राजमाता जिजाऊसाहेब जन्मोत्सव यंदा ऑनलाइन

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी होऊ घातलेला राजमाता जिजाऊसाहेब भोसले जन्मोत्सव सोहळा कोरोना निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर ५० जणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. जगभरातील जिजाऊ भक्तांसाठी ऑनलाइन पद्धतीने सोहळ्यात सहभागी होता येईल. त्यामुळे जिजाऊ भक्तांनी जन्मोत्सव घरीच साजरा करावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहेकरे यांनी केले. जिजाऊ सृष्टी परिसरात त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

दरवर्षी मराठा सेवा संघ १२ जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्तरावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन सिंदखेडराजा येथे करीत असते. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील तसेच जगभरातील जिजाऊ भक्त सहभागी होतात. या वर्षी बुधवार (ता. १२) ४२४ व्या जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन केले आहे. या वर्षी देखील सोहळ्याचे ऑनलाइन फेसबुक लाइव्ह करण्यात येईल. गेल्या वर्षी ऑनलाइन फेसबुक लाइव्ह कार्यक्रम जगभरातील लाखो जिजाऊ प्रेमींपर्यंत पोहोचला होता. 

सध्याची परिस्थिती पाहता १२ जानेवारीला सोहळ्यासाठी सिंदखेडराजा येण्याची घाई करू नये. पूर्ण माहिती घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या वर्षी जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी फक्त ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. या निमित्ताने आपल्या कुटुंबातील महिला, आई, सासू, बहीण, बायको, मुलगी यांनाच जिजाऊ मानून पूजन व औक्षण करावे. डॉ. दिलीप धानके लिखित जिजायन ग्रंथ वाचन करावे व महिलांना प्रोत्साहन द्यावे. या वेळी जिजाऊ सृष्टीचे डॉ. मनोहर तुपकर, राजेश लोखंडे, सुभाष कोल्हे, रवींद्र चेके यांनीही सोहळा घरीच साजरा करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले.
 
News Item ID: 
820-news_story-1641477427-awsecm-458
Mobile Device Headline: 
राजमाता जिजाऊसाहेब जन्मोत्सव यंदा ऑनलाइन
Appearance Status Tags: 
Mukhya News
Rajmata Jijausaheb Janmotsav this year online
Mobile Body: 

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी होऊ घातलेला राजमाता जिजाऊसाहेब भोसले जन्मोत्सव सोहळा कोरोना निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर ५० जणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. जगभरातील जिजाऊ भक्तांसाठी ऑनलाइन पद्धतीने सोहळ्यात सहभागी होता येईल. त्यामुळे जिजाऊ भक्तांनी जन्मोत्सव घरीच साजरा करावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहेकरे यांनी केले. जिजाऊ सृष्टी परिसरात त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

दरवर्षी मराठा सेवा संघ १२ जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्तरावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन सिंदखेडराजा येथे करीत असते. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील तसेच जगभरातील जिजाऊ भक्त सहभागी होतात. या वर्षी बुधवार (ता. १२) ४२४ व्या जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन केले आहे. या वर्षी देखील सोहळ्याचे ऑनलाइन फेसबुक लाइव्ह करण्यात येईल. गेल्या वर्षी ऑनलाइन फेसबुक लाइव्ह कार्यक्रम जगभरातील लाखो जिजाऊ प्रेमींपर्यंत पोहोचला होता. 

सध्याची परिस्थिती पाहता १२ जानेवारीला सोहळ्यासाठी सिंदखेडराजा येण्याची घाई करू नये. पूर्ण माहिती घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या वर्षी जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी फक्त ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. या निमित्ताने आपल्या कुटुंबातील महिला, आई, सासू, बहीण, बायको, मुलगी यांनाच जिजाऊ मानून पूजन व औक्षण करावे. डॉ. दिलीप धानके लिखित जिजायन ग्रंथ वाचन करावे व महिलांना प्रोत्साहन द्यावे. या वेळी जिजाऊ सृष्टीचे डॉ. मनोहर तुपकर, राजेश लोखंडे, सुभाष कोल्हे, रवींद्र चेके यांनीही सोहळा घरीच साजरा करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले.
 
English Headline: 
Agriculture news in Marathi Rajmata Jijausaheb Janmotsav this year online
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
ऊस महाराष्ट्र maharashtra फेसबुक महिला women
Search Functional Tags: 
ऊस, महाराष्ट्र, Maharashtra, फेसबुक, महिला, women
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rajmata Jijausaheb Janmotsav this year online
Meta Description: 
Rajmata Jijausaheb Janmotsav this year online
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी होऊ घातलेला राजमाता जिजाऊसाहेब भोसले जन्मोत्सव सोहळा कोरोना निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर ५० जणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment