राज्याच्या कमाल तापमानात घट शक्य


पुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) महाराष्ट्रासह देशभरातून परतल्यानंतर राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. पहाटे वाढलेला गारठा आणि दुपारचे तापदायक ऊन यामुळे तापमानातील तफावत वाढली आहे. २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्याच्या कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानाचा पारा सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात २१ ते २७ ऑक्टोबर या आठवडाभराच्या कालावधीत सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यत: कोरडे हवामान होते. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानाचा पारा १७ अंशांपेक्षाही खाली आल्याने थंडीची चाहूल लागली. तर दुसरीकडे कमाल तापमानाचा पारा ३४ अशांच्या पुढेच असल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवला. कमाल-किमान तापमानातील तफावत वाढल्याचे दिसून आले. 

दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका वाढण्याबरोबरच दोन दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत कमाल तापमानाचा पारा सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, नाशिक, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यांच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ४ त ६ अंशांनी कमी राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, बहुतांशी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान २ ते ४ अंशांनी कमी राहण्याची शक्यता आहे. 

राज्यात थंडीची चाहूल लागली असून, पहाटे गारठा वाढला आहे. किमान तापमानाचा विचार करता २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किमान तापमान २ ते ४ अंशांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान काहीसे अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

News Item ID: 
820-news_story-1635516110-awsecm-172
Mobile Device Headline: 
राज्याच्या कमाल तापमानात घट शक्य
Appearance Status Tags: 
Mukhya News
Possible maximum temperature drop in the statePossible maximum temperature drop in the state
Mobile Body: 

पुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) महाराष्ट्रासह देशभरातून परतल्यानंतर राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. पहाटे वाढलेला गारठा आणि दुपारचे तापदायक ऊन यामुळे तापमानातील तफावत वाढली आहे. २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्याच्या कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानाचा पारा सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात २१ ते २७ ऑक्टोबर या आठवडाभराच्या कालावधीत सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यत: कोरडे हवामान होते. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानाचा पारा १७ अंशांपेक्षाही खाली आल्याने थंडीची चाहूल लागली. तर दुसरीकडे कमाल तापमानाचा पारा ३४ अशांच्या पुढेच असल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवला. कमाल-किमान तापमानातील तफावत वाढल्याचे दिसून आले. 

दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका वाढण्याबरोबरच दोन दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत कमाल तापमानाचा पारा सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, नाशिक, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यांच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ४ त ६ अंशांनी कमी राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, बहुतांशी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान २ ते ४ अंशांनी कमी राहण्याची शक्यता आहे. 

राज्यात थंडीची चाहूल लागली असून, पहाटे गारठा वाढला आहे. किमान तापमानाचा विचार करता २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किमान तापमान २ ते ४ अंशांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान काहीसे अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Possible maximum temperature drop in the state
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मॉन्सून महाराष्ट्र maharashtra हवामान पुणे थंडी धुळे dhule जळगाव jangaon औरंगाबाद aurangabad विदर्भ vidarbha अमरावती कमाल तापमान कोकण konkan किमान तापमान
Search Functional Tags: 
मॉन्सून, महाराष्ट्र, Maharashtra, हवामान, पुणे, थंडी, धुळे, Dhule, जळगाव, Jangaon, औरंगाबाद, Aurangabad, विदर्भ, Vidarbha, अमरावती, कमाल तापमान, कोकण, Konkan, किमान तापमान
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Possible maximum temperature drop in the state
Meta Description: 
Possible maximum temperature drop in the state
नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) महाराष्ट्रासह देशभरातून परतल्यानंतर राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. पहाटे वाढलेला गारठा आणि दुपारचे तापदायक ऊन यामुळे तापमानातील तफावत वाढली आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X