[ad_1]
कऱ्हाड, जि. सातारा ः ‘‘महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी केले. राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी विचाराने त्यांनी पुढे नेला. सहकारी साखर कारखानदारी उभी करुन सामान्य शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक क्रांती केली. त्यांच्या विचाराने आज महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे’’, असे प्रतिपादन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कऱ्हाड (जि. सातारा) येथील प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी मंत्री पाटील, खासदार श्रीनिवास पाटील आदींनी अभिवादन केले. दरम्यान मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून आलेल्या यशवंत ज्योतीचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग पाटील, पालिकेतील विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, डॉ. अशोक गुजर, ॲड. मानसिंग पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी खूप त्याग केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजकरणामध्ये काम करताना महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. राज्यात पिकणाऱ्या मालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहिली पाहिजे, या साठी त्यांनी फार मोठे योगदान दिले.’’

[ad_2]
Source link