[ad_1]
युक्रेनहून परतणाऱ्या हजारो मेडिकल स्टुडंट्सच्या भवितव्याचा विचार करून त्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयांत सामावून घेण्याविषयी विचारविनिमय सुरु असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
रशिया- युक्रेन युद्धाची झळ पोहचल्यामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांना सध्या मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे मायदेशी परतेल हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण (Medical Education)अर्ध्यावर सोडून परतलेल्या या विद्यार्थ्याच्या भवितव्याबाबत निर्णय घेतला जाईल. मानवतावादी दृष्टीकोनातून याबाबत काहीतरी निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा- कसा घालणार प्लास्टिक प्रदूषणाला आळा ?
दरम्यान रशिया-युक्रेन युद्धाची झळ पोहचल्याने अनेक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारी यंत्रणेकडूनही त्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येताहेत. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांना भारतातील विविध राज्यांतल्या वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घेण्यात यावे, असा आग्रह सध्या सर्व स्तरावरून व्यक्त केला जात आहे.
या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी निर्णय घेण्याची मागणी देशातील विविध डॉक्टर्स असोसिएशन्सनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (National Medical Commission) केली आहे.
जर युक्रेनमधून परतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांत (Indian Medical Collages) सामावून घेणे शक्य होणार नसेल तर विशेष प्रावधान करून त्यांना इतर देशांतील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश देण्यात यावा, अशी सूचनाही राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या हितांचा विचार करून काहीतरी निर्णय घेतला जाईल. या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, त्यांच्यासाठी शक्य ते सर्व काही करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असेही नमूद केले आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.