[ad_1]
सांगली : म्हैसाळ योजना पाण्याच्या मागणी अभावी बंद करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिल्यानंतर शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. योजना नियमित सुरू आहे. जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज तालुक्यातून मागणी वाढलेली आहे. यंदा पाणीपट्टी वसुलीलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मार्चअखेर ५० लाखांहून अधिक रक्कम वसूल झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे विविध टप्प्यांवर ५५ पंप सुरू आहेत. आतापर्यंत ६५० दशलक्ष घनफूट कृष्णा नदीतून उचलले आहे.
म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन आठवड्यात पाण्यासाठी पुरेशी मागणी नोंदवली गेली नाही. त्यामुळे हे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यापर्यंत पोहोचले होते. जत तालुक्यासह अन्य तालुक्यात पाणी हवे असल्यास पाणी मागणी नोंदणी तितकीच महत्त्वाची होती. पाण्याची मागणी नोंद झाली नाही तर, योजनेचे बिल कसे भरले जाणार आणि पाणीपट्टी कशी वसूल होणार, असा प्रश्न पाटबंधारे विभागाच्या समोर उपस्थित झाला होता. त्यामुळे योजना बंद करण्याचा विचार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. योजना बंदच्या इशाऱ्यानंतर कवठेमहांकाळ, जत आणि मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाणी मागणीसाठी बैठका सुरू झाल्या. मागणी कमी असल्यामुळे ग्रामपंचायतीचे ठरावही सुरवातीच्या टप्प्यात घेतले.
जलसंपदाच्या नियमानुसार ८१ः१९ प्रमाणात पाण्याचे पैसे भरावे लागतात. यातील १९ टक्के रक्कमही शेतकरी भरण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. म्हैसाळच्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याची यंदा सवय तरी लागते आहे. टेंभूसह अन्य योजनांची पाणीपट्टी संबंधितांच्या ऊस बिलातून वसूल केली जाते. यामुळे पाणीपट्टी शंभर टक्के वसूल होते. त्यातच पाण्याची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी पाटबंधारे विभागाने नोंदवली आहे. त्यामुळे मध्यंतरीच योजना बंद करण्याची वेळ आता पाटबंधारे विभागावर येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पाणीपट्टी वसूल झाल्याने ही योजना सुरू राहण्यास मदत होईल.
प्रतिक्रिया
म्हैसाळ योजनेला यापूर्वीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ३१ मार्चअखेर ५० लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली आहे. त्यात मोठी सुधारणा अपेक्षित आहे. आतापर्यंत ६५० दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) पाणी कृष्णा नदीतून उचलले आहे.
-सूर्यकांत नलवडे,
कार्यकारी अभियंता, म्हैसाळ सिंचन योजना

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.