रविकांत तुपकरांचे आता बुलडाण्यात आंदोलन सुरू

बुलडाणा/नागपूर : सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १७ नोव्हेंबरला नागपूर येथे संविधान चौकात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. दरम्यान, रात्री पोलिसांनी जबरदस्तीने तुपकर व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना पोलिस बंदोबस्तात बुलडाणा येथे सोडण्यात आले. परंतु तुपकरांनी आपले आंदोलन मागे न घेता पहाटे सहा वाजता बुलडाण्यात पोहचल्यावर त्यांच्या घरासमोर बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

त्रिपुरा घटनेच्या अनुषंगाने सध्याची संचारबंदी असल्याने पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनास परवानगी नाकारली होती. तसेच नोटीसही बजावली होती. परंतु हा सर्व विरोध झुगारून तुपकरांनी संविधान चौकात सकाळी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. रात्रीपर्यंत हे आंदोलन सुरळीत सुरू असताना पोलिसांनी जबरदस्तीने रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला. अखेर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तुपकरांना नागपुरातून अमरावती येथे हलवीत असल्याचे सांगून बंदोबस्तात नागपुरातून रवाना केले.

त्यानंतर अमरावतीला न थांबता पोलिस बंदोबस्तात पहाटे सहा वाजता त्यांना बुलडाणा येथे सोडण्यात आले. बुलडाण्यात पोहोचल्यावर तुपकरांनी त्यांच्या घरासमोरच बसून आपले अन्नत्याग आंदोलन पुढे सुरू केले. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाची धांदल उडाली. कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी झाले असून सध्या येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील वरवंड, नांद्राकोळी, तांदूळवाडी, पांगरी उबरहंडे, पळसखेड दौलत, भरोसा, कवठळ, गुंज, अंत्री खेडेकर, मेरा खुर्द, शिंदी, साखरखेर्डा, अंत्री देशमुख, गोहगाव दांदळे, हिवरा खुर्द, सारशिव यासह जिल्ह्यातील अनेक गावांतील कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी फेरी काढून चावडीवर, मंदिरावर सत्याग्रह सुरू करून या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.  

सरकारला आपली ताकद दाखवा : तुपकर
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आता निर्णायक लढा लढण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण शेवटच्या श्‍वासापर्यंत हा लढा लढणार आहे. त्यामुळे १९ नोव्हेंबर रोजी रास्तारोको आंदोलनात सर्व कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे. तसेच २० नोव्हेंबरला गावबंदी करून सरकारला आपली शेतकरी एकजुटीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

News Item ID: 
820-news_story-1637243152-awsecm-724
Mobile Device Headline: 
रविकांत तुपकरांचे आता बुलडाण्यात आंदोलन सुरू
Appearance Status Tags: 
Mukhya News
Ravikant Tupkar's agitation now starts in BuldanaRavikant Tupkar's agitation now starts in Buldana
Mobile Body: 

बुलडाणा/नागपूर : सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १७ नोव्हेंबरला नागपूर येथे संविधान चौकात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. दरम्यान, रात्री पोलिसांनी जबरदस्तीने तुपकर व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना पोलिस बंदोबस्तात बुलडाणा येथे सोडण्यात आले. परंतु तुपकरांनी आपले आंदोलन मागे न घेता पहाटे सहा वाजता बुलडाण्यात पोहचल्यावर त्यांच्या घरासमोर बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

त्रिपुरा घटनेच्या अनुषंगाने सध्याची संचारबंदी असल्याने पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनास परवानगी नाकारली होती. तसेच नोटीसही बजावली होती. परंतु हा सर्व विरोध झुगारून तुपकरांनी संविधान चौकात सकाळी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. रात्रीपर्यंत हे आंदोलन सुरळीत सुरू असताना पोलिसांनी जबरदस्तीने रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला. अखेर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तुपकरांना नागपुरातून अमरावती येथे हलवीत असल्याचे सांगून बंदोबस्तात नागपुरातून रवाना केले.

त्यानंतर अमरावतीला न थांबता पोलिस बंदोबस्तात पहाटे सहा वाजता त्यांना बुलडाणा येथे सोडण्यात आले. बुलडाण्यात पोहोचल्यावर तुपकरांनी त्यांच्या घरासमोरच बसून आपले अन्नत्याग आंदोलन पुढे सुरू केले. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाची धांदल उडाली. कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी झाले असून सध्या येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील वरवंड, नांद्राकोळी, तांदूळवाडी, पांगरी उबरहंडे, पळसखेड दौलत, भरोसा, कवठळ, गुंज, अंत्री खेडेकर, मेरा खुर्द, शिंदी, साखरखेर्डा, अंत्री देशमुख, गोहगाव दांदळे, हिवरा खुर्द, सारशिव यासह जिल्ह्यातील अनेक गावांतील कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी फेरी काढून चावडीवर, मंदिरावर सत्याग्रह सुरू करून या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.  

सरकारला आपली ताकद दाखवा : तुपकर
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आता निर्णायक लढा लढण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण शेवटच्या श्‍वासापर्यंत हा लढा लढणार आहे. त्यामुळे १९ नोव्हेंबर रोजी रास्तारोको आंदोलनात सर्व कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे. तसेच २० नोव्हेंबरला गावबंदी करून सरकारला आपली शेतकरी एकजुटीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Ravikant Tupkar’s agitation now starts in Buldana
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नागपूर nagpur सोयाबीन कापूस रविकांत तुपकर ravikant tupkar आंदोलन agitation पोलिस सकाळ अमरावती प्रशासन administrations
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, सोयाबीन, कापूस, रविकांत तुपकर, Ravikant Tupkar, आंदोलन, agitation, पोलिस, सकाळ, अमरावती, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Ravikant Tupkar’s agitation now starts in Buldana
Meta Description: 
Ravikant Tupkar’s agitation now starts in Buldana
पोलिसांनी जबरदस्तीने तुपकर व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना पोलिस बंदोबस्तात बुलडाणा येथे सोडण्यात आले. परंतु तुपकरांनी आपले आंदोलन मागे न घेता पहाटे सहा वाजता बुलडाण्यात पोहचल्यावर त्यांच्या घरासमोर बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X