मिळावी याच भूमिकेतून डाॕ. कोल्हे यांना हा पुरस्कार दिला आहे.’’
 
English Headline: 
Agriculture news in Marathi Struggle to get rid of mental pain: Dr. Ravindra Kolhe
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
रवींद्र कोल्हे ravindra kolhe पुरस्कार awards आमदार दूध जे. एफ. पाटील मेळघाट melghat अंजली anjali लढत fight वन forest
Search Functional Tags: 
रवींद्र कोल्हे, Ravindra Kolhe, पुरस्कार, Awards, आमदार, दूध, जे. एफ. पाटील, मेळघाट, Melghat, अंजली, Anjali, लढत, fight, वन, forest
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Struggle to get rid of mental pain: Dr. Ravindra Kolhe
Meta Description: 
Struggle to get rid of mental pain: Dr. Ravindra Kolhe
माणसाच्या अंगाला, कपड्याला लागलेला चिखल स्वच्छ करता येतो; मात्र मनाला झालेल्या वेदना दूर करता येत नाहीत. लोकांच्या याच वेदना दूर करण्यासाठीच गेली ३७ वर्षे आपला संघर्ष सुरू आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment