Take a fresh look at your lifestyle.

मुंबई बाजार समितीत ‘ई-नाम’ नावापुरतेच 

0

मुंबई: शेतकऱ्यांना ऑनलाइन आपला माल विकता यावा आणि व्यापाऱ्यांना ऑनलाइन व्यापार करता यावा. त्याचबरोबर यामार्फत सर्व बाजारपेठा एकमेकांशी जोडल्या जाऊन व्यापार वाढावा, यासाठी सरकारने ‘ई-नाम’ व्यापारपद्धती अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरु केला होता. यासाठी सर्व प्रकारच्या सुविधाही बाजार समितीने दिल्या. आताच्या लॉकडाउनच्या काळात इतर बाजार समितींमध्ये या ‘ई-नाम’ कार्यप्रणालीचा वापर वाढला आहे, मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ‘ई-नाम’चा वापर केलाच जात नसल्याने ही कार्यप्रणाली नावापुरतीच उरली आहे. 

कृषी मालाच्या विक्रीकरिता, एक राष्ट्र एक व्यापार, या संकल्पनेवर ‘ई-नाम’ ही व्यापारपद्धती आधारित आहे. याद्वारे राज्यातीलच नाही, तर देशातील सर्व ५८५ बाजारपेठा एकत्र जोडल्या गेल्या आहेत. येथे नोंदणी करून व्यापारी, शेतकरी यांना आपला माल ऑनलाइन पद्धतीने खरेदी-विक्री करता येतो. याद्वारे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना बाजारात येण्याचीही गरज नाही.

माल विकल्यानंतर शेतकऱ्याला त्याच्या मालाचे पैसे त्याच्या खात्यात जमा होतात. सध्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये ‘ई-नाम’ कार्यप्रणालीचा वापर वाढायला सुरुवात झाली आहे. अनेक व्यापारी, शेतकरी व्यापार करताना ‘ई-नाम’ कार्यप्रणालीचा वापर करत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या मोठ्या बाजारपेठेत आजही या पद्धतीने व्यापार करण्यास व्यापाऱ्यांकडून नापसंतीच दर्शवली जात आहे. त्यामुळे ‘ई-नाम’ कार्यप्रणालीला येथे कोणताच प्रतिसाद मिळत नाही. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त दहा टक्के कृषिमाल थेट शेतकऱ्यांकडून येतो. बाकी ९० टक्के कृषिमाल हा व्यापारी अडते, दलाल यांच्यामार्फत बाजार समितीत येत असतो. येथे व्यापारी, दलाल यांच्यात जास्त व्यापार चालतो. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांचा तसा थेट संबंध येत नसल्याने त्यांच्याकडून ‘ई-नाम’ अंतर्गत व्यापार केला जात नाही.

महत्त्वाचे म्हणजे ‘ई-नाम’साठी नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यांच्याकडूनही तसा व्यापार अजून सुरु झाला नसल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून मिळाली. त्यामुळे इतर ठिकाणी ‘ई-नाम’ला चांगला प्रतिसाद मिळत असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र ‘ई-नाम’च्या बाबतीत मागे राहिली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

News Item ID: 
820-news_story-1589900399-731
Mobile Device Headline: 
मुंबई बाजार समितीत ‘ई-नाम’ नावापुरतेच 
Appearance Status Tags: 
Mukhya News
e-nam e-nam
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi e-Nam only for formality in Mumbi APMC Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
व्यापार ई-नाम मुंबई बाजार समिती उत्पन्न प्रशासन
Search Functional Tags: 
व्यापार, ई-नाम, मुंबई, बाजार समिती, उत्पन्न, प्रशासन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
e-Nam only for formality in Mumbi APMC
Meta Description: 
e-Nam only for formality in Mumbi APMC
शेतकऱ्यांना ऑनलाइन आपला माल विकता यावा आणि व्यापाऱ्यांना ऑनलाइन व्यापार करता यावा. त्याचबरोबर यामार्फत सर्व बाजारपेठा एकमेकांशी जोडल्या जाऊन व्यापार वाढावा, यासाठी सरकारने ‘ई-नाम’ व्यापारपद्धती अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरु केला होता.Source link

X