मराठवाड्यात गती पकडतोय हंगाम 

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ७३ साखर कारखान्यांपैकी आठही जिल्ह्यांतील ३७ कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवातव केली आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत २० कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केली होती. त्यामध्ये १७ कारखान्यांची पुन्हा भर पडली आहे. सुरू झालेल्या कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत १३ लाख ६३ हजार ८०४ टन उसाचे गाळप करत ४.८४ ते ७.७२ दरम्यान कमी अधिक साखर उताऱ्यातून ९ लाख ८९ हजार ९७० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. उशिराने व धीम्या गतीने सुरू झालेला ऊस गाळप हंगाम आता गती पकडताना दिसते आहे. 

साधारणत: १५ ऑक्‍टोबरपासून गाळप हंगाम सुरू होणे अपेक्षित असताना ऑक्‍टोबरच्या शेवटच्या व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस गाळपाला सुरुवातव केली. उशिराने सुरू झालेल्या यंदाच्या गाळप हंगामासाठी औरंगाबाद प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या खानदेश व मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी परवाना मागितला होता. त्यापैकी ४ कारखान्यांना परवाना मिळाला नव्हता.

साखर विभागाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील ७३ साखर कारखान्यांपैकी ३७ कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केली. त्यामध्ये औरंगाबाद प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद व बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी ४, जालना जिल्ह्यातील २, नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या परभणीतील ६, हिंगोली व नांदेडमधील प्रत्येकी ३, लातूरमधील ७, मराठवाड्यातील मात्र सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ खासगी व ३ सहकारी कारखान्यांनी मिळून १५ नोव्हेंबरपर्यंत ३ लाख ९५ हजार ६४७ टन उसाचे गाळप करत ७.७२ टक्‍के उताऱ्याने ३ लाख ५ हजार ६६० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील एका सहकारी व ३ खासगी साखर कारखान्यांनी ९६ हजार ८५३ टन उसाचे गाळप करत ७.१५ टक्‍के उताऱ्याने ६९२२५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.

बीड जिल्ह्यातील ३ सहकारी व एका खासगी कारखान्यांसह ४ कारखान्यांनी १ लाख ४२ हजार ५६२ टन उसाचे गाळप करत ६.९ टक्‍के साखर उताऱ्याने ९८ हजार ४३० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी ८३१५० टन उसाचे गाळप करत ७.०७ टक्‍के साखर उताऱ्याने ५८७८० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. परभणी जिल्ह्यातील ६ खासगी कारखान्यांनी २ लाख ७३ हजार ६१० टन उसाचे गाळप करत ७.३८ टक्‍के साखर उताऱ्याने २ लाख २ हजार २५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील एक सहकारी व दोन खासगी मिळून ३ कारखान्यांनी १ लाख २६ हजार ७२० टन उसाचे गाळप करत ७.५७ टक्‍के साखर उताऱ्याने ९५ हजार ९०० क्‍विंटल साखर उत्पादन केले. 

नांदेड जिल्ह्यातील ३ खासगी साखर कारखान्यांनी २४ हजार ६७९ टन उसाचे गाळप करत सर्वात कमी ४.८४ टक्‍के साखर उताऱ्याने ११ हजार ९५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी व ३ खासगी मिळून ७ कारखान्यांनी २ लाख २० हजार ४८१ टन उसाचे गाळप केले. ६.७१ टक्‍के साखर उतारा राखत १ लाख ४८ हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली. 

प्रतिक्रिया 

आधीच ऊस गाळप सुरू होण्याला विलंब झालेला आहे. त्यामुळे परवाने घेतलेल्या कारखान्यांनी तत्काळ गाळप सुरू करून कुणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच एफआरपी बाकी असलेल्यांनी ती तत्काळ चुकती करावी, अन्यथा शासन आदेशाप्रमाणे कारवाई अनिवार्य राहील. 
-शरद जरे, प्रादेशिक साखर सहसंचालक, औरंगाबाद 
 
News Item ID: 
820-news_story-1637156922-awsecm-558
Mobile Device Headline: 
मराठवाड्यात गती पकडतोय हंगाम 
Appearance Status Tags: 
Mukhya News
The season is gaining momentum in MarathwadaThe season is gaining momentum in Marathwada
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi The season is gaining momentum in Marathwada
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
साखर ऊस औरंगाबाद aurangabad गाळप हंगाम खानदेश विभाग sections बीड beed नांदेड nanded परभणी parbhabi लातूर latur तूर सोलापूर पूर floods उस्मानाबाद usmanabad खत fertiliser
Search Functional Tags: 
साखर, ऊस, औरंगाबाद, Aurangabad, गाळप हंगाम, खानदेश, विभाग, Sections, बीड, Beed, नांदेड, Nanded, परभणी, Parbhabi, लातूर, Latur, तूर, सोलापूर, पूर, Floods, उस्मानाबाद, Usmanabad, खत, Fertiliser
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The season is gaining momentum in Marathwada
Meta Description: 
The season is gaining momentum in Marathwada
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ७३ साखर कारखान्यांपैकी आठही जिल्ह्यांतील ३७ कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवातव केली आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत २० कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केली होती.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X