मोदींचा मोठेपणा; देर आए, दुरुस्त आए ः राज्यपाल मलिक 


नवी दिल्‍ली : मेघालयाचे राज्‍यपाल सत्‍यपाल मलिक यांनी कृषी कायदे माघारी घेण्याच्या मोदींच्या घोषणाचे स्वागत केले आहे. कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर टीका करणारे मलिक एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले, ‘‘देर आए, दुरस्‍त आए. यापूर्वीच हा निर्णय झाला असता तर आणखी चांगले झाले असते. पण मोदींनी आता मोठेपणा दाखविला. मी शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. आंदोलन शांततेने चालवून त्यांनी इतिहास लिहिला आहे.’’ 

मलिक म्हणाले, ‘‘मी असे म्हटले होते, की मोदींकडून मला अपेक्षा आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी मोठापणा दाखवून शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या. शेतकऱ्यांनीही अनेक संकटांचा सामना करून आंदोलन सुरूच ठेवले.’’ एका प्रश्‍नाला उत्तर देताना मलिक म्हणाले, ‘‘मोदीजी शेतकरी समर्थक आहेत. गुजरातमध्ये त्यांची हीच भूमिका राहिली आहे. पण केंद्रात आल्यानंतर नेमके काय झाले हे कळले नाही.’’

प्रतिक्रिया

केंद्र सरकारने वाद टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र लहान शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. सरकारने हमीभावाबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. समिती गैरराजकीय असावी. बाजारपेठेतील शोषण संपविण्‍यासाठी हमीभावाचा कायदा केला पाहिजे.
– दिनेश कुलकर्णी, 
अखिल भारतीय संघटनमंत्री

हा शेतकऱ्यांचा विजय आहे, देशाचा विजय आहे. हा उद्योगपती आणि उद्योगपतींचे रक्षक असलेल्या नितीश-भाजप सरकारच्या अहंकाराचा पराभव आहे. जगातील सर्वांत शांतीपूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करून शेतकऱ्यांनी उद्योपती धार्जिण्या सरकारला माघार घ्यायला लावली आहे. हा सर्वांचा सामूहिक विजय आहे. 
-तेजस्वी यादव, राष्ट्रीय जनता दल

सरकारने वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यास उशीर केला. या पूर्वीच सरकारने हा निर्णय घेणे आवश्‍यक होते. तसे झाले असते, तर देशात झालेला संघर्ष आणि वाद-विवाद टळला असता.
-मायावती, प्रमुख, बहुजन समाज पार्टी

News Item ID: 
820-news_story-1637332824-awsecm-872
Mobile Device Headline: 
मोदींचा मोठेपणा; देर आए, दुरुस्त आए ः राज्यपाल मलिक 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Modi's greatness; Come late, come right: Governor MalikModi's greatness; Come late, come right: Governor MalikSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X