[ad_1]
परभणी ः ‘‘कृषी माल प्रक्रियेच्या अभावी अन्नधान्ये, भाजीपाला व फळांची मोठी नासाडी होते. नुकसान टाळण्यासाठी शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. मराठवाड्यात कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी आहे,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातर्फे भारतीय कृषी संशोधन परिषद अनुदानित कौशल्य विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थीसाठी ‘शेतमाल प्रक्रिया लघु उद्योग’ या विषयावरील प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंगळवारी (ता. २३) ते बोलत होते. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके ,कृषी प्रक्रियाअभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता खोडके, प्रा. मधुकर मोरे डॉ. प्रमोदिनी मोरे उपस्थिती होत्या.
डॉ. गोखले म्हणाले, ‘‘अन्नधान्य, डाळ आणि अन्य शेतीमाल यांचे प्रक्रिया करून आवश्यक पॅकेजिंग केल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक आर्थिक मोबदला मिळतो.’’
डॉ. वासकर म्हणाले, ‘‘आहारातील चिंच, आले, लसूण यावर प्रक्रिया करून त्यावर आधारित छोटे छोटे उद्योग सुरु करण्यास मराठवाड्यात खूप संधी आहेत.’’
डॉ. खोडके म्हणाले, ‘‘कृषी प्रक्रिया उद्योग याचा देशाच्या विकासातील सहभाग वाढत आहे. प्रशिक्षणात लघुउद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध शासकीय योजना, अर्थ सहाय्यासाठी बँक व इतर संस्थांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, यासह सोयाबीन प्रक्रिया उद्या, हळद व अद्रक प्रक्रिया, फळे व भाजीपाला प्रक्रिया, जवसापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे आदी माहिती व प्रात्यक्षिके होतील.’’

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.