मिरज पूर्व भागाला पाणीपट्टी भरूनही पाणी मिळेना

आरग, जि. सांगली ः नेहमीच दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणारी म्हैसाळ योजना साडे तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली. पण या वर्षी मिरज पूर्व भागातील शेतकरी अद्याप पाण्यापासून वंचित आहे. योजनेची एकरी दोन हजारे प्रमाणे पाणी पट्टी भरून सुद्धा पाणी न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती झाल्यामुळे पूर्व भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पूर्व भागात लोकप्रतिनिधींनी दौरा केला. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दोन चार दिवसांत पाणी सोडण्याची पोकळ आश्वासने देण्यात आली. पण महिना उलटला तरी अद्याप पाणी शिवारात आले नाही. गावातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. पण अद्याप पाणी आले नाही. पाणी येणार या आशेवर शेतकरी जगत आहे.

वाढत्या तापमानामुळे या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिना संपत आला तरी पाण्यासाठी घसा कोरडाच आहे. पूर्व भागातील संपूर्ण गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी अखेर कोरड्याच राहिल्या. योजना गावाच्या दाराशी आहे. पण पिण्यासाठी पाणी नाही. भूजल पातळी खालावली. पिके करपली तसेच शेतीसाठी पाण्याची गरज आता आहे. पण पावसाळ्यात महापुराचे पाणी घेऊन काय करायचे, असा सवाल आक्रमक शेतकरी करीत आहे. कोरोनाच्या महाभयंकर आपत्तीमध्ये येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली जात असून पूर्व भागात दौरा केलेल्या लोकप्रतिनिधींच्या कडून फक्त बघ्याची भूमिका होत आहे.

मे महिना लोटला तरी पाणी सोडण्यात आले नाही. पाण्यासाठी समस्येत वाढ होत असून पूर्व भागाला कोणी वाली आहे का नाही. आता आम्हाला आक्रमक होण्याशिवाय पर्याय नाही. होरपळलेल्या पिकांना आधार देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी आमची आहे.
– दाजी खोत, माजी सरपंच, लक्ष्मिवाडी

News Item ID: 
820-news_story-1590566136-764
Mobile Device Headline: 
मिरज पूर्व भागाला पाणीपट्टी भरूनही पाणी मिळेना
Appearance Status Tags: 
Tajya News
The eastern part of Miraj was flooded but no water was availableThe eastern part of Miraj was flooded but no water was available
Mobile Body: 

आरग, जि. सांगली ः नेहमीच दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणारी म्हैसाळ योजना साडे तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली. पण या वर्षी मिरज पूर्व भागातील शेतकरी अद्याप पाण्यापासून वंचित आहे. योजनेची एकरी दोन हजारे प्रमाणे पाणी पट्टी भरून सुद्धा पाणी न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती झाल्यामुळे पूर्व भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पूर्व भागात लोकप्रतिनिधींनी दौरा केला. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दोन चार दिवसांत पाणी सोडण्याची पोकळ आश्वासने देण्यात आली. पण महिना उलटला तरी अद्याप पाणी शिवारात आले नाही. गावातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. पण अद्याप पाणी आले नाही. पाणी येणार या आशेवर शेतकरी जगत आहे.

वाढत्या तापमानामुळे या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिना संपत आला तरी पाण्यासाठी घसा कोरडाच आहे. पूर्व भागातील संपूर्ण गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी अखेर कोरड्याच राहिल्या. योजना गावाच्या दाराशी आहे. पण पिण्यासाठी पाणी नाही. भूजल पातळी खालावली. पिके करपली तसेच शेतीसाठी पाण्याची गरज आता आहे. पण पावसाळ्यात महापुराचे पाणी घेऊन काय करायचे, असा सवाल आक्रमक शेतकरी करीत आहे. कोरोनाच्या महाभयंकर आपत्तीमध्ये येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली जात असून पूर्व भागात दौरा केलेल्या लोकप्रतिनिधींच्या कडून फक्त बघ्याची भूमिका होत आहे.

मे महिना लोटला तरी पाणी सोडण्यात आले नाही. पाण्यासाठी समस्येत वाढ होत असून पूर्व भागाला कोणी वाली आहे का नाही. आता आम्हाला आक्रमक होण्याशिवाय पर्याय नाही. होरपळलेल्या पिकांना आधार देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी आमची आहे.
– दाजी खोत, माजी सरपंच, लक्ष्मिवाडी

English Headline: 
Agriculture news in Marathi The eastern part of Miraj was flooded but no water was available
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
म्हैसाळ शेती farming कोरोना corona
Search Functional Tags: 
म्हैसाळ, शेती, farming, कोरोना, Corona
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The eastern part of Miraj was flooded but no water was available
Meta Description: 
The eastern part of Miraj was flooded but no water was available
आरग, जि. सांगली ः नेहमीच दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणारी म्हैसाळ योजना साडे तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली. पण या वर्षी मिरज पूर्व भागातील शेतकरी अद्याप पाण्यापासून वंचित आहे. योजनेची एकरी दोन हजारे प्रमाणे पाणी पट्टी भरून सुद्धा पाणी न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती झाल्यामुळे पूर्व भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.Source link

Leave a Comment

X