Take a fresh look at your lifestyle.

मार्केट शेतकऱ्यांसाठी आहे अन् इथंच कोथिंबीर विकणार!

0

नगर ः ‘‘हे मार्केट (बाजार समिती) आमच्या शेतकऱ्यांसाठी आहे. मी इथेच बसून कोथिंबीर विकणार. तुला कोणाला सांगायचे ते सांग?’’ हे खमके उत्तर आहे बाजार समितीत थेट भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकरी महिलेचे. नगर बाजार समितीमधील एका भाजीपाला खरेदीदाराच्या कर्मचाऱ्याने दुकानासमोरील मोकळ्या जागेत कोथिंबीर विक्रीला विरोध केल्यानंतर महिलेने सडेतोड उत्तर देत तेथेच बसून कोथिंबिरीची विक्री केली.  

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती बाजारात दररोज सकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत भाजीपाल्याचे लिलाव होतात. जास्तीचा भाजीपाला घेऊन येणारे शेतकरी अडते, व्यापाऱ्यांना भाजीपाल्याची विक्री करतात. ताजा व स्वच्छ भाजीपाला मिळत असल्याने अनेक ग्राहक सकाळीच बाजार समितीत जाऊन भाजीपाला खरेदी करतात. त्यामुळे ठोक भाजीपाला खरेदी करणारे व्यापारीच थेट ग्राहकांना किरकोळ विक्री करण्यासाठी दुकान मांडतात. शेतकऱ्यांनी बाजारात थेट विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मज्जाव केला जातो. त्यामुळे बाजार समितीपासून दूरवर बसून अनेक शेतकऱ्यांना किरकोळ भाजीपाला विक्री करावी लागते. 

आज (मंगळवारी) सकाळी नगर तालुक्यातील भोरवाडी येथील छबूबाई रावसाहेब वाघ या शेतकरी महिला कोथिंबीर घेऊन बाजार समितीत आल्या. एका भाजीपाला खरेदीदार दुकानासमोरील मोकळ्या जागेत बसून कोथिंबीर विकू लागल्या. त्याच वेळी संबंधित दुकानदाराच्या कर्मचाऱ्याने त्यांना तेथे कोथिंबीर विक्री करायला मज्जाव केला. मात्र, खमक्या शेतकरी महिलेने त्या कर्मचाऱ्याचा विरोध झुगारून ‘कोथिंबिरीची विक्री करणार,’ असे ठणकावून सांगत तेथेच बसून दहा मिनिटांत साठ जुड्या कोथिंबीर विकली. बाजारात कोथिंबिरीला तेरा रुपये जुडीला दर होता. मात्र छबूबाईच्या कोथिंबिरीला २० रुपये दर मिळाला. छबूबाईचे नातू संतोष वाघ सोबत होते. त्यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यावर छबूबाईच्या खमकेपणाचे कमेंट करून अनेकांनी कौतुक केले.  

नगर जिल्ह्यात थेट विक्रीचा बोजवारा 
शेतकऱ्यांनी पिकविलेला माल ग्राहकांना थेट विक्री करता यावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. मागील काळात ‘थेट शेतकरी ते ग्राहक विक्री’ हा उपक्रम कृषी विभागाने जोरदार राबवला जात असून ‘आत्मा’अंतर्गत विक्री सुरू असल्याचा  दावा केला जात असला, तरी नगरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने व आत्मा विभागाने यासाठी काहीही केलेले नाही. ‘थेट शेतकरी ते ग्राहक विक्री’ योजना नगर जिल्ह्यात कृषी विभाग राबवतच नसल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर कौतुक
छबूबाई यांचा मुलगा संतोष वाघ यांनी बाजार समितीत घडलेली घटना सोशल मीडियावर शेअर केली. त्याला नेटकऱ्यांनी छबूबाईच्या खमकेपणाचे भरभरून कौतुक केले. तसेच अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला.

News Item ID: 
820-news_story-1635257697-awsecm-986
Mobile Device Headline: 
मार्केट शेतकऱ्यांसाठी आहे अन् इथंच कोथिंबीर विकणार!
Appearance Status Tags: 
Mukhya News
The market is for farmers and will sell cilantro here!The market is for farmers and will sell cilantro here!
Mobile Body: 

नगर ः ‘‘हे मार्केट (बाजार समिती) आमच्या शेतकऱ्यांसाठी आहे. मी इथेच बसून कोथिंबीर विकणार. तुला कोणाला सांगायचे ते सांग?’’ हे खमके उत्तर आहे बाजार समितीत थेट भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकरी महिलेचे. नगर बाजार समितीमधील एका भाजीपाला खरेदीदाराच्या कर्मचाऱ्याने दुकानासमोरील मोकळ्या जागेत कोथिंबीर विक्रीला विरोध केल्यानंतर महिलेने सडेतोड उत्तर देत तेथेच बसून कोथिंबिरीची विक्री केली.  

