राज्यभरात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्णांना घरी सोडले


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. आज २६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितले.

मराठीतलं अधिकाऱ्यांना कळंना आणि इंग्लिश-हिंदी शेतकऱ्यांना येईना 

Loading…

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४७ हजार १९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३३ हजार ५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

खरीप हंगामासाठी महाबीजने नागपूरसाठी बियाणांचा पुरवठा करावा- डॉ.नितीन राऊत

राज्यात ६० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५७७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४०, पुण्यात १४, सोलापूरात २, वसई विरारमध्ये १, साताऱ्यात १, ठाणे १ तर नांदेड शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत.

कांदा निर्यात बंदी उठवण्याची राज्य सरकारने केली केंद्र सरकारकडे मागणी

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कारखान्यांना शाश्वततेचे प्रश्न पडले पाहिजेत – संजय भोसले

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २३४५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६ हजार ४१४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

महत्वाच्या बातम्या –

हरभऱ्याच्या क्षेत्रात सरासरीच्या दीडपट वाढ झाल्याने, भरघोस उत्पादन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन जण निरीक्षणाखाली – राजेश टोपे



Source link

Leave a Comment

X