मराठ्यांना १६ टक्के आरक्षण जाहीर, विधेयक एकमताने मंजूर

मराठ्यांना १६ टक्के आरक्षण जाहीर, विधेयक एकमताने मंजूर

आम्ही कास्तकार, मुंबई: मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विधेयकाला सर्वपक्षीयांनी एकमताने सहमती दर्शवल्याने हे विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार आहे.

हेच विधेयक आज विधानपरिषदेतही सादर करण्यात आले. तेथे देखील या विधेयकाला मंजुरी मिळाली. यानंतर राज्यपालांची स्वाक्षरी होणार आहे. ही स्वाक्षरी सुद्धा आजच करण्यात यावी अशी मागणी आझाद मैदानावर बसलेल्या आंदोलकांनी केली आहे.

मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्रपणे १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यानुसार देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आज (गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आराखडा सभागृहात सादर केला. त्याला सर्वपक्षीयांनी एकमताने संमती दर्शवली आहे.

Leave a Comment

X