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती बाजारात दररोज सकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत भाजीपाल्याचे लिलाव होतात. जास्तीचा भाजीपाला घेऊन येणारे शेतकरी अडते, व्यापाऱ्यांना भाजीपाल्याची विक्री करतात. ताजा व स्वच्छ भाजीपाला मिळत असल्याने अनेक ग्राहक सकाळीच बाजार समितीत जाऊन भाजीपाला खरेदी करतात. त्यामुळे ठोक भाजीपाला खरेदी करणारे व्यापारीच थेट ग्राहकांना किरकोळ विक्री करण्यासाठी दुकान मांडतात. शेतकऱ्यांनी बाजारात थेट विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मज्जाव केला जातो. त्यामुळे बाजार समितीपासून दूरवर बसून अनेक शेतकऱ्यांना किरकोळ भाजीपाला विक्री करावी लागते. 

आज (मंगळवारी) सकाळी नगर तालुक्यातील भोरवाडी येथील छबूबाई रावसाहेब वाघ या शेतकरी महिला कोथिंबीर घेऊन बाजार समितीत आल्या. एका भाजीपाला खरेदीदार दुकानासमोरील मोकळ्या जागेत बसून कोथिंबीर विकू लागल्या. त्याच वेळी संबंधित दुकानदाराच्या कर्मचाऱ्याने त्यांना तेथे कोथिंबीर विक्री करायला मज्जाव केला. मात्र, खमक्या शेतकरी महिलेने त्या कर्मचाऱ्याचा विरोध झुगारून ‘कोथिंबिरीची विक्री करणार,’ असे ठणकावून सांगत तेथेच बसून दहा मिनिटांत साठ जुड्या कोथिंबीर विकली. बाजारात कोथिंबिरीला तेरा रुपये जुडीला दर होता. मात्र छबूबाईच्या कोथिंबिरीला २० रुपये दर मिळाला. छबूबाईचे नातू संतोष वाघ सोबत होते. त्यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यावर छबूबाईच्या खमकेपणाचे कमेंट करून अनेकांनी कौतुक केले.  

नगर जिल्ह्यात थेट विक्रीचा बोजवारा 
शेतकऱ्यांनी पिकविलेला माल ग्राहकांना थेट विक्री करता यावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. मागील काळात ‘थेट शेतकरी ते ग्राहक विक्री’ हा उपक्रम कृषी विभागाने जोरदार राबवला जात असून ‘आत्मा’अंतर्गत विक्री सुरू असल्याचा  दावा केला जात असला, तरी नगरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने व आत्मा विभागाने यासाठी काहीही केलेले नाही. ‘थेट शेतकरी ते ग्राहक विक्री’ योजना नगर जिल्ह्यात कृषी विभाग राबवतच नसल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर कौतुक
छबूबाई यांचा मुलगा संतोष वाघ यांनी बाजार समितीत घडलेली घटना सोशल मीडियावर शेअर केली. त्याला नेटकऱ्यांनी छबूबाईच्या खमकेपणाचे भरभरून कौतुक केले. तसेच अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला.

English Headline: 
Agriculture news in Marathi The market is for farmers and will sell cilantro here!
Author Type: 
External Author
सूर्यकांत नेटके
नगर बाजार समिती agriculture market committee कोथिंबिर उत्पन्न सकाळ व्यापार वाघ सोशल मीडिया शेअर उपक्रम कृषी विभाग agriculture department विभाग sections
Search Functional Tags: 
नगर, बाजार समिती, agriculture Market Committee, कोथिंबिर, उत्पन्न, सकाळ, व्यापार, वाघ, सोशल मीडिया, शेअर, उपक्रम, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The market is for farmers and will sell cilantro here!
Meta Description: 
The market is for farmers and will sell cilantro here!
‘‘हे मार्केट (बाजार समिती) आमच्या शेतकऱ्यांसाठी आहे. मी इथेच बसून कोथिंबीर विकणार. तुला कोणाला सांगायचे ते सांग?’’ हे खमके उत्तर आहे बाजार समितीत थेट भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकरी महिलेचे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X