माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते ः दुर्गा बघेले

अकोला ः एमएस्सी कृषीमध्ये शिक्षण घेतलेल्या दुर्गा जनार्दन बघेले या विद्यार्थिनीने सात सुवर्ण व एक रौप्य पदकासह एकूण आठ पदकांची कमाई केली. तिचे नाव व पदकांचा तपशील जाहीर होत असताना दीक्षान्त सोहळ्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत तिच्या कर्तृत्वाला सलाम केला. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तिला ही पदके प्रदान करण्यात आली. माझ्या वडिलांनी मला मुलासारखे सांभाळले. त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते, अशा शब्दांत तिने ‘अॅग्रोवन’शी बोलताना भावना व्यक्त केली. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षान्त सोहळ्यात दुर्गा हिने सर्वाधिक पदके जिंकली. तिने कीटकशास्त्र या विषयात एमएस्सी पूर्ण केली. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा या दुर्गम भागातून ती शिक्षणासाठी नागपूरच्या कृषी महाविद्यालयात दाखल झाली होती. दुर्गाने सुरुवातीपासून शिक्षणात काही वेगळे करण्याचे ध्येय उराशी बाळगल्याचे सांगितले.वडिलांनी सुरुवातीपासून मुलाप्रमाणे वागवले. ते जास्त शिकलेले नसल्याने मुलीने आपले स्वप्न पूर्ण करावे, असे वाटायचे. याच भावनेने दुर्गाने मेहनत केल्याचे सांगितले. एमएस्सीला तिने कीटकशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळवले. वडील, माहेरचे नातेवाईक, लग्नानंतर पती, सासू-सासऱ्यांनी खूप सहकार्य केल्याचे ती म्हणाली. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सोहळ्यात तिला कृषिमंत्री भुसे, कुलगुरू डॉ. विलास भाले, डॉ. आशीष पातूरकर, डॉ. आर. सी. अग्रवाल यांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले. मुलांमधून वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचा बीएस्सीचा विद्यार्थी राहुल शांताराम कड याने सर्वाधिक तीन सुवर्ण, एक रौप्य, तीन रोख असे सात पदके मिळवले.

News Item ID: 
820-news_story-1635517339-awsecm-840
Mobile Device Headline: 
माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते ः दुर्गा बघेले
Appearance Status Tags: 
Mukhya News
I wanted to fulfill my father's dream: Durga DurgaI wanted to fulfill my father's dream: Durga Durga
Mobile Body: 

अकोला ः एमएस्सी कृषीमध्ये शिक्षण घेतलेल्या दुर्गा जनार्दन बघेले या विद्यार्थिनीने सात सुवर्ण व एक रौप्य पदकासह एकूण आठ पदकांची कमाई केली. तिचे नाव व पदकांचा तपशील जाहीर होत असताना दीक्षान्त सोहळ्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत तिच्या कर्तृत्वाला सलाम केला. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तिला ही पदके प्रदान करण्यात आली. माझ्या वडिलांनी मला मुलासारखे सांभाळले. त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते, अशा शब्दांत तिने ‘अॅग्रोवन’शी बोलताना भावना व्यक्त केली. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षान्त सोहळ्यात दुर्गा हिने सर्वाधिक पदके जिंकली. तिने कीटकशास्त्र या विषयात एमएस्सी पूर्ण केली. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा या दुर्गम भागातून ती शिक्षणासाठी नागपूरच्या कृषी महाविद्यालयात दाखल झाली होती. दुर्गाने सुरुवातीपासून शिक्षणात काही वेगळे करण्याचे ध्येय उराशी बाळगल्याचे सांगितले.वडिलांनी सुरुवातीपासून मुलाप्रमाणे वागवले. ते जास्त शिकलेले नसल्याने मुलीने आपले स्वप्न पूर्ण करावे, असे वाटायचे. याच भावनेने दुर्गाने मेहनत केल्याचे सांगितले. एमएस्सीला तिने कीटकशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळवले. वडील, माहेरचे नातेवाईक, लग्नानंतर पती, सासू-सासऱ्यांनी खूप सहकार्य केल्याचे ती म्हणाली. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सोहळ्यात तिला कृषिमंत्री भुसे, कुलगुरू डॉ. विलास भाले, डॉ. आशीष पातूरकर, डॉ. आर. सी. अग्रवाल यांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले. मुलांमधून वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचा बीएस्सीचा विद्यार्थी राहुल शांताराम कड याने सर्वाधिक तीन सुवर्ण, एक रौप्य, तीन रोख असे सात पदके मिळवले.

English Headline: 
Agriculture news in Marathi I wanted to fulfill my father’s dream: Durga Durga
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कृषी agriculture शिक्षण education दादा भुसे dada bhuse स्वप्न अॅग्रोवन agrowon agrowon वन forest कृषी विद्यापीठ agriculture university विषय topics लग्न
Search Functional Tags: 
कृषी, Agriculture, शिक्षण, Education, दादा भुसे, Dada Bhuse, स्वप्न, अॅग्रोवन, AGROWON, Agrowon, वन, forest, कृषी विद्यापीठ, Agriculture University, विषय, Topics, लग्न
Twitter Publish: 
Meta Keyword: 
I wanted to fulfill my father’s dream: Durga Durga
Meta Description: 
I wanted to fulfill my father’s dream: Durga Durga
एमएस्सी कृषीमध्ये शिक्षण घेतलेल्या दुर्गा जनार्दन बघेले या विद्यार्थिनीने सात सुवर्ण व एक रौप्य पदकासह एकूण आठ पदकांची कमाई केली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X