Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार मोठी कर्जमाफी; १ लाख कोटींच कर्ज होणार माफ?

0






farmer

नवी दिल्ली। मोदीसरकार देशातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटावर मार्ग काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे दिसते. सुरवातीला बळीराजावर लॉकडाऊनचे संकट आले. तर आता टोळधाडीमुळे (locust Attack) शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ लागलं आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दोन्ही बाजूने संकट आली आहेत. 

या संकटातून केंद्र सरकार शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या विचारात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकार(Modi Government) शेतकऱ्याना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देणार असल्याचे समजते. केंद्रसरकारच्या या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांसाठी १ लाख कोटी रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याने तशी घोषणा होऊ शकते. ही कर्जमाफी विविध टप्प्यात दिली जाणार आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात २५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देऊ शकते. लॉकडाऊनमुळे फळे- भाज्यांची मागणी घटली आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. ठोक बाजारात कृषी उत्पादनांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी खाली आले. कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची स्थितीही खराब आहे. ठोक बाजारात कांद्याला ५०० रुपये क्विंटलच्या आसपास भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या विचारात आहे.

केंद्र सरकार आधीपासूनच शेतकऱ्यांवर लक्ष्य केंद्रीत करत आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचेही ध्येय सरकारने बाळगले असून सरकार त्यावर काम करत आहे. काही दिवसांपुर्वीच आत्मनिर्भर भारत अभियानाच्या (Aatmanirbhar Bharat Package) अंतर्गत  २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा सरकारने केली होती. या पॅकेजमधील एक मोठा हिस्सा हा शेतकरी, कृषी, आणि त्यांच्याशी संबंधित उद्योगांसाठी जाहीर करण्यात आला होता.





Previous articlePM किसान – स्वतःच नोंदणी करा आणि मिळवा ६ हजार रूपये…





Source link

X