यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवट

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पाणंद रस्ते मोहीम ‘मिशन’ म्हणून हाती घेतली होती. त्यासाठी ‘स्पेशल ड्राइव्ह’चे नियोजन केले होते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दोन हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले. मात्र वर्षभरानंतरही हे मिशन अर्धवट स्थितीत असून, शेतकरी पाणंद रस्त्यांची प्रतीक्षा करीत आहे. 

यांत्रिकीकरणामुळे शेतात पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर शेतीपयोगी कामे यंत्रांमार्फत केली जातात. या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी गावागावांत पाणंद रस्ते आवश्यक आहेत. पावसाळ्यात पाणंद रस्त्यांअभावी चिखल तुडवीत जावे लागते. शेतीपयोगी यंत्रसामग्रीची ने-आण करताना प्रचंड त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन माजी पालकमंत्री संजय राठोड यांनी पाणंद रस्त्यांची मोहीम सुरू करण्यासंदर्भात नियोजन केले होते. त्यापूर्वी पालकमंत्री मदन येरावार यांनीही पाणंद रस्त्यांच्या विषयाला प्राधान्य दिले होते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी ही मोहीम ‘मिशन’ म्हणून स्वीकारली होती. 

शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्यातील १२ हजार रस्त्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात दोन हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्याचे निश्‍चित झाले होते. या कामांकरिता खासदार-आमदार स्थानिक विकास निधी, १४ वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समिती, जि. प. शेष फंड, रोहयो, ग्रामपंचायतींना मिळणारे अनुदान, ग्रामपंचायतींचे महसुली उत्पन्न, ‘पेसा’अंतर्गत असणारा निधी, नावीन्यपूर्ण योजनांचा निधी, जनसुविधा व मोठ्या ग्रामपंचायतींतील नागरी सुविधा फंड, ठक्करबाप्पा, खनिज विकास निधी आदी बाबींतून निधी उपलब्ध केला जाणार होता. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंत्यांना जेसीबी, पोकलॅन्ड मशिनचे दर, डिझेलचा खर्च याबाबत दर घेऊन निविदा प्रक्रियेबाबत जबाबदारी दिली होती. प्रत्यक्षात वर्ष लोटूनही अद्याप पाणंद रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही.

 दुसरी दिवाळी गेली तरी… 
जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्त्यांचा प्रारंभ गेल्यावर्षी दिवाळीच्या दिवशी एकाच वेळी करण्याचे नियोजन होते. या कामात पारदर्शकता आणण्याकरिता व या रस्त्यांचे काम नियमित होते की नाही, हे तपासण्याकरिता पाणंद रस्ते संकेतस्थळ विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. त्यात रस्त्यांचे पूर्वीचे, काम सुरू असल्याचे व रस्ता पूर्ण झाल्यानंतरचे फोटो, रस्त्याची लांबी-रुंदी, कामांवर खर्च करण्यात आलेली रक्कम आदी संकेतस्थळावर अपलोड करणे इत्यादींचा समावेश होता. मात्र दुसरी दिवाळी गेल्यानंतरही या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही.

News Item ID: 
820-news_story-1637070038-awsecm-973
Mobile Device Headline: 
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवट
Appearance Status Tags: 
Tajya News
Panand road campaign partialPanand road campaign partial
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi Panand road campaign partial
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
यवतमाळ yavatmal विषय topics शेती farming यंत्र machine मदन येरावार madan yerawar आमदार विकास यती yeti दिवाळी मात mate
Search Functional Tags: 
यवतमाळ, Yavatmal, विषय, Topics, शेती, farming, यंत्र, Machine, मदन येरावार, Madan Yerawar, आमदार, विकास, यती, Yeti, दिवाळी, मात, mate
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Panand road campaign partial
Meta Description: 
Panand road campaign partial
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दोन हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले. मात्र वर्षभरानंतरही हे मिशन अर्धवट स्थितीत असून, शेतकरी पाणंद रस्त्यांची प्रतीक्षा करीत आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X