राजारामबापू महाविद्यालयातील महिला संशोधिकेने बनविला देशातील पहिलाच ‘व्हायरस डिऍक्टिव्हेट’ करणारा ‘मास्क’; किंमत तर अगदी सर्वसामान्यांना परवडणारी


anti pathogen mask

सांगली। संपूर्ण जग सध्या करोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. या विषाणूमुळे निर्माण होणाऱ्या रोगावर सध्यातरी कोणतीही अधिकृत लस किंवा उपचारपद्धती उपलब्ध झालेली नाही. अशा परिस्थितीत या विषाणूपासून सामान्य माणसाला स्वतःचा बचाव करण्यासाठी सरकारने ‘मास्क’चा वापर अनिवार्य केला आहे. बाजारात सध्या विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत, परंतु यातील बहुतांशी मास्कच्या किंमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. त्यामुळे अनेकजण साध्या मास्कचाच वापर करण्याला प्राधान्य देत आहेत. पंरतु यामुळे कोरोनाचा धोका वाढत असून तो लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा आहे. ही बाब ध्यानात घेत सर्वसामान्यांचा कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर येथील प्राध्यापिका सुप्रिया सावंत आणि त्यांच्या टीमने संशोधनातून वैशिष्ट्यपूर्ण अशा  ‘अँटी-पॅथोजन’ मास्क ची निर्मिती केली आहे. 

anti pathogen mask

सदरची संशोधकांची टीम ही गेल्या पाच  वर्षांपासून प्लाझमोनिक सौर-औष्णिक शोषकांवर काम करीत आहे. या संशोधनादरम्यान सदरच्या प्लाझमोनिक नॅनो-पार्टिकलच्या संश्लेषणासाठी टर्बो-गॅल्व्हानोकेमिकल तंत्रज्ञान विकसित केले गेले होते. याच तंत्रज्ञानाचा  वापर करून अँटी-पॅथोजन मटेरियल तयार करण्यात करण्यात आले आहे. सदरची पेटंटेड प्रोसेस वापरून तयार करण्यात आलेले मास्क श्वासोच्छवासावाटे शरीरात प्रवेश करू पाहणाऱ्या सुक्ष्मजीवांना आणि व्हायरसना मज्जाव करते. हा मास्क लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वजण वापरू शकतात.

नॅनो तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या या मास्कची  वैशिट्ये खालील प्रमाणे आहेत. 

  • १. हा मास्क बाजारात उपलब्ध असणाऱ्या फिल्टर तत्वावर आधारित N -९५ मास्क पेक्षा वेगळा आहे.  ह्या मास्कच्या मधल्या अँटी पॅथॉजन लेअरच्या पृष्टभागावर बॅक्टररिया आणि व्हायरसेस डिऍक्टिवेट होतात. 
  • २. आपल्या तोंडातून येणाऱ्या बॅक्टरीया सुद्धा या मास्कच्या आतील पृष्टभागावरच डिऍक्टिवेट होतात, ज्यामुळे इतर बॅक्टरीयल थ्रोट इन्फेकशनची शक्यता दूर  होते. 
  • ३. बॅक्टरीया आणि व्हायरस फॅक्त फिल्टर न करता त्यांना डिऍक्टिव्हेट करणारा हा देशातील पहिलाच वैशिष्ट्यपूर्ण मास्क आहे.
  • ४.  नॅनो- तंत्रज्ञानावर आधारित हा मास्क ASTM-२१००-११ ह्या स्टँडर्ड प्रमाणे बनविला असून यामध्ये  आरोग्य  सुरक्षितेची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.
  • ५. बाजारात उपलब्ध असणाऱ्या  फिल्टर तत्वावर आधारित N -९५ मास्कचा पुनर्वापर करता येत नाही, त्यातुलनेत आम्ही तयार केलेला मास्क २० वेळा धुवून  वापरता येतो. 
  • ६. N -९५ मास्कचा  बाजारातील तुटवडा आणि त्याच्या जास्त किंमतीमुळे सामान्य माणसाला असा मास्क वापराने शक्य होत नाही. त्यामुळे या सुप्रिया सावंत यांनी बनविलेले अँटी-पॅथोजन मास्क सामान्य माणसासाठी संसर्गापासुन सुरक्षिततेचा उत्तम पर्याय ठरतील.
  • ७. फक्त एकदाच वापरता येणारे मास्क वापरून, त्याची योग्य विल्हेवाट लावणे अतिशय कठीण काम आहे. हा मास्क स्वतःच बॅक्टरीया डिऍक्टिव्हेट करतो तसेच याचा धुवून पुर्नवापर केल्यामुळे सदरची समस्या सुटू शकते. 
  • ८. सध्या प्रायोगिक तत्वावर ५० मास्क बनविण्यात आले असून, येणाऱ्या आठवड्यात असे ५०० मास्क तयार होतील. हे सर्व मास्क ग्रामीण भागात तयार होणार असून यामुळे ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. 
  • ९. अशाप्रकारचे अँटी-पॅथॉजन मास्क एका इस्राईल मधील कंपनिने बनवले असून त्याची बाजारातील किंमत ५००० रु. प्रति मास्क आहे. त्यातुलनेत  सुप्रिया सावंत आणि टीमने तयार केलेला मास्क हा खूप स्वस्त असेल. 

या मास्कचे  टेक्नॉलॉजी पेटंट रजिस्ट्रेशन केले असून अशाप्रकारचे महामारी नियंत्रित करता येणारे तंत्रज्ञान लवकरच बाजारात लोकांच्या सेवेसाठी उपल्बध करून देण्याची बांधिलकी संशोधकांनी दाखवली आहे. प्राध्यपिका सावंत यांचे RIT मानजमेंट, डायरेक्टर  डॉ . सुषमा कुलकर्णी, डीन. डॉ. आनंद  काकडे आणि विभागप्रमुख डॉ. कुंभार यांनी कौतुक केले.

Previous articleकोल्हापूरात एकाच वेळी कोरोनाचे ७ नवे रूग्ण, जिल्ह्यात खळबळ

Source link

Leave a Comment

X