मोठी बातमी : या तारखेपासून कापूस खरेदीस होणार सुरुवात

आम्ही कास्तकार : बुलडाणा जिल्हयासह यवतमाळ, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव या जिल्हयांमध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कापूसही चांगला झाला. मात्र कापूस विक्रीची वेळ आली असतानाच देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. घरात सोन्यासारखा कापूस असूनही शेतकरी हतबल झाले होते.

लॉकडाऊन मुळे मोठे नुकसान

लॉकडाऊनमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत होते. बुलडाणा जिल्हयातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सोशल मिडियाच्या माध्यमातून मांडल्या होत्या. जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याशी चर्चा केली. याची दखल घेत येत्या बुधवारपासून म्हणजेच १५ एप्रिलपासून नाफेडमार्फत तूर-हरभरा खरेदी तर कापूस पणन महामंडळामार्फत कापूस खरेदी सुरु होणार आहे.

खरेदी या तारखेपासून होणार सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २५ मार्च पासून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाउन च्या कालावधीत नाफेड तूर हरभरा खरेदी केंद्र व कापूसपणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली होती यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल पडून राहत असल्यामुळे ही खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नाफेड तूर- हरभरा खरेदी, कापूसपणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरू होणार असल्याने शेतमालाची चिंता मिटली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

तुर, हरभरा व कापूस या शेतमालाच्या खरेदीची प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न, औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अप्पर मुख्य सचिव (वित्त) मनोज सैनिक व पणन विभागाचे सचिव अनुपकुमार उपस्थित होते. १५ एप्रिलपासून कापूस खरेदी पुन्हा सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा :

2 thoughts on “मोठी बातमी : या तारखेपासून कापूस खरेदीस होणार सुरुवात”

  1. आमचा कापुस कधी विकला जाईल ते सागा ता,जाफ्राबाद जिल्हा जालना

    Reply
  2. मुकाम पोस्ट देवळे गव्हाण तालुका जाफ्राबाद जिल्हा जालना

    Reply

Leave a Comment

X