राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव


पुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवत आहे. तर रात्रीच्या किमान तापमानात मात्र हळूहळू घट होत आहे. आज (ता. २२) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून उत्तर गुजरातपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच कोमोरीन परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकणात दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.राज्याच्या कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. गुरुवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान ३३ अंशांपार गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली आला असल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. देशाच्या उर्वरित भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान झाले आहे. उद्यापर्यंत (ता. २३) गोवा, ईशान्य आणि पूर्व भारतासह देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याचे संकेत आहेत. तर मंगळवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून देशाचा निरोप घेणार असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.६ (१७), नगर ३२.८ (२०.१), जळगाव – (१७.६), कोल्हापूर ३२.८ (२०.७), महाबळेश्वर २६.१ (१४.८), मालेगाव ३२.८ (२२), नाशिक ३२.० (१६.१), सांगली ३३.८ (१९.८), सातारा ३२.५(१८.५), सोलापूर ३४.४ (१७.४), सांताक्रूझ ३३.८ (२२.४), अलिबाग ३२ (२२.८), डहाणू ३२.१ (२४.३), रत्नागिरी ३२.४ (२३.२), औरंगाबाद ३१.८ (१६.२), नांदेड -(१८), उस्मानाबाद – (१८.४), परभणी ३२.८ (१८.९), अकोला ३२.८ (१९.६), अमरावती ३२.६ (१६.८), ब्रह्मपुरी ३५ (१८.६), बुलडाणा ३०.५ (१८), चंद्रपूर ३२.६ (२२.४), गडचिरोली ३२.४ (२२), गोंदिया ३३.२ (१९.६), नागपूर ३३.६ (१७.७), वर्धा ३२.८ (१९), वाशीम ३० (२०), यवतमाळ ३१ (१८).
 

News Item ID: 
820-news_story-1634823665-awsecm-456
Mobile Device Headline: 
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव
Appearance Status Tags: 
Mukhya News
Impact of 'October Heat' in the stateImpact of 'October Heat' in the state
Mobile Body: 

पुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवत आहे. तर रात्रीच्या किमान तापमानात मात्र हळूहळू घट होत आहे. आज (ता. २२) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून उत्तर गुजरातपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच कोमोरीन परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकणात दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.राज्याच्या कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. गुरुवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान ३३ अंशांपार गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली आला असल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. देशाच्या उर्वरित भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान झाले आहे. उद्यापर्यंत (ता. २३) गोवा, ईशान्य आणि पूर्व भारतासह देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याचे संकेत आहेत. तर मंगळवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून देशाचा निरोप घेणार असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.६ (१७), नगर ३२.८ (२०.१), जळगाव – (१७.६), कोल्हापूर ३२.८ (२०.७), महाबळेश्वर २६.१ (१४.८), मालेगाव ३२.८ (२२), नाशिक ३२.० (१६.१), सांगली ३३.८ (१९.८), सातारा ३२.५(१८.५), सोलापूर ३४.४ (१७.४), सांताक्रूझ ३३.८ (२२.४), अलिबाग ३२ (२२.८), डहाणू ३२.१ (२४.३), रत्नागिरी ३२.४ (२३.२), औरंगाबाद ३१.८ (१६.२), नांदेड -(१८), उस्मानाबाद – (१८.४), परभणी ३२.८ (१८.९), अकोला ३२.८ (१९.६), अमरावती ३२.६ (१६.८), ब्रह्मपुरी ३५ (१८.६), बुलडाणा ३०.५ (१८), चंद्रपूर ३२.६ (२२.४), गडचिरोली ३२.४ (२२), गोंदिया ३३.२ (१९.६), नागपूर ३३.६ (१७.७), वर्धा ३२.८ (१९), वाशीम ३० (२०), यवतमाळ ३१ (१८).
 

English Headline: 
Agriculture news in Marathi Impact of ‘October Heat’ in the state
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे कोकण konkan हवामान विभाग उत्तर प्रदेश पूर floods अरबी समुद्र समुद्र मॉन्सून महाराष्ट्र jangaon कोल्हापूर नाशिक nashik सांगली अलिबाग aurangabad नांदेड nanded परभणी अकोला वाशीम यवतमाळ
Search Functional Tags: 
पुणे, कोकण, Konkan, हवामान, विभाग, उत्तर प्रदेश, पूर, Floods, अरबी समुद्र, समुद्र, मॉन्सून, महाराष्ट्र, Jangaon, कोल्हापूर, नाशिक, Nashik, सांगली, अलिबाग, Aurangabad, नांदेड, Nanded, परभणी, अकोला, वाशीम, यवतमाळ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Impact of ‘October Heat’ in the state
Meta Description: 
Impact of ‘October Heat’ in the state
राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवत आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X