राज्यात थंडीची चाहूल


पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) परतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा वाढला आहे. तर कमाल तापमान ३३ अंशांपार गेल्याने दुपारी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. २३) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

झारखंड ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोमोरीन परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे केरळ, तमिळनाडूसह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान ३३ अंशापार जात उन्हाचा चटका वाढला आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. नाशिक येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३२.२ (१७), नगर ३२.८ (१६.७), जळगाव ३४.३ (१६.६), कोल्हापूर ३२.५ (२१.५), महाबळेश्‍वर २६.९ (१५), मालेगाव ३२.८ (१६.८), नाशिक ३२.१ (१४.८), सांगली ३३.६(२०.२), सातारा ३२.८(१७.७), सोलापूर ३४.८ (१७.१), सांताक्रूझ ३४.३ (२२.६), अलिबाग ३२.४(२२.२), डहाणू ३२.४ (२३), रत्नागिरी ३६.१ (२२.९), औरंगाबाद ३२ (१५), नांदेड ३३.४ (१८), परभणी ३२.४ (२०.६), अकोला ३३.४ (१८.४), अमरावती ३३ (१५.७), ब्रह्मपुरी ३५.२ (१५.६), बुलडाणा ३१ (१७.४), चंद्रपूर – (१९.४), गडचिरोली ३३.६(२१), गोंदिया ३३.५ (१८.४), नागपूर ३४ (१५.५), वर्धा ३२.५ (१५.६), वाशीम ३२(१६), यवतमाळ ३१.७ (१६).

News Item ID: 
820-news_story-1634912257-awsecm-887
Mobile Device Headline: 
राज्यात थंडीची चाहूल
Appearance Status Tags: 
Mukhya News
Cold snap in the stateCold snap in the state
Mobile Body: 

पुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) परतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा वाढला आहे. तर कमाल तापमान ३३ अंशांपार गेल्याने दुपारी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. २३) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

झारखंड ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोमोरीन परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे केरळ, तमिळनाडूसह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान ३३ अंशापार जात उन्हाचा चटका वाढला आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. नाशिक येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३२.२ (१७), नगर ३२.८ (१६.७), जळगाव ३४.३ (१६.६), कोल्हापूर ३२.५ (२१.५), महाबळेश्‍वर २६.९ (१५), मालेगाव ३२.८ (१६.८), नाशिक ३२.१ (१४.८), सांगली ३३.६(२०.२), सातारा ३२.८(१७.७), सोलापूर ३४.८ (१७.१), सांताक्रूझ ३४.३ (२२.६), अलिबाग ३२.४(२२.२), डहाणू ३२.४ (२३), रत्नागिरी ३६.१ (२२.९), औरंगाबाद ३२ (१५), नांदेड ३३.४ (१८), परभणी ३२.४ (२०.६), अकोला ३३.४ (१८.४), अमरावती ३३ (१५.७), ब्रह्मपुरी ३५.२ (१५.६), बुलडाणा ३१ (१७.४), चंद्रपूर – (१९.४), गडचिरोली ३३.६(२१), गोंदिया ३३.५ (१८.४), नागपूर ३४ (१५.५), वर्धा ३२.५ (१५.६), वाशीम ३२(१६), यवतमाळ ३१.७ (१६).

English Headline: 
Agriculture news in Marathi Cold snap in the state
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे मॉन्सून थंडी कमाल तापमान हवामान विभाग sections झारखंड विदर्भ vidarbha पूर floods अरबी समुद्र समुद्र केरळ भारत कोकण konkan नाशिक nashik नगर जळगाव jangaon कोल्हापूर मालेगाव malegaon सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
पुणे, मॉन्सून, थंडी, कमाल तापमान, हवामान, विभाग, Sections, झारखंड, विदर्भ, Vidarbha, पूर, Floods, अरबी समुद्र, समुद्र, केरळ, भारत, कोकण, Konkan, नाशिक, Nashik, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, मालेगाव, Malegaon, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Cold snap in the state
Meta Description: 
Cold snap in the state
नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) परतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली घसरल्याने पहाटे गारठा वाढला आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X