योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा भाजपला रामराम !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला आहे. मौर्य हे समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीत मग्न असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा मोठा झटका मानला जात आहे.  

स्वामी प्रसाद मौर्य हे कधीकाळी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे निकटवर्तीय मानले जात. मायावतींच्या सरकारमध्ये मौर्य यांनी मंत्रीपदही भूषवले होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाकडून पैसे घेऊन तिकीट वाटप केले जात असल्याचा आरोप करत स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

राज्यातील ओबीसी वर्गाचा मोठा चेहरा अशी ओळख असलेल्या मौर्य यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली आहे.  या सरकारकडून शेतकरी, दलित, मागासवर्गीय, बेरोजगारांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत मौर्य यांनी राज्यपाल आनंदीबेन यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला.  प्रतिकूल परिस्थिती आणि वैचारिक मतभेद असतानाही मी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कामगार आणि रोजगार मंत्री म्हणून जबाबदारीने काम केलेले आहे.मात्र या सरकारकडून शेतकरी, बेरोजगार, दलित, मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष झाल्याने आपण आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे स्वामी प्रसाद यांनी नमूद केले आहे. 

भाजप आमदार रोशनलाल शर्मा यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा राजभवनमध्ये जाऊन राज्यपालांकडे सोपवला. त्यामुळे शर्मा यांच्याही सोडचिठठीच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र शर्मा यांनी आपण अद्याप काही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले त्यामुळे मौर्य यांच्यासमवेत आणखी किती आमदार भाजप सोडणार ?  हा आता चर्चेचा विषय बनला आहे. 

राजीनाम्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या काही समर्थकांसह समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांची भेट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण अखिलेश यादव यांनीच ट्विट करून मौर्य यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसारित केले आहे. स्वामीप्रसाद मौर्य हे सामाजिक न्यायासाठी लढणारे असल्याचे सांगत अखिलेश यांनी ‘सामाजिक न्याय का इन्कलाब होगा बाईस मी बदलाव होगा’ असे वाक्यही उद्धृत केले आहे. 

दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखा ओबीसी नेत्याने पक्ष सोडल्यामुळे भाजपच्या गोटात साशंकता निर्माण झाली आहे. राज्यातील ओबीसी वर्ग मुख्यमंत्री योगी सरकारच्या कारभारावर नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर मौर्य यांचे समाजवादी पक्षाकडे जाणे भाजपसाठी मोठा धक्का मनाला जातोय. मौर्य यांच्या राजीनाम्यांनंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा अपवाद वगळता अन्य नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाही.  

News Item ID: 
820-news_story-1641908498-awsecm-831
Mobile Device Headline: 
योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा भाजपला रामराम !
Appearance Status Tags: 
Section News
swami prasad maurya
Mobile Body: 

English Headline: 
Setback for BJP as UP Minister Swami Prasad Maurya quits
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
दलित बेरोजगार रोजगार employment मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप मायावती mayawati आमदार अखिलेश यादव akhilesh yadav
Search Functional Tags: 
दलित, बेरोजगार, रोजगार, Employment, मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ, भाजप, मायावती, Mayawati, आमदार, अखिलेश यादव, Akhilesh Yadav
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Setback for BJP as UP Minister Swami Prasad Maurya quits
Meta Description: 
राज्यातील ओबीसी वर्गाचा मोठा चेहरा अशी ओळख असलेल्या मौर्य यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली आहे.  या सरकारकडून शेतकरी, दलित, मागासवर्गीय, बेरोजगारांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत मौर्य यांनी राज्यपाल आनंदीबेन यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment